इथून पुढे,मोबाईलमध्ये हेडफोनची पीन लावायची सोयच नसणार आहे.

#business

इथून पूढे स्मार्टफोन कंपन्या हेडफोन सॉकेट देणार नाहीत.का???? बरं असं.

📌 आपण मोबाईल फोन वेगवेगळ्या कामांसाठी वापरतोय,मोबाईलच्या हेडफोन् सॉकेटमध्ये,पीन लावुन, हेडफोन कानात घालुन म्युजिक ऐकणं ,हे त्यापैकी अनेकांचं आवडतं काम.

पण बॅड न्युज अशी आहे कि, हळूहळू मोबाईल मधून ही सोय रहाणार नाही :

टॉप एंड मोबाईल/फ्लॅगशिप फोनमधून हे सॉकेट अगोदरच गायब झालंय.

याची सुरुवात ऍपल ने चार वर्षापूर्वीच केलीये,आणि आता सर्वच मोबाईल फोन निर्मात्याच्या टॉप एंड स्मार्टफोन मधून हे फिचर गायब करणार आहेत.

का ??????? हा सर्वात मोठा प्रश्न !

या सॉकेटला 3.5 mm Headset Jack म्हणलं जातं,आणि हा हेडसेट जॅक,गेली 50 वर्ष, वेगवेगळ्या उपकरणांसोबत येतोय,
आजही आपण 1970 सालची ही पीन,आपल्या 2021 च्या मोबाईलमध्ये फिट बसवू शकतो, कारण?याची साईज ही पूर्ण जगात स्टॅन्डर्ड आहे.

आता जसजसं टॅक्नॉलॉजी मधे सुधारणा होतं गेली,तस तसं मोबाईलमध्ये असणारी स्पेस, ही कमी कमी होत गेली.

मोबाईल निर्मात्या कंपन्यांसाठी ही स्पेस फारच मौल्यवान असल्याने, त्यांनी,ब्ल्यूटूथला प्राधान्य दिलं.

ब्ल्युटूथची सोय पण दयायची आणि हेडफोन जॅक पण दयायचा हे त्या कंपन्यांकरिता आतबट्टयाचा सौदा वाटु लागला.

#Waterproof:

मोबाईल फोन हे वॉटर प्रुफ असले पाहिजेत,ही ग्राहकाची मागणी होतीच.

आता मोबाईल वॉटरप्रूफ बनवायचा म्हणलं, तर त्याचात कोठूनच पाणी आत जायला नको,पण हेडफोन जॅक ही गोष्ट मोठा अडसर होती, एखादी गोष्ट फायद्यापेक्षा अडचण करायला लागली कि ती, निरुपयोगी वाटायला लागते, तसं काम झालं याचं.

स्पर्धेत टिकायचं म्हणून मग त्याला वॉटरप्रुफ बनवण्यासाठी हा जॅकच काढला गेला.

#Thickness:

तो जमाना कधीच गेलाय,जेंव्हा दगडासारखे जाड आणि दणकट मोबाईल फोन बाजारात मिळायचे,

आता स्पर्धा आहे अतिशय स्लिम फोन बनवण्याची,ज्याचा फोन् जास्त स्लीम त्याचा फोन जास्त विकणार,हे जणू गणितच बनलंय.

पण इथे सूदधा मोठा अडसर होता, हेडफोन जॅकचा,कारण?त्याची साईज स्टॅन्डर्ड असल्याने,त्याच्या जाडीपेक्षा कमी जाडी करता येणं शक्यच नव्हतं,

म्हणून मग,या हेडफोन जॅकचाच बळी दिला गेला.

#financials :

सगळ्यात पहिल्यांदा कंपन्यांनी त्यांच्या प्रिमियम म्हणजे?फ्लॅगशिप फोन मधून, हेडफोनजॅकला काढलं, कारण?या मोबाइलचा ग्राहक हा 80,000 पेक्षा जास्त किंमत मोजायला तयार असतो, जर हा इथे 80,000 रू देऊ शकतो, तर हा अजून 5-10 हजार खर्च करून ब्लूटूथ एअरबड विकत घेऊ शकतो, म्हणजे त्याला हेडफोन फ्री देण्यापेक्षा, ब्लूटूथ हेडसेट विकून जास्त पैसे मिळवू शकतो, हे त्या पाठीमागचं गणित असावं.

व्यवसायाचं गणित हे असंच चालतं,
मार्कटची मागणी काय? स्पर्धक काय करतोय? सुधारणा कोठे हवीये? या सगळ्यांचा विचार करून कमी महत्वाच्या बाबी बदलल्या जातात, आपल्या आयुष्यात सुद्धा असंच आहे ना सगळं?

महत्वाचे बनून रहा, नाहीतर कचऱ्यात फेकले जाल.

चला सध्यातरी हेडफोन लावून म्युजिक ऍन्जॉय करू.

© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट ,
आनंद पार्क, औंध,पुणे.
9518950764

office : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *