उद्योजकांनी बघीतलेच पाहिजेत असे दहा चित्रपट

#Movies_for_Entrepreneur

#असे_चित्रपट_जे_व्यावसायिकांनी_बघायलाच_हवेत !

© निलेश काळे .

📌 मंडळी लोक डाऊन मध्ये खूप लोक पुस्तकं वाचायला लागलीत एखाद्या उद्योजकासाठी ही अत्यावश्यक असणारी गोष्ट आहे त्याचबरोबर सिनेमा ही देखील अत्यंत प्रभावी माध्यम आहे. हॉलीवूडमध्ये उद्योजकतेवर खूप चांगले चांगले सिनेमे बनतात

आणि विशेष म्हणजे हे सर्व सिनेमे युट्युब वर उपलब्ध आहेत.

📌 आता हे सर्व सिनेमे जरी इंग्लिशमध्ये असतील तरीही आपण ती समजून घेऊ शकतो, असे सिनेमा बघायचे तर एक याची पण आयडीया आहे, सुरुवातीला त्या सिनेमा संदर्भात हिंदीमध्ये समोरील युट्युब वर मिळेल ती समरी ऐका आणि त्यानंतर यूट्यूबला त्या सिनेमाचं हेडलाईन टाकून आपण तो सिनेमा बघायला चालू करा म्हणजे काय होईल? साधारणपणे हिंदीमध्ये त्याचा गाभा काय आहे हे लक्षात येईल ,आणि त्यानंतर मग सिनेमा बघून त्यातलं सार काय आहे ? हे समजून येईल !

📌 मंडळी सिनेमा ही गोष्ट आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम करून जाणारी आहे , त्याचा वापर फक्त आपण मनोरंजनासाठी न करता आपल्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणण्यासाठी करू शकतो आज मी अशाच पाच सिनेमांची यादी देत आहे द्या पण या लॉक डाऊनच्या पिरियड मध्ये नक्की बघावे

(1) #Founder:

मॅकडॉनल्ड्स या रेस्टॉरंटच्या चेन ला आज आपण सगळेजण ओळखतो , बऱ्याचजणांनी त्यात जेवण पण केले असेल , यांचा स्टोरी अशी कि मालक वेगळा आणि त्याला पूर्ण जगामध्ये पसरवणारा वेगळा !

ही नेमकी स्टोरी काय आहे ? कशी आहे याची सर्व कर्मकहाणी आपल्याला “द फाउंडर” या चित्रपटामध्ये मध्ये बघायला मिळेल !

(2) #Social_Network:

📌 सध्या हा लेख आपण ज्या ॲप वर वाचताय त्या फेसबुकचा जन्म कसा झाला ? मार्क झकरबर्ग ने एका पोरीवर असणाऱ्या प्रेमाच्या नादात जगातलं सर्वात यशस्वी सोशल नेटवर्किंग अॅप कसं बनवलं? याची रंजक स्टोरी आपल्याला द सोशल नेटवर्क या सिनेमांमध्ये बघा मिळेल.

📌हा सिनेमा मार्क झुकरबर्ग यांच्या आयुष्यावर आधारित आहे

📌 (3) #JOBS :

📌जगामध्ये आज घरी चा सगळ्यात चांगला मोबाईल फोन कोणता? हे जर कुणी कुणाला विचारलं .
तरी सहजपणे पहिल्या क्रमांकावर नाव येईल ॲपल, आज सगळ्यात जास्त कॅश कोणत्या एका कंपनीकडे असेल ? तर ती आहे अॅप्पल !

📌 या कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे JOBS.

📌 एके काळी सैन्फ्रान्सीस्कोच्या श्रीकृष्ण मंदीरातील महाप्रसादावर दिवस काढणारा व्यक्ती , कशा प्रकारे इतका प्रभावशाली उद्योजक बनला याची ही स्टोरी आहे .

📌 (4) #The_Pursuit_Of_Happiness :

ही पण एका सेल्समन ची रियल स्टोरी आहे , एका कंपनीची फ्लॉप प्रॉडक्ट असणारी मशीन विकण्याचा प्रयत्न करणारा सेल्समन , ज्याची बायको त्याला त्याच्या लहान मुलाबरोबर सोडून जाते , त्या अपयशापासून ते एक यशस्वी शेअर मार्केटर बनण्यापर्यंतची अशी मस्त स्टोरी असणारा हा सिनेमा ऑस्कर विजेता सिनेमा आहे ,जो नक्की बघावा .

(5) #Moneyball :

📌 Brad Pitt ची अदाकारी हा पण एक ऑस्कर विनिंग सिनेमा आपल्याला Out of the Box विचार कसा करायचा असतो हे शिकवतो .
आपल्याकडे चक दे ! हा एक हौकीवर आधारित सिनेमा आला होता . तसाच सेम हा देखील एका टिमच्या कोचने केलेल्या धडपडीवर आधारित असणारा सिनेमा आहे !

📌(6) #startup_com:

हा सिनेमा एका स्टार्टअपच्या “Rise& fall” ची स्टोरी आहे , अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली मध्ये जगातले सर्वोत्तम स्टार्ट अप्स बनले ,पण डॉटकॉम बबलच्या अत्यंत मंदीच्या काळात कशाप्रकारे , आंतरिक मॅनेजमेंटचा स्वार्थिपणा, लोभीवृत्ती एखादया स्टार्टअपमध्ये करू नये याचं सुंदर चित्रण स्टार्टअप.कॉम या सिनेमात केलं गेलंय .

📌(7) #TheBigShort:

2007- 2008 मध्ये अमेरिकत प्रचंड मंदी आली होती , त्या काळात तिथे अनेक अवाढव्य बँका बुडाल्या !
पण ज्यांनी या मंदीला ओळखलं होतं .
त्यांनी या वाईट परिस्थितीत पण चांगला नफा कमावला , अशा एकाच सिनेमात असणाऱ्या तीन वेगवेगळ्या स्टोरीज आपल्याला समांतर पातळीवर बघायला मिळतील .

📌 (8) #Enron_The_Smartest_Guys_in_the_Room :

ही एक डॉक्युमेंटरी फिल्म आहे .
Enron आणि दाभोळ वीज प्रकल्प हा विषय आपल्या मराठी माणसांसाठी नवीन नाही आणि Enron ही कंपनी काही साधी नव्हती .

परंतु भ्रष्टाचाराने या अवाढव्य अशा वीज निर्मिती कंपनीला कसं मातीत गाडलं ? एनरॉन च्या या अपयशातून एका व्यावसायिकाने काय शिकलं पाहिजे ? याचे वर्णन या डॉक्युमेंटरीत आहे

📌(9) #Thank_You_for_Smoking:

सिगारेट , तंबाखू , गुटका या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी घातकच आहेत , पण ज्यांचं करीयर , घर सगळं सिगारेटची विक्री करुनच चालतं त्यांचे साठी तर त्या सिगारेटची जास्तीत जास्त विक्री होणं चांगलंच आहे ना ?

या चित्रपटामध्ये विक्री आणि मार्केटिंग कशी केली जाते ?यावर फार सुंदर चित्रण केलं गेलंय .

📌आपल्याला सिगारेट ओढायला शिकायचं नाही पण मार्केटिंगची कला शिकायला काय जातंय ? म्हणून हा सिनेमा बघा !

📌 (10) #Becoming_warren_Buffett:

आजसुद्धा जगातला दोन नंबरची व्यक्ती , कित्येक उद्योजकांचे रोल मॉडेल , ज्यांनी स्वतःच्या गुंतवणूक करण्याच्या स्कील्स वर अमाप पैसा कमावला आणि तेवढयाच उदार अंतःकरणाने आपल्या संपत्तीचा 90% हिस्सा दान दिला .

अशा द ग्रेट वॉरन बफेट यांच्यावर आधारित हा सिनेमा !

वॉरेन बफेट आजही , त्यांच्या जुन्याच घरात रहातात , तीस वर्षापूर्वीच विकत घेतलेली कार वापरतात .

माणूस संपत्तीच्या पर्वतावर बसून सुद्धा साधं कसं राहू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे , वॉरेन बफेट !

📌Google वर जर आपण टॉप सिनेमांची यादी जर काढली तरी पहिल्या दहा – वीस मध्ये वरील सिनेमा नक्की मिळतील .

📌तेंव्हा या निवांत काळात आपण वरिल सिनेमे नक्की बघावे .

#Enioy_करा .

©निलेश काळे ,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट,
आनंद पार्क ,
औंध ,पुणे .
9518950764 .

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *