इतरांच्या ब्रॅन्डनेमची नक्कल करून फायदा होतो का?

699 Views

इतरांच्या ब्रॅंडची नक्कल करून मार्केट मिळवता येतं का?

*Ambush Marketing चा प्रकार*

Trademark infringement

📌 ज्यावेळी आपण हे ठरवतोच कि , समोरच्याच्या प्रसिद्धीचा फायदा आपण पण घ्यायचाय ! त्यावेळीच आपण Ambush करणे चालु करतो !

📌 Ambush Marketing यातील हा दुसरा प्रकार ! यात समोरच्या ब्रँन्डच्या मेहनतीचा गैरफायदा घेतला जातो.

📌 कधी – कधी पुर्ण ब्रॅन्डनेम,लोगो, कलर कॉम्बीनेशन कॉपी केलं जातं,तर कधी कधी, थोडी बहुत,चोरीमारी करून,पण शेवटी नक्कल ती नक्कलच.

ही गोष्ट प्रत्येक क्षेत्रात होते.

📌 “लोकमत” “लोकसत्ता” या न्युजपेपर्स ला यश लाभलं आणि ज्या हौशी लोकांना पेपर काढायचाच हे ठरलंय , ते ज्यावेळी ट्रेडमार्क साठी अप्लाय करतात त्यावेळी … काहीही झालं तरीही त्यांना त्यांच्या पेपरच्या नावात …….. “लोक” …. हा शब्द पाहिजे म्हणजे पाहिजे !

आमच्या जिल्हामधेच……
“लोक” + xxxxxx ” = काहीही चालतंय पण…. “लोक ” हा शब्द पाहिजेच अशा नावाचे किमान 12 Local News Papers आहेत .

📌हे असं का केलं जातं ?

📌 कधी विचार केलाय कि,प्रसिद्ध ब्रॅन्डच्या नावाची तोडफोड करून, थोडाबहुत बदल करून , स्वतःची ऍड करुन घ्यायचा हा प्रकार आहे,याला Trademark infringement मार्केटिंग म्हणतात .

📌 लोकांना हे असं करायला अक्षरशः काहीही वाटत नाही, Reebok ,Puma ,Nike , Addidas या सारख्या ब्रॅन्डच्या नावात हास्यास्पद बदल करून, शुज ,ट्रॅवल बॅग ,T-shirt, Cap वर टाकून सर्रास विकले जातात ! बरं या कंपन्या इतक्या मोठ्या आहेत कि,त्या याच्याकडे लक्ष पण देत नाहीत.

हे तेच आहे ना ? infringement of Trademark

📌 अनेकदा असं आढळून आलेलं आहे कि काही ट्रेडमार्क कंपन्यांच्या हातातून निसटून जातात,कारण त्याची कॉपी इतक्या मोठया प्रमाणावर होते कि,ते डायरेक्ट कॅटेगरीचं नाव पडून जातं .
📌 “अमृततुल्य” हा शब्द जर कोणी रजिस्टर केला असता तरी त्याची तीच गत झाली असती .
📌 Audi कंपनीच्या लोगोत चार वर्तुळं आहेत आणि ऑलम्पीक च्या लोगोत पाच , त्यामुळे ऑलम्पीक असोसीएशन ने Audi वर केस केली , पण Audi ने ती केस जिंकली , त्याच्या वकिलाने हे सिद्ध केलं कि ,
तो मी नव्हेच 😊😊😊
📌 त्यानंतर Audi ने खरोखर ट्रेडमार्क इंन्फ्रीन्जमेंट करून पक्का बदला घेतला !

📌 आमच्या मागील PAID बॅचमध्ये मधे एक जण होते,त्यांनी ग्रुप वर हा प्रश्न एकदा केला होता ! कारण त्यांनी एका मोबाईलच्या ब्रँडच्या नावाला वापरून Bags काढल्या आणि त्या नावाने उत्पादन चालु सुद्धा केलं होतं !पण नंतर त्यांना सुचवल्यानंतर बदल केला त्यांनी.

📌 Trademark infringement ला काही कंपन्या फार सिरीयसली घेतात,मध्यंतरी नाशिक जिल्हयातल्या एका व्यक्तीने PepsiGold नावाने,50 पैसे विक्रीचा मुखवास आणला, त्यावेळी पेप्सीने त्याला निट्ट कोर्टात ओढले, सगळंच बंद.

काय परवडलं?

📌 अशा प्रकारे,,, या प्रकारची भंपक मार्केटिंग पण जगात अस्तित्वात आहे,पण याला जास्त आयुष्य नसते.

📌 उसनं अवसान आणून जास्त दिवस कळ काढता येत नाही ! हातसा अगदी उथळ असा हा मार्केटिंग प्रकार त्यामुळे, उगं आपल्या लेकराबाळांच्या नावाचा ब्रॅन्ड बनवा, कुठं कॉप्या करून धसकट मागे लावुन घेता?

निष्कर्ष हा प्रकार वापरूच नये !

https://www.facebook.com/groups/675025626396370/?ref=share

©निलेश काळे .
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
आनंद पार्क, औंध, पुणे.
9518950764

office: Omkesh Munde Sir
9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *