आयुष्यातला कोणताही प्रॉब्लेम सोडवण्याची जबरदस्त पद्धत 5 Why

Root Cause Analysis (RCA):

📌 RCA ला नीट समजावून घेण्यासाठी पुढच्या दोन उदाहरणं बघु

1) आपलं पोट दुखतंय,ऑफिसला जायच्या ऐवजी,आपण ENO पितो आणि पोटावर गरम पाण्याच्या पिशवीने शेकत घरीच बसून रहातो.

2) आपली कार बिघडली चालुच होत नाही,अर्जंट तर जायचय,आपण ऑटो बोलावतो,आणि कारच्या वर कव्हर झाकून ऑटोने निघून जातो.

सध्याचं तर काम भागलं ना ?

📌पण वर केलेले दोन्ही उपाय हे शेवटचे किंवा योग्य उपाय आहेत का ? तर नाही ! हे कामचलावू प्रकार आहेत !

आपण ….

1) डॉक्टरकडे 2) मेकॅनिककडे गेलं पाहिजे,वेगवेगळ्या टेस्ट करून आणि कार पूर्ण ऊकलून प्रॉब्लेमची जड कुठे आहे ? हे शोधायला पाहिजे ! आणि असे मुळ समस्या शोधण्याच्या प्रक्रियेलाच RCA म्हणलं जातं.

📌 कोणत्याही मिलिटरी ऑपरेशनला करण्याअगोदर असाच शोध घेतला जातो,कोरोना सारखा एखादया रोगावर औषध काढताना याचे मूळ शोधूनच औषध काढायचे प्रयत्न झाले !

तर आपण देखील लहानात लहान प्रॉब्लेमच्या मुळात जाऊनच त्याचं उत्तर शोधायला शिकावं यासाठीच हा लेख !

रूट कॉल अनालिसिस हे वेगवेगळे प्रिन्सिपल मेथड आणि टेक्निक लावून केलं जातं, ज्यामुळे आपलं लक्ष फक्त व वरच्या समस्येकडे अडकून न राहता आपण मूळ समस्या आहे तिथपर्यंत पोहोचू शकतो.

त्याचे वेगवेगळे टप्पे आहेत आणि या लेखांमधून आपण हे वेगवेगळे टप्पे आणि त्याच्या वेगवेगळ्या मेथड आपण समजून घेणार आहोत,

हे अनालिसिस करण्याचे तीन वेगवेगळी उद्दिष्टे असतात,

(1) सर्वात महत्वाचं समस्येच्या मुळापर्यंत जाणे,
(2) ती समस्या सोडवण्याकरता काय काय अडचणी येऊ शकतात याचा अभ्यास करणे,
(3) तोच प्रॉब्लेम नंतर पुन्हा येऊ नये, याकरता खबरदारीच्या उपाययोजना करणे,

📌 आपण स्वतःकरता देखील ही अनालिसिस करत असताना काही प्रिन्सिपल्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे

CORE PRINlClPLES

📘 आपल्याला आपलं लक्ष हे मूळ समस्येकडे द्यायचा आहे फक्त वरच्या लक्षणांवर नाही.

📕 ज्याप्रमाणे डॉक्टर हा ऑपरेशन करण्यापूर्वी त्या ऑपरेशनच्या जागेला थोडीशी भूल देतो,तसं मूळ समस्या सोडवण्यात पूर्वी आपण ही लक्षणं तात्पुरती बंद केली पाहिजे.

📘 जे लक्ष असू द्या की,फक्त एकच मूळ कारण असू शकत नाही, वेगवेगळी मूळ कारणे सुद्धा असू शकतात.

📕 आपल्याला हे मूळ कारण शोधत असताना का(why) आणि कसं (How) या दोन गोष्टीचा विचार करायचा आहे कोण (Who?)जिम्मेदार आहे? याचा विचार करायला लागलो, तर वाद निर्माण होतील म्हणून कोण हा प्रश्न विचारायचा नाही.

📘 जोपर्यंत काय घडलं होतं? याची परिपूर्ण माहिती आपल्या समोर येत नाही,तोपर्यंत आपण त्याची खोलात तपासणी कशी करणार ?म्हणून जास्तीत जास्त माहिती गोळा करा.

📕 अशाप्रकारे एकदा का मूळ कारण सापडलं की आता आपला पुढचा उद्देश असा राहील की ही समस्या पुन्हा कधी समोर येऊच नये.

***********

*(1) 5 why Method :*

ज्यावेळी पोलीस एखाद्या गुन्हेगाराची उलट तपासणी करत असतात,त्या वेळेला ते एका प्रश्नावर थांबत नाहीत, लागोपाठ लागोपाठ वेगवेगळे प्रश्न विचारतच असतात, या लागोपाठ विचारणे विचारल्या गेलेल्या प्रश्नांमुळे तो गुन्हेगार कुठल्या ना कुठल्या प्रश्नावर खरं उत्तर देऊन टाकतो, ही अशी त्यांची पद्धत आहे.

1) Why ?
2) Why ?
3) Why ?
4) Why ?
5) Why ?

या Method ला 5 Why असं म्हटलं जातं,कारण याच्या मध्ये एकदा why विचारून थांबायचंच नाही या पद्धतीत पाच वेळेला किमान पाच वेळेला why हा प्रश्न विचारला जातो, आणि त्याच्यामुळे मूळ समस्या पुढे येऊ शकते.

याच्यामध्ये फक्त पाच वेळेला Why विचारावं, असं काय नाही आपण शंभर वेळसुद्धा हाय असं विचारू शकतो,जोपर्यंत आपल्याला पाहिजे तो निकाल येईपर्यंत आपण विचारतच राहणे हे या या गोष्टीचं मूळ तत्त्व आहे.

उदा.
समजा आपल्या कारखान्यात एका मशीनने काम बंद केलं.

(1) पहिला Why ?

कामगाराने मशीन चे बटन बंद केलं म्हणून,

(2) दुसरा Why? कामगाराने मशीनचे बटन का बंद केलं?

» कुठलातरी मोठा आवाज आतमध्ये येत होता म्हणून.

(3) तिसरा Why = आतमध्ये मोठा आवाज का आला?

>> गिअर बॉक्स मध्ये गिअर अडकले म्हणून

(4) चौथा Why : गिअर का अडकले होते?

>> गिअरबॉक्स मध्ये ऑइल टाकायचं राहिलं होतं म्हणून

(5) Why : गिअर बॉक्स मध्ये ऑइल का टाकायचा राहिल?

>> गिअर बॉक्स मध्ये ऑइल टाकायचं राहिलं कारण?ज्या व्यक्तीने ऑईल चेंज केलं तो व्यक्ती कुठल्यातरी कामासाठी बाहेर निघून गेला, त्याने जाताना गोडाऊन ला जाऊन चेक केलं पण तिथे ऑइल उपलब्ध नव्हतं.

म्हणजे या गोष्टीचं मूळ कारण असं निघालं की गोडाउनमध्ये गिअर ऑइल संपलं होतं,दुसरी गोष्ट कामगारांमध्ये समन्वय नव्हता आणि तिसरी गोष्ट स्टॉक व्यवस्थित मेंटेन केला जात नाही.

📌 फक्त मशीन का बंद झाली?हा एक एक प्रश्न विचारून थांबलो असतो,तर इतके मोठे प्रॉब्लेम आपल्या समोर आलेच नसते, आणि मूळ क कारणापर्यंत पोहोचताच आलं नसतं.

अशा प्रकारे 5 Why ही पद्धत आपल्या कामाची आहे .

**********

(2) Event Analysis

या प्रकाराला चेंज अनालिसिस असं सुद्धा म्हणलं जात

📌 एखाद्यावेळी आपण एक वेगळयाच प्रकारची ऑफर काढतो आणि आपल्याच अनपेक्षित पणे आपल्याला इतकं यश मिळतं की आपण त्याची कल्पना सुद्धा केलेली नसते, आपल्या जवळचा स्टॉक पूर्णपणे संपतो किंवा आपलं काम कमी वेळेत पूर्ण होऊन जातं किंवा समोरची व्यक्ती आपल्या अनपेक्षितपणे मदत करायला सरसावते

📌 म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये अपयश मिळालं किंवा ती गोष्ट करायला जमली नाही तर आपण तिचं पोस्टमोर्टम करतो पण खूप यश मिळाल्यानंतर सुद्धा ते यश मिळालं याचं एनालिसिस होणं गरजेचं आहे

📌 जसं उदाहरणादाखल घ्या की, मोठी मोठी प्रदर्शने किंवा एक्सपो हे डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात मध्येच का असतात.

📌ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांच्या तीन दिवसांच्या सेलला प्रचंड प्रतिसाद का मिळतो?

आता या दोन्ही गोष्टीत पॉझिटिव्ह आहेत परंतु यांच्या यांच्या यशस्वी होण्यामागे एक मूळ कारण असू शकत नाही ही कारणे खूप जास्त असू शकतात, वेगवेगळी

जसं,
1) यावेळी नवीन वर्ष सुरुवात होणार असतं त्यामुळे लोक नवनवीन संकल्प करत असतात,

2) डिसेंबर महिन्यात जास्ती प्रदर्शन होत असतात कारण? त्या वेळी वातावरण चांगलं असतं.

(3)या महिन्यामध्ये वेगवेगळी सण असतात जसं न्यू इअर असतं, क्रिसमस असतो,म्हणजे लोकांचा खरेदी करण्याकडे कल वाढलेला असतो.

या वेगवेगळ्या इवेंट ज्या घडतात, त्यामध्ये किती टक्के विक्रीची चढउतार होते,ही जर आपण नीट बघीतलं तर एक पॅटर्न नक्की दिसायला लागतो आणि यातून हा बदल का झाला याची कारणे समोर येतात.

हेच आहे Root Cause Analysis करणे.

“तेंव्हा पुढच्या वेळेपासून कोणत्याही प्रॉब्लेमला वरवर बघू नका,त्याच्या खोलात जा”

बरं पडेल.

© निलेश काळे .
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंट
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764
Office: 9146101663

Previous Post Next Post

2 thoughts on “आयुष्यातला कोणताही प्रॉब्लेम सोडवण्याची जबरदस्त पद्धत 5 Why

 1. Dear sir,
  We have analyze our problem related to business for injection moulding. But main reason is automotive market down. We need to search the other sector business but we have didn’t found any solution. We need your help how to search other sectors business to run our machines continuously. Please guide us.

  Regards
  Abhijeet borhade
  MAP polyplast, Nalawade
  Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *