आपण नवीन करणार,तो व्यवसाय चालेल का नाही?हे या पद्धतीने चेक करा.

आपण निवडलेला व्यवसाय चालेल का नाही?हे चेक करण्याची अचूक पद्धत.

#Validate_Before_Work,

आपल्या ग्रुप मध्ये असे बरेच जण आहेत ज्यांनी,काहीतरी सुरू केलं, आणि नंतर असं लक्षात आलं कि , अरेच्चा “याला तर मार्केटच नाही !”

म्हणजे ,,, स्वस्तात द्या वगैरे काहीच म्हणत नाही ग्राहक , तर डायरेक्ट हे म्हणतो … “कि ,,,आम्हाला याची गरजच नाही” .

सध्या मार्केट मध्ये एक पंक्चर सिलंट आलंय ….
पण त्याची गरज आहे का ?
ट्युबलेस टायर च्य जमान्यात असे प्रॉडक्ट irrelavant ठरतात .

त्यामुळे सहजच लोकांना ते गरजेचे वाटतच नाहीत,संपलं मग सगळं !

असंच घडलं #ERIC_RIES याच्या बरोबर,

2004 मध्ये त्यांनी आणि त्यांच्या मित्राने मिळून … एक Online Platform मध्ये स्टार्ट अप करायचं ठरवलं आणि त्याच्यावर काम पण चालु केलं .

तोपर्यंत त्यांनी त्याच्या बद्दल विशेष कोणाशीही चर्चा केली नाही ,
प्रॉडक्ट नवीन होता,पण तरीही त्यांनी कोणालाही साधं हे पण विचारलं नाही कि,तुम्हाला याची गरज आहे का नाही ?

लाँचची डेट ठरण्याअगोदर त्यांनी प्रॉडक्टची मार्केटला कल्पना दिली आणि लॉंचीग चा कार्यक्रम पण ठेवल.

यांचं नशिब इतकं बेक्कार कि , त्याच्या लाँचला एक सुद्धा माणूस फिरकला नाही .

problem झाला कुठे ? तर …
यांनी हे तपासलंच नाही कि , End User ला हा प्रॉडक्ट पाहिजे आहे का नाही ?

एकंदरीतच काय ?तर आपण आदर्श विचार करत fundamentally Wrong असा प्रॉडक्ट निवडू शकतो . आणि आपल्याला तेच नकोय.

आपल्या अवती भोवती खूप सारे व्यवसाय किंवा प्रॉडक्टअसे दिसून येतात जे fundamentally wrong असू शकतात .

मारूती ची Ritz आणि IGNIS या गाडया नीट बघा,अर्धवट वाटतात का वाटतात ? तर त्यांनी नीट विचार न करता बाहेर आणल्या .

तोच प्रकार Unicorn च्या बाबतीत Honda या टू व्हीलर कंपनीने केला होता , चांगलं मॉडेल बंद करून नवीन version आणलं अगदी विद्रुप असं , जेंव्हा ग्राहकांनी त्याची खरेदी बंद केली कि मग आली अक्कल ताळ्यावर, परत जुनेच मॉडेल डिजाईन आणावे लागले .

Pepsi ने एक प्रयोग केला होता , त्यांनी कोला फ्लेवर्ड पेप्सीला प्लेन पाण्यासारखे बनवलं होतं,झाली विक्री बंद .
मग कंपनीने तो प्रॉडक्ट बंद केला .

Marlboro या सिगारेट कंपनीने धूर न सोडणारी सिगारेट बाजारात आणली होती .
झालं काय़ ? तर काही युनीट सुद्धा विकले नाहीत, कारण फंडामेंटल चुक .
केला प्रॉडक्ट बंद .

इथे या कंपन्यांनी हजारो कोटी खर्च केले,शेकडो तास खर्ची घातले आणि तयार केला असा प्रॉडक्ट जो कोणालाच नकोय

बघा प्रत्येक वेळी आपण म्हणतो कि , अनुभव घेऊ आणि त्यातून शिकू .
पण लक्षात घ्या.
असं चुकांतून शिकणे फारच महाग पड़ते

इथे Validation करणं अती महत्वाचं आहे .
वैयक्तीक पणे दिवसाकाठी 8 ते 10 कॉल हाताळतो मी , त्यात जास्त भर असतो ते हेच़ बघण्यात कि , प्रॉडक्ट किंवा इंडस्ट्री validate होते अथवा नाही ?

ERIC Ries ने त्याच्या पुस्तकातून हीच Power of Validation ची थेअरी मांडलीये .

त्यात त्यांनी काही टप्पे सांगितले आहेत , ते आपण पुढे बघूया

📗Create_MVP

MVP चा अर्थ आहे Minimum viable product
खूप सारा पैसा खर्च करून परफेक्ट उत्पादन ग्राहकाला टेस्ट करायला देण्याऐवजी ,,, थोडक्या कष्टात “कच्चा/ पक्का” प्रोडक्ट टेस्ट करून घ्या आणि तो इतरांना पटला / आवडला कि मग वाट्टेल तेवढा खर्च करा , पण अगोदर MVP तयार करा .

Zappos ही ऑनलाईन बुटं सप्लाय करणाऱ्या कंपनीची सुरूवात MVP मॉडेलनेच झाली .
ते सुरुवातीला बुटांचे फक्त फोटो वेबसाईट वर प्रसिद्ध करत,ग्राहकांना आवडले,ऑर्डर आली कि मग दुकानूतून स्वतः विकत आणून पोस्टाने डिलीवर करत,
आता ही कंपनी स्वतः जवळ स्टॉक ठेवते कारण यांचं MVP मॉडेल यशस्वी झालं

📕User_Experience_vision

आपलं लेकरू आपल्यासाठी बाबूच असतं , पण त्यावेळी आपण Validation करत असतो त्यावेळी हा Emotions चा चष्मा काढून ठेवा , आणि ग्राहकासारखे याच्या कडे चिकित्सक दृष्टीने बघा, खूप काही नवं कळेल

📒Identify_critical_Assumption:

बघा,कित्येकदा आपण आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना विचारतों मी yxxx विकायला आणणार आहे चालेल का ?

इथे आपण त्यांचं फक्त मत विचारलय,ते पॉजीटीवच येणार .

पण तुम्ही विकत घेणार का?हे विचारल्यावर खरं Assumption समजतं

म्हणून लोक किती बारीक सारीक विचार करतात हे लक्षात घेऊनच कोणताही निर्णय करा .

📗(4) Build a Early validation Plan

आज काल कंपन्या दोन पद्धती वापरतात.

( 1 ) Conciaerge MVP
(2) Smoke screen MVP

पहिल्या प्रकारात मोठा साठा न करता,ऑर्डर आली तसं माल आणुन विक्री केली जाते

दुसऱ्या Smoke Screen MVP मध्ये, प्री ऑर्डर घेतली जाते .
लोकांकडून फोटो दाखवून,व्हिडीओ दाखवून किंवा पूर्वीच्या अनुभव सांगून अगोदर पैसा जमा केला जातो आणि हे लक्षात आलं कि,लोकं प्री ऑर्डर करताहेत तर मग पुढे काम केलं जातं .
म्हणजे काय तर सिंगल पीस पण तयार केला नाही आणि मार्केटला विकला पण … अशी गंमत
“आता यासाठी आपल्याच ग्रुपचं उदाहरण घ्या,UMBA Group चालू करण्याअगोदर आपण रजिस्ट्रेशन ग्रुप मध्येच फीस जमा करूनच पुढच्या ग्रुपची तयारी करतो ( असं स्वतः सगळं सांगायचं नसतं म्हणे, पण इथे मी शिक्षक आहे , काहीच लपवणार नाही

📙Measure__Release

एकदा का आपला MVP तयार झाला कि मग,टारगेट कस्टमरच्या छोटया ग्रुपला ते वापरायला दया,आणि त्यांचा रिस्पॉन्स नीट (नीट म्हणजे नीटच)अभ्यासा आणि मगच मोठी पायरी चढा .

तर इथून पुढे Validation न करता काहीच करू नका !

अशा प्रकारे ERIC Reis ने स्वतःला आलेला अनुभव The Lean Startup या पुस्तकच्या रूपाने दुनिया समोर मांडला .
त्याचा सिद्धांत आज Power of Validation या नावाने B- Schools मध्ये शिकवला जातो .

हे पुस्तक NewYork Times Best seller असून Amazon वर उपलब्ध आहे .

शुभेच्छा .

निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764

Office : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *