आजच्या मोबाईलमध्ये असणारं हे तंत्रज्ञान,एका हॉलीवुड अभिनेत्रीने शोधलंय ! माहिती आहे याबद्दल .

810 Views

आज आपण प्रत्येकजण bluetooth, wifi,GPS, वापरतो .
या गोष्टींशिवाय मोबाईल नेटवर्क चालुच शकत नाहीत,पण याच्या संशोधकाची कहाणी माहितीये तुम्हाला ?

नसेल तर माहित करून घ्या, एका अप्रतिम सौंदर्यवती हॉलीवूड अभिनेत्रीने या करिता टेकनॉलॉजी शोधली पेटंट घेतलं पण तिला 60 वर्ष यांचं क्रेडिट मिळालं नाही,

सन 1997 मध्ये वयाच्या 82 व्या वर्षी, Electronic frontier foundation award भेटल्यानंतर ही बाब उजेडात आली.

2014 मध्ये Discovery channel ने याची स्टडी करून डॉक्युमेंटरी बनवली तेव्हा जगाला या सौंदर्यवतीच्या मेंदूची दखल घ्यावीच लागली, मरणोपरांत का होईना जगाने तिचं संशोधन मान्य केलं .

ही स्टोरी आहे Hedy Lamarr या हॉलीवुडच्या अभिनेत्रीची,जन्माने ज्यु असणारी ही ऑस्ट्रियन अभिनेत्री/संशोधक,त्या काळखंडात सिनेमात आली ज्यावेळी पहिलं महायुद्ध सुरू होतं .

1914 साली Vienna,ऑस्ट्रीयामध्ये जन्मलेली Hedy Lamarr स्वर्गीय अप्सरेपेक्षा सुंदर होती,परंतु जन्माने ज्यु असल्याने हिटलरपासून सतत पळत रहाने याशिवाय त्यांना काही पर्यायच नव्हता.

वयाच्या 18 व्या वर्षीच तिचे लग्न तिच्यापेक्षा डबल वय असणाऱ्या श्रीमंत आर्म डिलर बरोबर झाले, पण ते जास्त टिकले नाही, तिथून पुढे तिने 6 लग्ने केली,पण ती टिकली नाहीतच .

Hedy Lamarr ला झेकोस्लोवाकिया मध्ये पहिल्यांदा सिनेमात काम करायची संधी मिळाली,आणि 1933 मध्ये Esctaey (पडदयावर बोल्ड सीन असलेला पहिला )हा तिचा सिनेमा प्रदर्शित झाला .

चार्ली चॅपलीनच्या जमान्यात बोल्ड सीन देऊन Hedy Lamarr प्रसिद्ध झाली .

अप्रतिम साैंदर्य आणि अभिनयामुळे तिला जास्त त्रास झाला नाही,पण ऑस्ट्रीयावर हिटलरच्या नाझींचा कंट्रोल वाढला आणि ज्यु असणाऱ्या हेडी लमारला कुटुबियासमवेत इंग्लंडला पळून यावे लागले,इथे आल्यावर तिला MGM studios च्या ओनरने अनेक चित्रपट दिले, प्रसिद्धी/पैसा वाढत गेला,

तिथुन पुढे हेडी लमारने अमेरिकेत म्हणजे हॉलीवूडमध्ये प्रवेश केला.

पैसा प्रसिद्धी आणि नाव तिला हॉलीवुडने दिलंच होतं पण तिची इच्छा होती, तिला तिच्या बुद्धीसाठी ओळखलं जावं .

या काळात जर्मन नेव्हीने अमेरीकन नेव्हीच्या टॉरपेडोला परेशान इंटरसेप्ट करून परेशान सोडलं होतं.
ही बाब खूप चर्चिली गेली,याची मोठी बातमी झाली होती.

Hedy Lamarr अमेरिकेत आली होती, पण अमेरिकेने अजून तिला नागरिक म्हणून accept केलं होतं ,

ती राहायची त्या कॅलीफोर्निया मध्ये George anthoel हा जर्मन पियानोस्ट तिचा शेजारी होता,तो संगित वाद्यावर काही प्रयोग करत होता,हेडी लमारचा वैज्ञानिक मेंदू त्याला मदत करायला होताच,आणि त्यांनी पियानोला ऑटोमेटेड कंट्रोल करायची पद्धत शोधून काढली,वेगवेगळ्या फ्रिक्वेंन्सीचं नॉलेज तिथे तिला मिळालं .

टोरपेडोचं नॉलेज तिला तिच्या पहिल्या नवऱ्याकडून मिळालेलंच होतंच, त्यात अमेरिकेन नेव्हीला फायदा होईल आपल्याला चांगल लं नागरिक म्हणून मान्यता मिळेल अशी तिची धारणा होती,तिच्यातला वैज्ञानिक जागा झाला आणि जहाज ते radio controlled टोरपॅडो यांच्यामधलं कम्युनिकेशन या हॉपिंग फ्रिक्वेन्सीमुळे इंटरसेप्ट करता येऊ शकतं याच्यावर त्यांचं संशोधन पुढे गेलं .

आणि हेच Hopping संशोधन पुढे Secret communication system म्हणून त्यांनी पेटंट केलं.

या फ्रिक्वेन्सीला “Hopping frequency” म्हणलं जातं हीच हॉपींग फ्रिक्वेन्सी आजच्या GPS , WiFi, Bluetooth याचा आधार आहे.

याचं पेटंट Hedy Lamarr यांना 1942 साली मिळालं,पण नशीब असं कि,अमेरिकन नेव्हीने त्याला रिजेक्ट केलं कारण ? ती एकतर वैज्ञानिक नसुन अभिनेत्री होती आणि ती पण ग्लॅमरस अभिनेत्री .

परंतु हेच तंत्रज्ञान अमेरिकेच्या नेव्हीने 1962 च्या Cuban war मध्ये वापरलं आणि त्यांना यात यश लाभलं .

परंतु Hedy Lamarr ला याचा गंध सुद्धा नव्हता, कारण तिचं पेटंट एक्सपायर होईपर्यंत तिला याबददल कोणी सांगितलं सुद्धा नाही .

1997 मध्ये Electronic frontier foundation या संस्थेने Lamarr चे हे संशोधन जगापुढे आणलं आणि तिला तिच्या या संशोधनाकरिता सन्मानित करण्यात आलं .

National investors council. ने Hedy Lamarr ला आपल सदस्यत्व दिलं आणि वयाच्या शेवटच्या दिवसात,हे संशोधन तिच्या नावावर करण्यात आलं, तिला Hall of fame मध्ये सामिल करण्यात आलं .

एक अभिनेत्री जिने हे इतकं महत्वाचं संशोधन आजच्या दुनियेला दिलं, तिला अगदी शेवटी शेवटी तिच्या मेंदू करिता तिला सन्मान मिळाला .

ही अभिनेत्री वयाच्या 85 व्या वर्षी, जग सोडून गेली,

आज आपण जे वायफाय किंवा ब्लुटूथ वापरतोय ते या अभिनेत्रीचंचं देणं आहे .

निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764.

Office 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *