आपल्याला आपली कमजोरी का दिसत नाही,वाचा ही भन्नाट थेअरी!

आपल्याला आपली कमजोरी का दिसत नाही?

www.nileshkale.com

बऱ्याचदा काही कंपन्या असा काही प्रॉडक्ट काढतात, जो सुपरफ्लॉप होतो, हा मुद्दा तुम्हाला ऑटो सेक्टर मध्ये जास्त दिसेल, कारण तिथे वर्षाला अनेक मॉडेल लॉंन्च होतात, पण चालतात किती ?
आता या प्रॉडक्टच्या मागे इतकी सगळी हुशार मंडळी काम करत असताना असं कसं घडतं?

या प्रिन्सपिल चा उलगडा एका दरोडयामुळे झाला.

1999 सालामध्ये, McArthur wheeler नावाचा व्यक्ती एका शॉपींग मॉल मध्ये, बंदुक घेऊन घुसला, दिवसाढवळ्या, तोंडाला मास्क नाही, ना काही नाही, तो तिथली कैश लुटून अगदी आरामात गेला जणू काही झालंच नाही.
आता तिथे CCTV कॅमेरे वगैरे सगळं होतं, त्यामुळे त्याला पोलीसांनी एका तासात पकडलं.
पण त्याच्या चौकशीत एक धक्कादायक गोष्ट समोर आली.

त्याला पोलीसांनी विचारलं कि, “तु विना मास्कचं कसा काय चोरी करायला गेलास?”
तर त्याचं उत्तर होतं कि,”मला वाटलं मी अदृश्य झालोय, कोणाला दिसणारच नाही.

त्यानं पुढं सांगितले कि,”मला वाटलं जसं लिंबाच्या रसाने पांढऱ्या कागदावर काही लिहिलं तर ते सामान्य डोळ्यांना दिसत नाही,फक्त दिव्यावर तो कागद धरला तरच ओळखू येईल, तसं मी पण जर पूर्ण अंगावर लिंबाचा रस लावला तर कोणाला दिसणार नाही आणि सहज चोरी करेन” !
” पण मी कसा काय दिसलो ? हेच मला कळत नाहीये ” !

आता गोष्ट साधी ये, कि या व्यक्तीने मुर्खपणा केला, असं कुठे असतंय का ?
पण ही केस नंतर अभ्यासली गेली.

आणि एक भन्नाट सत्य समोर आलं कि, कित्येक व्यक्ती McArthur wheeler सारखाच मुर्खपणा आपल्या व्यवसायात करतात आणि त्यांच्या ते लक्षात पण येत नाही.

2003 साली ही केस कोर्टाने मानसशास्त्रज्ञाकडे दिली कि, बघा अजुनही या व्यक्तीला का बरं वाटत नाही कि याने चुक केलीये?

तेंव्हा David dunning आणि Justin Kruger. या दोन मानसशास्त्रज्ञांनी याच्यावर स्टडी करून एक पेपर लिहिला.

त्याचं नाव होते “why people don’t recognize their incompetence ?”

या थेअरी मध्ये असं कळलं कि, माणसाचा मेंदू कधी कधी इतका Over Confident होऊन जातं कि, त्याला पुढं होणारं नुकसान दिसतच नाही.
म्हणून तर,”मोठया कंपन्याच्या,संस्थाच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बोर्डवर अनेक जण असतात”.

“एखादया संस्थेच्या नियामक मंडळात अनेक लोक असतात”.

” राज्य किंवा केंद्रसरकार मधे निर्णय घेणारे एक मंत्रीमंडळ असते”.
याचं कारण एकच आहे कि, एका मेंदूचा निर्णय चुकू शकतो.

या इफेक्टला Dunning Kruger effect म्हणला जातो.

छोट्या व्यावसायिकांना धंदयात होणारं नुकसान उघडया डोळ्यांनी दिसत नाही, त्यामुळे त्यांनी कन्सलटंटचा किंवा जवळच्या मित्र अथवा कुटुंबियांचा सल्ला अवश्य घ्यावा.

नाहीतर हा dunning Kruger effect नुकसान करतो,आणि कधी नुकसान झालं ते कळत पण नाही.

https://www.facebook.com/groups/675025626396370/?ref=share

शुभेच्छा.
© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंटस
आनंद पार्क, औंध ,पुणे.
9518950764
office : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *