आज जगातले सर्व टॉप कंपन्या,हे बिझनेस मॉडेल वापरतात,समजून घ्या !काय आहे ते?

आज जगातल्या सगळ्यात टॉप कंपन्या हा प्रकार वापरतात व्यवसायाचं हे मॉडेल समजून घ्या एग्रीगेटर बिझनेस मोडेल.

एग्रीगेटरचा अर्थ : फक्त एकत्र करणारा.

तो जमाना गेला त्या जमान्यात एखादा व्यवसाय चालू करण्यासाठी आपल्याकडे खूप पैसे, खूप मोठी जागा आणि भरपूर माणसं असावी लागत होती.

आजकाल एखादा पोरगा उठतो आणि करोडो रुपयाची एखादी कंपनी छोट्याशा दहा बाय दहाच्या रूम मध्ये चालू करतो.

स्वतःजवळ एकही कारण नसलेला मुलगा कार किरायाने देण्याची कंपनी चालू करतो

या मॉडेलचा वापर करून अनेक मुलं त्यांच्या आयुष्यात यशस्वी झाली आहेत त्यामुळे आपण देखील या मॉडेलवर आपला व्यवसाय उभा करू शकता.

आपण सध्या या मॉडेल मधील बिझनेसेसची माहिती घेतोय .
माणसाच्या तीन मूलभूत गरजांपैकी तिसरी गरज.. “निवारा” आहे , ती ओळखून हे व्यवसाय चालू झालेत .
स्वतःच्या मालकीची एकही रूम नसताना या स्टार्ट अप्सकडे लाखो रूम्स आहेत ज्या, हे लोक किरायाने देऊन पैसे कमावतात.

Airbnb :

हे बिझनेस मॉडेल,हॉटेल रूम नाही तर … आपल्या घरातील शिल्लक असणाऱ्या खोल्या काही दिवसांसाठी किरायाने देतात .
दोन मित्र आहेत Ray आणि Joe… कॉलेजला शिकताना ते रूममेट होते , बरं रूम म्हणजे एक अपार्टमेंट टाईप होते , त्यामुळे त्यांच्या कडे बाहेर एक रुम मोकळी होती . त्यांची जरा कडकी चालू होती , फक्त रेंट पुरतेच पैसे यायचे घरून .
यांनी एक आयडीया लावली , बाहेरच्या मोकळ्या रूम मध्ये,,ती हवेची गादी नसते का ??ती टाकली .
आणि कॉलेजमध्ये अँड केली कि , आमची ती रूम,गादी सहित एक दोन दिवसासाठी किरायाने मिळेल , आम्ही नाश्ता म्हणजे ब्रेकफास्ट पण देऊ.
Airbnb हे नाव विचित्र वाटते ना ?
पण याचा अर्थ आहे,हवा भरलेली गादीचा बेड Airb आणि b , फॉर ब्रेकफास्ट .

2008 मध्ये अमेरिकेत निवडणुका लागल्या होत्या म्हणून यांनी त्यांच्या ब्रेकफास्टच्या बॉक्सेसवर ओबामा आणि त्यांच्या विरोधकांच्या नावाची ब्रँडींग करून त्याची विक्री केली . आणि ती आयडीया एकदम हीट झाली

पण मेन बिझनेसला मूर्त रूप दिले त्यांच्या तिसऱ्या मित्राने , त्याने यांची
वेबसाईट बनवली आणि प्रवास झाला चालु .

आज यांचे व्हॅल्युएशन 1.4 billion Dollar आहे .
जगातील 28 करोड प्रॉपर्टीज यांचे कडे लिस्टेड आहेत .
हे घर मालकाकडून 3% आणि ग्राहकाकडून 12. 5% रक्कम चार्ज करतात .

* ज्यांना हॉटेल परवडत नाही,त्यांच्या करिता हे बेस्ट ऑप्शन आहे .
ग्राहकाने नोंदणी केली कि, लगेचच हे त्याचा 6.5 कोटीचा विमा काढतात , म्हणजे काही उच – नीच झाले तर कव्हर मिळते .

यांना सुरुवातीला AI कडून फंडींग मिळालं आणि नंतर 17 राऊंडची VC फंडींग घेऊन यांनी जगभर विस्तार केला .

हे आहे Airbnb मॉडेल.

***************************

2) OYO Rooms :

हे बिझनेस मॉडेल भारतीय आहे . रितेश अग्रवाल ….20 वर्षाचा कोवळा पोरगा .
याने काय बघीतलं कि हौटेलमधील रूम्स महाग असतात आणि ज्या स्वस्त असतात तिथे काहीच क्वालिटी नसते .

बरं समजा एखाद्या हॉटेलमध्ये 100 खोल्या आहेत,त्या शंभरच्या शंभर सगळ्या नेहमी फुल्ल असतात का ? तर नाही !
याने काय केलं ? तर हॉटेल मालकाकडे गेला, “तुमच्या खोलीचे एक दिवसाचे भाडे किती आहे ” ? असं विचारले.
2000 रु उत्तर ….
हा बोलला महिनाभरासाठी 800 रू रोजाने देणार का ?
तो मालक पण मान्य झाला ,,, यांची परत एक अट … खोली आम्ही सजवू , कलर करू , फर्निचर बदलू .. काही प्रॉब्लेम ???
उत्तर : नाही !
आणि अशा प्रकारेच2013 मध्ये चालु झालेलं हे स्टार्ट अप भारतातल्या 500 शहरापर्यंत आणि 70000 Rooms पर्यंत पोहोचलं
सुरुवातीला एक लाख रुपये भांडवल असलेलं हे स्टार्ट अप आज 3000 करोड इतक्या व्हॅल्युएशनचं आहे .
यांना 2015 पासून फंडींग मिळायला चालू झाली , अनेक छोट्या मोठया स्टार्टअप्स ला यांनी आपल्या पंखाखाली घेतलं आणि आज दुबई , चीन , मलेशिया , नेपाळ इ . देशांमध्ये देखील विस्तार केला .
बघा साधं गणित आहे , Hotel वाला 2000 रु / दिवस किरायाने रूम देता , OYO त्याच्या कडून तीच रूम 800 रू / दिवस ने घेते , आणि 1200 रु / .दिवस भाडयाने देते .
म्हणजे सगळ्यांचाच फायदा .
आज OYO भारतातलंच नाही , तर
अख्ख्या South East Asia मधलं सर्वात मोठ्ठ हॉटेल रूम पुरवणारं स्टार्ट अप आहे.

****** ***** ***** ***** ****

Trivago :

हॉटेल ?????? ट्रिवगो

अशी लाईन आपण नेहमीच ऐकत होतो.

2005 मध्ये जर्मनीत चालु झालेलं हे स्टार्ट अप .
आज 190 देशात विस्तारलेलं आहे .

यांचं मॉडेल थोडं वेगळं आहे

Airbnb आणि OYO ला रुम्स सांभाळाव्या लागतात , मेंटेन कराव्या लागतात , स्वतःची site सांभाळवी लागते .

Trivago तसं करीत नाही .

एखादया नवीन गावात गेल्यावर , फक्त पत्ता विचारण्याकरता कोणी आपल्याकडून पैसे घ्यावे , तसं हे मॉडेल आहे .

हे काय करतात ..
समजा सोमवारी संध्या 8:00 वाजता कोणाला हॉटेल रूम पाहिजे , Non – AC पाहिजे ,1000 रू किरायची हवी .

हे काय करतात, सगळ्या उपलब्ध हॉटेल रूम आपल्या समोर आणून ठेवतात,आणि त्यांच्या वेबसाईटवर रिडायरेक्ट करतात, डिल झाली कि ते हॉटेल Trivago ला कमीशन पे करते .

साधं आणि सोप्पं म्हणजे फक्त Affiliate marketing करा आणि पैसे कमवा .

सुरुवातीस हे देखील Loss मध्ये होते,पण आयडीया लावत गेले,फंडींग घेत गेले आणि आक्रमक मार्केटिंग करत करत,आज एक सक्सेस फुल ऍप म्हणून मान्यता पावले आहेत .

लेख खूप मोठ्ठा झाला ना ??

तर आता आपली वेळ ,
अजून या क्षेत्रात कित्ती कित्ती स्कोप बाकी आहे !

हॉस्टेल्सला एकत्र आणा,
मंगल कार्यालये,फंक्शन हॉल्स , ट्यूशन्सला एकत्र आणा, लॉन्स,यांना एकत्र आणता येणे शक्य आहे.

कोण म्हणतं काही होऊ शकत नाही ?

वरच्या स्टोरीतले सगळे पात्र काय अंबानीच्या घरी जन्मले होते काय?

आजच्या युगाचा मंत्र त्या super 30 सिनेमात खरं सांगितलाय ..”आज राजा का बेटा राजा नही बनेगा ,बनेगा वोही जो हकदार होगा”

चला तर मग डोकं लावू आणि हकदार बनू.

लेख आवडला तर नक्की इतरांना फॉरवर्ड करा .

शुभेच्छा .

©निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764

office : श्री ओमकेश मुंडे सर :9146101663

Previous Post Next Post

One thought on “आज जगातले सर्व टॉप कंपन्या,हे बिझनेस मॉडेल वापरतात,समजून घ्या !काय आहे ते?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *