उत्पादनाची किंमत अशी ठरवा .. सिंपल आहे .

*” किंमत ठरवावी / ठेवावी कशी ” ?*
©निलेश काळे .

pricing हा कोणत्याही बिझनेसचा असा मुद्दा असतो ज्यावर आपण चालणार का थांबणार ? हे अवलंबून असतं , काय केलं आणि कसं केलं म्हणजे आपलं पण नुकसान होणार नाही आणि ग्राहकाला पण लुबाडल्यासारखं वाटणार नाही ?

या साठी परत मॅनेजमेंटच्या क्षेत्रात जाऊन बघावं लागतं कि काय स्ट्रॅटर्जीज लावता येतील ?

तर चला आज शिकूया लोक कशा प्रकारे मार्केट मध्ये किंमत ठरवून पैसे कमावतायेत ?

*(1) Loss leading stratergy:*

ही स्ट्रॅटर्जी सध्या jio मुळे भलतीच फॉर्मात आलीये , मार्केट मध्ये नवीनच उतरायचं , इतर स्पर्धक देतायेत तशीच किंवा त्यापेक्षा बरी ऑफर दयायची अधिक किंमत ही भलतीच कमी ठेवायची , कधी _ कधी तर , उत्पादन खर्चापेक्षा कमी .
याने काय होतं तर स्पर्धकाकडचा सगळा ग्राहक वर्ग आपल्या कडे वळायला चालू होतो , आपल्याला रुपया प्रॉफीट होत नाही , मान्य …पण स्पर्धकाची पण दमछाक होते , त्याच्या कडे एकतर ग्राहक जात नाहीत आणि गेले तरी आपल्याकडे बोट दाखवून म्हणतात …. ” तो किती स्वस्त देतोय बघा ना , मग तुम्हाला काय झालं ? लुटायले फक्त तुम्ही ” .

झालं , त्याची इमेज डाऊन आणि आपला मार्केट शेअर अप्प .

म्हणजे आपण तोटा उचलतोय , पण मार्केट मध्ये शिरायला चान्स मिळतो ना ? .

यात आपल्या जवळ पुरेसं बजेट हवं , तग धरून रहायची तयारी हवी, कारण नंतर रेट वाढवता येतील .

पण तोवर बळ पाहिजे आणि ते बळ असलं कि . मग तुम्हाला मार्केट चे राजे !

*************************

*(2) Economic pricing* :

भारत हा प्राईस सेन्सेटीव देश आहे , इथे कमी भाव हा सर्वात मोठ्ठा प्लंस प्वाईट होऊ शकतो , त्यामुळे आपण स्वतः स्वस्तात खरेदी करणे , खर्च मर्यादीत ठेवणे , volume मध्ये माल विकणे या बाबी करून ग्राहकासाठी स्वस्ताची व्यवस्था करू शकतो .
एकदा का ग्राहकाला हे कळलं कि . इथे बऱ्यापैकी स्वस्त मिळतं कि झालं word of mouth ने ग्राहक येतात .
D-mart , Big Bazzar , Wal-Mart हेच तर करतात ना ?

****************************

*(3) Skimming pricing*:

सुरूवातीला रेट जास्त ठेऊन मार्केट मधुन पैसे कमावून घ्यायचे आणि त्यानंतर जसं ज्यां प्रॉडक्टची मागणी कमी होईल किंवा नवीन version काढायची तयारी चालू झाली कि हळूहळू त्या त्या मॉडेलची किंमत कमी करत जायचं आणि पुढे ते मॉडेल maturity level ला आलं कि मग बंद करून टाकायचं .
म्हणजे कमवून तर घ्यायचं आणि हळूहळू त्या वस्तूची किंमत कमी करायची .
Samsung किंवा Mi या कंपन्या आपल्या मोबाईल फोन्स साठी हीच स्ट्रॅटर्जी वापरतात .

*(4) Bundle Pricing* :

जेंव्हा आपल्याला जास्त प्रमाणात वस्तु विकायच्या असतात किंवा चालणारे आणि कमी चालणारे अशा वस्तु विकायच्या असतात त्या वेळी ही पद्धत वापरली जाते .
वाळलेल्या लाकडांबरोबर ओलं पण जळतं असं म्हणतात ना तशी ही पद्धत
कॅडबरी सिलेब्रेशन पैक , मॅक कॉम्बो , आंघोळीचे साबण अशाच स्ट्रेटर्जीवर विकतात , कोचिंग क्लास वाले 10th , 11th , 12th + NEET असं पॅकेज करून देतात ते बघीतलय ना आपण ?
या साठी स्वतःच उत्पादीत करत असलेले किंवा इतर कंपनीचे काही प्रॉडक्टशी टाय अप करून उत्पादने आणली जातात आणि त्याचं बंडल बनवून मग विकलं जाते ,
अशी ही स्ट्रॅटर्जी वापरली जाते !

*(5) Freemium stratergy

ही तर सध्या तुफान चालणारी स्ट्रॅटर्जी आहे , कँडी क्रश सागा खेळताना मजा येते ना ? पण त्यात पुढे पुढे कॉईन्स विकत घ्यावे लागतात , अगदी त्याप्रमाणेच .. काही फ्री दया आणि नंतर पुढे पुढे काही value added बाबींसाठी पैसे घ्या !
जसं आपल्या UDYOGNITI ग्रुप चे 10 whatsapp Group फ्रीच आहेत , पण ज्या ग्रुपमध्ये स्पेशल कामाचेच लेख येतात त्यासाठी 600 Rs दोन महिन्यासाठी दयावे लागतात .
कारण आपण Freemium Stratergy वर चालतो .
तेव्हा बघा , ही स्ट्रॅटर्जी काम करते , Google सारख्या कंपन्या सुद्धा जर ही पद्धत वापरत असतील तर यात दम आहे.

***************************
*(6) Dynamic Pricing

माणसांचे तोंड बघून रेट कमी जास्त सांगणे हे सगळी कडे होतं .
मार्केटमध्ये खरेदी करायला येड्यागबाळ्यासारखे जा ! समोरचा अगोदर आपली हैसियत जोखतो आणि कपडयांवरून , राहणीमानावरून किंमत जास्त सांगायची का कमी हे ठरवतो .
वकिल , पुजारी , काही डॉक्टर्स हे अशाच प्रकारे किंमत कमी जास्त करत असतात .
तसेच समोरच्याची वेळ कशी आहे , त्याला जास्त गरज आहे का ? किंवा तो अडलेला आहे का ? याचा अभ्यासकरून सुद्धा लोकं जास्तीची वसुली करतात , रात्रीच्या वेळी प्रवासी रिक्षा किंवा दिवाळीच्या काळात ट्रॅव्हल्स वाले जे अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात हे याच स्ट्रेटर्जी मुळे

*(7) Psycological pricing

999 , 499 किंवा 99 असे आकडे टाकून भ्रमीत करण्याचा जो प्रकार आहे त्याला Psycological Pricing म्हणतात .
बघा ना फक्त 1 रुपया मुळे … शे_ आणि हजार असा उच्चारात बदल होतो .
खूप लोकांच्या लक्षात पण येत नाही , असा आपल्याला डोळ्यादेखत उल्लू बनवण्याचा हा प्रकार आहे .
याच प्रमाणे कार कंपन्या सगळ्यात बेसिक व्हॅरियंटची Ex- showroom , without Accessories Price लिहून आपल्याला आकर्षित करतात आणि आपण जातो आणि बघतो तर चित्र वेगळच दिसतं .

*तो हुशारीने कोपऱ्यात काढलेला ‘ “स्टार” आपण बघतच नाही*

ही असते Psycological Marketing !

हे असे Pricing चे वेगवेगळे प्रकार , तुम्हाला जिथे गरज असेल तिथे वापरा , आणि नेटाने उद्योग करा !

असे लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा ! लिंक खाली आहे .

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890

© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
बिझनेस कन्सलटिंगसाठी संपर्क करा
उद्योगनिती पुणे ऑफीस 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *