“आलिया भट्टने” या कंपनीमध्ये इन्वेस्टमेंट केलीये, जाणुन घ्या या कंपनीबद्दल .

आलिया भटटने या स्टार्टअपला फंडिंग दिलिय !

Phool.co

हे हेडिंग वाचल्यानंतर अनेकांना आलिया भट्ट या स्टोरीची स्टार आहे का?असं वाटू शकतं,पण तसं नाहीये .

ही स्टोरी आहे एका भन्नाट स्टार्टअपची,एक अशी कंपनीची जी 2017 मध्ये सुरुवात झालीये,

आणि आत्तापर्यंत 80 महिलांना डायरेक्ट रोजगार दिलाय आणि रोज 8 टन निर्माल्य नदीत जाण्यापासून वाचवतात हे.

यांना देशो विदेशीचे अनेक पुरस्कार मिळालेत .

या कंपनीचं नाव आहे Phool.co

ही कंपनी फुलांपासून अगरबत्ती/ धूप / कोरडा केमीकल विरहित गुलाल/ गांडूळखत इ.बनवते, कशापासून तर मंदिरातून बाहेर टाकल्या जाणाऱ्या निर्माल्यातून.
फुलांपासून या सर्व गोष्टी बनवल्या जातात.

📙Idea Generation :
तर ही क्रांतीकारी कल्पना अनिकेत अग्रवाल या IIT Kanpur च्या विद्यार्थ्याला गंगेच्या घाटावर फिरत असताना सुचली .

आपल्याकडे पूजेत वाहिलेली फुले नदीत विसर्जित करण्याची परंपरा आहे. हे परंपरा म्हणून योग्य वाटत असलं तरीही नदी पात्रात पडलेल्या फुलामुळे पाण्यातील जीवांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही
आणि शेवटी त्याच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो .

📘Circuler Economy : जर ही फुले परत एकदा वापरता आली तर ? ते सुद्धा त्यांचं पावित्र्य न घालवता ? या कल्पनेने प्रेरित होऊन अनिकेत अग्रवाल आणि त्यांच्या मित्रांनी मंदिरातून निर्माल्य जमा करायला सुरुवात केली,बरं फक्त जमा करून त्याचं खत करणे सोपंय पण त्या पासून अजून लोकांना रोजगार देता आला आणि ते प्रॉडक्ट रोज वापरता आले तर ?
या अशा प्रकारे अर्थचक्र फिरवण्याला Circular Economy म्हणतात .

📗Upcycling : एखादया गोष्टीवर प्रक्रिया करून पुन्हा तीच वस्तू बनवणे याला रिसायकलिंग म्हणतात .
तर एखाद्या गोष्टीवर प्रोसेस करून त्याचा अजून चांगला उपयोग करून घेणे याला Upcycling म्हणतात .

तसे अनिकेत अग्रवाल आणि टिमने त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग केले .
आणि शेवटी संशोधन करून त्यापासून सुवासिक अगरबत्ती आणि धूप बनवला .

📕Help मिळते : याकामी IIT Kanpur चे डीन डॉ. अभय करंदीकर यांनी त्यांना पुर्ण सपोर्ट दिला, एवढंच नव्हे तर पुढे जाऊन जेंव्हा ही कंपनी मार्केटला यायला तयार होत होती, तेंव्हा सुद्धा Seed Capital म्हणजे बीज भांडवल उभं करायला IIT कानपुर ने मदत केली .

📙Funding : कोणत्याही स्टार्टअप ला फंडिंग तेव्हा मिळते जेंव्हा ती कल्पना इन्वेस्टर्सला पटते,त्याच्यापाठीमागचा हेतू लक्षात येतो,
या स्टार्ट अपला अगदी आयडीया लेवलपासून बेस्ट स्टार्टअप आयडिया म्हणून बक्षीसं मिळाली त्यामुळे Phool.co साठी पहिल्या राऊंडमध्ये 2 Million dollar चं फंडिंग मिळालं.

अगदी कालपरवा ज्यावेळी अनिकेत अग्रवाल यांच्या टिमने फुलांपासून Leather बनवतोय असं जाहिर केलं त्यावेळी त्याचं पण दणक्यात स्वागत झाले .

📒 D2C Model :

Phool.co ची सर्व ऑरगॅनिक उत्पादने Direct to costomer ( D2C) मॉडेल मधून ऑनलाईन उपलब्ध आहेत,आणि Shopify.com हे त्यांचे चॅनेल पार्टनर्स आहेत .

📒आपण काय घ्यावं यातून :

कोणतीही आयडिया ही छोटी किंवा मोठी नसते, तर आपण यातून काय बदल साध्य करतोय?हे समाजाला सांगता आलं पाहिजे.
केवळ पैसा मिळवायचाय म्हणून किंवा केवळ फंडिंग मिळवायचीये म्हणून स्टार्टअप चालुच करू नये,तर त्या पाठिमागे काहीतरी मोठा विचार असावा.

📕 आलिया भट्ट :
या स्टार्टअपसाठी जेंव्हा PETA या संस्थेने पुरस्कार दिला,तेंव्हाच हे स्टार्टअप झोतात आले आणि त्यामुळे आलिया भट्ट सारखी अभिनेत्री सुदधा या मध्ये इन्वेस्टर बनली .

आपल्या डोक्यात देखील अशा कल्पना असतील तर नक्की त्यावर काम करा.

“एक ना एक दिवस कचऱ्याचं पण सोनं होतं” .

शुभेच्छा
© निलेश काळे,
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंट्स ,
आनंद पार्क,ओंध,पुणे.
9518950764

Office : 9146101663.

Previous Post Next Post

2 thoughts on ““आलिया भट्टने” या कंपनीमध्ये इन्वेस्टमेंट केलीये, जाणुन घ्या या कंपनीबद्दल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *