“आम्ही No.2 ला आहोत”,असं नम्रपणे सांगून देखील जग जिंकता येतं, याचीच एक स्टोरी.

#we are no.2

“आम्ही बेश्ट आहोत”.
” आमची क्वालिटी बेस्ट आहे”
” अगदी सगळं नं 1 आहे”, अशा फुशारक्या मारणारे तुम्ही अनेक बघीतले असतील?पण आम्ही नं 2 आहोत,हे सांगून यश मिळवणारे फार क्वचित, कारण ?हे सांगायला पण धाडस लागतं.

आजकाल आपण बघतो,कि जो तो “मी, किती ग्रेट आहे?या सांगण्यामध्येच व्यस्त आहे, परंतु एक व्यवसाय केवळ एवढ्या गोष्टीवर चालू शकत नाही.

तर ग्राहकाच्या मनामध्ये आपल्याला स्वतःबद्दल आणि स्वतःच्या प्रॉडक्ट बद्दल विश्वास निर्माण करावा लागतो.

करण ज्या वेळेला ग्राहक आपल्याला एक व्यावसायिक म्हणून “प्रामाणिक सच्च्या व्यक्ती सच्ची कंपनी” असं समजायला लागतो,त्यावेळेला तो आपल्याकडून नक्की खरेदी करतो.

असा स्वतःबद्दल ग्राहकाच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणे, हे कोणत्याही मार्केटिंगचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे.

अशीच एक “ऐतिहासिक ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन” आहे जी एका कार किरायाने देणाऱ्या कंपनी ने केली होती.

या कंपनीचं नाव आहे Avis Car Rental.

ही कंपनी 1946 साली सुरू झाली त्यावेळेला Warren Avis हे एअरफोर्स मधून रिटायर झालेले होते, ते नवीन व्यवसाय शोधण्यासाठी संपूर्ण अमेरिका फिरले, तेंव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की, “अमेरिकेमध्ये जास्त कार रेंटल कंपन्या नाहीत किंवा चांगल्या कार किरायाने देण्याच्या व्यवसायामध्ये संधी आहे” आणि त्यांनी स्वतःची कार रेंटल कंपनी सुरुवात केली.

त्या वेळेला फक्त Hertz नावाची एक कंपनी होती जी कार रेंटल बिजनेस मध्ये होती, त्यांचा बिजनेस मोठा होता.

1946 ते 1960 व्यवसाय करूनही Avis ही कंपनी अजूनही तोट्यात होती,त्यांना काहीही करून नफ्यामध्ये येणं गरजेचं होतं,अन्यथा त्यांना त्यांची कंपनी बंद करावी लागली असती,म्हणून त्यांनी एका जाहिरात करणाऱ्या कंपनीला एक मार्केटिंग प्लान आखण्याचं काम दिलं आणि या कंपनीने ही जाहिरात बनवली.

ही जाहिरात आजही मार्केटिंगच्या क्षेत्रांमध्ये ऐतिहासिक बनून राहिलेली आहे

ही जाहिरात पुढील प्रमाणे होती

” Avis is Only no.2 in Rent Cars So we try Harder”.

वरील ओळी कदाचित फार साध्या वाटतील,परंतु आम्ही दोन नंबरला आहोत हे असं सांगणं देखील खूप मोठा दिलदार पणाचे लक्षण आहे.

आणि हे धाडस या कंपनीने केलं, या कंपनीने मोठे मोठे बॅनर लावले, होर्डिंग लावले,स्वतःची जाहिरात केली आणि जाहिरात आम्ही नंबर एक आहोत म्हणून केली नाही, तर “आम्ही नं 2 आहोत व आम्ही खूप प्रयत्न करत आहोत”अशी केली गेली.

यामुळे जो इफेक्ट जनतेवर झाला,त्याला Underdog Effect म्हणतात.

यातून,
“ही कंपनी प्रामाणिकपणे स्वतःबद्दल सांगत आहे !” अशी एक छाप जनभावने वर पडली आणि या जाहिरातीमुळे,लोक यांचे बरोबर आले.

या मार्केटिंग कॅम्पेनिंगमुळे या कंपनीचा तोटा जो 1.5 million डॉलर वर होता तो संपून ही कंपनी दीड मिलियन प्रॉफिटमध्ये आली.

Hertz ही कंपनी त्यावेळेला कार रेंटल त्या क्षेत्रामध्ये नंबर एक होती.
हे सगळ्यांना माहीत होतं,या कंपन्या देखील माहीत होतं की Avis ही नंबर 2 ला आहे,परंतु आपल्या स्वतःचा जो कमीपणा आहे तो मनावर घेऊन शांत बसण्यापेक्षा या कंपनीने या नंबर दोन पोझिशनला स्वतःचा स्ट्रॉंग पॉईंट बनवला आणि त्याच्यामुळे जनतेमध्ये या कंपनीबाबतीत सहानुभूती निर्माण झाली.

यश मिळालं, इतकं कि,यांच्यातला गैप कमी झाला,आणि Hertz ला म्हणावं लागलं कि, “Avis ने आता टॅगलाईन बदलावी,ते आता नं 2 राहीलेले नाहीत”.

म्हणून आपण जेंव्हा मार्केटिंग करायला घेतो, तेंव्हा सच्चेपणा दाखवा.

या प्रकारच्या मार्केटिंग कंपनी मधून आपण खूप काही शिकू शकतो.

1) ग्राहकांना तुमचा सच्चेपणा आवडतो,उगाचच आम्ही श्रेष्ठ,नं.1 असा मिरवा लगेच,उघडा पडतो, कारण?ये दुनिया सब जानती है ! म्हणतात,ग्राहकाला लबाड बोलणारी कंपनी, व्यक्ती किंवा व्यवसाय आवडत नाही.

2) ज्या वेळेला तुम्ही नंबर 2 असता आणि तुम्ही सांगता की आम्ही खूप प्रयत्न करतोय,त्यावेळेला लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात,कारण?तुम्ही ते स्वतः मान्य करता,आणि तुम्हाला कष्ट घ्यावे लागणार आहेत हे लोकांना देखील कळतं.

3) मानवामध्ये एक मैत्रीची भावना असते, “जिथे कमी तिथे आम्ही”, या भावनेने अनेक जण तुमची मदत करायला सहज पुढे सरसावतात, आणि तुम्हाला जिंकून देतात,अशा प्रकारे तो संघर्ष तुमचा एकटयाचा न रहाता समुदायाचा संघर्ष बनतो, आणि तिथेच तुम्ही जिंकता.

तात्पर्य : आपल्या कमजोर बाजू लपवुन ठेऊन पोकळ मोठेपणा मिरवण्यापेक्षा जे आहे ?ते सांगा, जनता तुम्हाला विजेता बनवील.

Avis हा ग्रुप आज 530 करोड व्हॅल्युएशनची कंपनी असून,यांची सेवा भारतात सुद्धा उपलब्ध आहे, त्याकरिता आपण, Avis india असा शोध घेऊ शकता.

© निलेश काळे
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंटस,
आनंद पार्क, औंध, पुणे.
9518950764

office : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *