इथून पुढे “असं” काम केलं?तरच जग किंमत देईल.

इथून पुढे असं काम केलं तरच जग किंमत देईल.

© निलेश काळे

Carl Newport या लेखकाचं Deep work हे अतिशय भन्नाट पुस्तक ,यात जो पाठ दिलाय ना ? तो अतिशय परिणामकारक आहे , मध्यंतरी बऱ्याचदा यावर लिहिलंय कि , स्वतःचा काहीतरी वेळ , स्वतः बरोबर घालवला पाहिजे , त्याचीच पुढची पायरी या पुस्तकात आहे .

यात Cal Newport लेखकाने आपल्या फोकस कसा असावा या बाबत सुंदर सादरीकरण केलंय , काय आहे या जगात जो पर्यंत आपण स्वतःला दुर्मीळ बनवत नाही तो पर्यत जग आपली योग्य किमत करणार नाही.

बघा आपण दिवसभरात कशी कामे करतो ? तर चलत फिरत , हे करून बघ ते करून बघ , सगळंच करायचय !Multitasking करायचीये तर Quality Work होईल ? नाही सेठ ! नाही होणार !

Multitasking कधीच, कुणाकडूनच होत नसतं .

त्यामुळे लेखक म्हणतो ,, इथून पुढे तीन प्रकारच्या लोकांनाच जग विचारेल ,

1) ज्यांच्याकडे Extreme Level ची टेक्नीकल स्कील आहे.

2) जे लोक एखादं काम अतीपरफेक्ट ( सुपरस्टार सारखं ) करू शकतात .

3 ) ते लोक ज्यांच्या कडे invest करण्यासाठी खूप पैसे आहेत

आता तिसऱ्या प्रकारात आपल्या सारखे लोक यायचं काही कारणच नाही , मग आपण वरच्या एखादया कॅटेगरीत बसू शकतो का ?

पण त्यासाठी एक गुणधर्म असणे अत्यावश्यक आहे , तो म्हणजे “Deep Work”

#Deep_work: proffessional Activities done with Undistracted mindset to push your limits above expert Level .( असं भान हरपून एखादं काम करणे कि , ज्यात आपण अगदी तल्लीन होऊन जातो , इतके कि आजुबाजुला काय चाललयं ?याची आपल्याला जाणीव पण राहत नाही )

तेच

#shallow_work:
म्हणजे टाईमपास करत करत केलेलं सर्वसाधारण काम , ज्यात फार काही विशेष साध्य होत नाही , आणि महत्वाचं म्हणजे असं उथळ काम कोणीही सहज कॉपी करू शकतं

आता हा गुणधर्म आपल्यात कसा तयार होईल बरं ???तर त्यासाठी खालील पौईटस बघा .

(1) The Myline Effect

मायलीन हा एक पांढरा रंगाचा टिश्यू असतो , ज्यावेळी आपण एखादं काम पूर्ण फोकस ने करायला घेतो , त्यावेळी याची मेंदूवर वाढ होते , आणि त्या मायलीनमुळेच आपण जास्तीत जास्त चांगला फोकस करू शकतो ,
पण हे मायलीन तयार होण्यासाठी आपण थोडा तरी वेळ फोकस देऊन एखादं काम करायला हवं , बिना मोबाईल , बिना सोशल मिडीया .

आणि ज्यावेळी ह्या मायलीन चा थर वाढतो तेंव्हा आपलं Concentration वाढतं आणि आपण एखादया सुपरहिरो सारखं काम पूर्ण करू शकतो .

******************************

(2) Attention Residue

समजा आपल्याला नॉनस्टॉप दोन तीन कामं करायची आहेत , पण काम नंबर 1 करुन करुन आपल्याला कंटाळा आलाय , तर आपण थोडा वेळ त्याला बाजूला ठेवतो आणि काम नं 2 करायला लागतो , याच्या पाठीमागे आपला दिमाग एक लॉजीक लावतो कि चला , तेवढाच बदल होईल पण काम नं 2 चालू केलं तरी , काम नंबर 1 पूर्ण न झाल्याची थोडी पण नीट लक्ष लागत नाही , या प्रकाराला Attention Residue म्हणतात .
*******************************

(3)#Deep work is a skill

कोणताही शास्त्रज्ञ एकदम लक्षपूर्वक एखादा शोध लावत असतो , तर तो स्वतःच चित्त विचलीत न होऊ देता काम करतो , ज्यामुळे परिणाम एकदम हटके मिळतात .
पण असं एखादं काम प्रचंड लक्षपूर्वक करणे कधीही कोणालाही जमेल ?
तसं जमणारच नाही , कारण आपल्याला त्याची सवय नसते , पण ही सवय लावता येते .थोडया थोडया वेळाच्या Deep work प्रॅक्टीस ने आपण पुढे चालून जास्त वेळ लक्षपूर्वक काम करू शकतो.
*******************************

(4)Use Routine to Ritualize

एखादया कामाला Ritualize करणे म्हणजे ? रोज त्या वेळ ला फक्त तेच काम करणे , जसं आपण उठलो कि , दात घासतो , नंतर व्यायाम करतो त्यानंतर अंघोळ् आणि नंतर इतर कामे , हे आपलं रूटीन आहे , त्यामध्ये काही वेगळ्या घडामोडी घडल्या , फोन आले किंवा इतर काही घटना घडल्या तरी आपण त्या घटनांकडे दुर्लक्ष करून ही कामे उरकून घेतो , त्यामुळे ही कामे पेंडींग राहत नाहीत आणि त्याचं समाधान रहातं आपल्याला , तसंच आहे जर आपण एखादं काम अगदी खोलात उतरून करतोय तर त्याला Rituals सारखं करावं ज्यामुळे ते अगदी उत्तम रित्या होतं.
*****************************

(5) Use Roosevelt dashes

आपण संत नाहीत कि अगदी तल्लीन होऊन Non Stop दहा – दहा तास काम करू शकतो , मग ??
याला उपाय असा कि , स्वतःला एक टाईम फ्रेम दया ( समजा एक तास ) आपल्याला एखादं काम त्याच टाईम फ्रेम मध्ये Complete करायचय ठरवा ! टायमर लावा , आणि एक तासभरासाठी फक्त सबकुछ छोडकर याच्या मागे लागा .
आता या तासात नो तहान , नो भूक , नो व्हाट्स अप , नो फेसबुक , फोन एअरो प्लेन मोडला टाकून काम चालू .
एक तास संपला कि , मग बाकीच्या गोष्टी करायच्या पण तोवर काही नाही . असे छोटे – छोटे,, एक _ एक तासाचे दोन , तीन सेशन करत करत काम साध्य करणे याला Roosevelt dashes म्हणतात .
एकदाच चार तास एकाग्रता करण्याऐवजी ,,, 1 – 1 तासाचे चार टप्पे करा .

******************************

(6) Get_Active_Rest

Deep work चा अर्थ जरी लक्षपूर्वक काम करणे असा असला तरी , यात पशू सारखे काम करणे असे अभिप्रेत नाही .
कोणतीही नवीन व्यक्ती फार झालं 90 मिनीटं लक्ष केंद्रीत करू शकते , त्यानंतर त्याची क्रय शक्ती कमी होते , हे नैसर्गिक चक्र आहे , त्याला ब्रेन अटेंशन सायकल म्हणतात , त्यामुळे 90 मिनीटानंतर आपल्याला थोडा दहा पाच मिनीटाचा ब्रेक घ्यावा वाटला तर अवश्य घ्या , . त्यामुळे पुढचे 90 मिनीट आपण जास्त फोकसने काम करू शकतो .

एकूणच या पुस्तकात लेखकाने हेच सांगायचा प्रयत्न केलाय कि , काम असं करा जे इतर कोणी कॉपी करू शकत नाही , जे आपल्या इतकं परफेक्ट कोणीही करू शकणार नाही , त्यामुळे आपण दुर्मीळ बनतो .

म्हणून तर मग cal Newport ने अजून एक पुस्तक लगेच लिहिलंय .
ज्याचं नाव आहे

#so_Good_They_cant_ignore_you”.

📌ही दोन्ही पुस्तके Amazon वर उपलब्ध आहेत , खरेदी करा आणि नक्की वाचा !

📌कधी पुण्यात आलात तर औंध सारख्या अनेक भागात ही पुस्तके अगदी रोड साईड दुकानात एकदम स्वस्त मिळतील , पण सध्याच नाही.

📌ही पुस्तके आज जरी मिळाली नाहीत तर , त्यांचे Audio Version,youtube वर तरी नक्की ऐका , कारण ,यामुळे पॉजीटीव बदल होतील.

https://www.facebook.com/groups/675025626396370/?ref=share

© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
आनंद पार्क, औंध,पुणे.
9518950764
office :9146101663

आपले आजवरचे लेख एकाच ठिकाणी वाचायचे असतील तर, तुमच्या मोबाईलमध्ये Google वर जा,
www.nileshkale.com
हे टाईप करा आणि तिथे सर्व लेख वाचा.

धन्यवाद.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *