उद्योजकांनी रोजच्या कामाचं नियोजन कसं करावं हे सांगणारी Brian Tracy यांची टेक्नीक

#Business_Coaching”

“उद्योगात यशस्वी होण्याचा साधा नियम ”

© निलेश काळे .

“Eat the frog first ” या नावाचे ब्रायन ट्रासी या लेखकाचे जगप्रसिद्ध पुस्तक आहे , त्यात त्यांनी A,B,C ,D,E ही मेथड सांगितली आहे , तर काय आहे ही मेथड जरा समजून घेऊया !

आपल्या जवळ उद्याचे कामं करायला चोवीस तासंच असतात , त्यापैकी दिवसाचे तास फक्त बाराच असतात आणि आपण या बारा तासांचं योग्य नियोजन केलं तर जास्तीत जास्त प्रॉडक्टीव होऊ शकतो.

आपण बेडूक खाऊ शकतो का ? मांसाहारी असलो तरी !
ते किती irritating असू शकतं !
आणि जेवणाच्या पहिल्या घासाला बेडूक खावा लागला तर ?????
बाकीचं काहीही असलं तरी उरलेलं जेवण ,,, आपण शांतपणे करू शकतो का नाही ?

पण हेच आपण करत नाहीत , टाळाटाळ करतो Procrastination म्हणतात याला आणि हा सर्वात मोठा व्यावसायिक दुर्गण आहे .

Time Management मुळे कित्येकांच जीवन अख्खं बदलतं म्हणून आपल्याला हे शिकणं अती महत्वाचं आहे , आणि ही मेथड तेच शिकवते .

छोटया सवयी पासून सुरुवात अशी करावी !

उदयाच्या कामाची रात्रीच यादी बनवावी याला “To Do List ” म्हणतात , त्यात नको वाटणारे कामं जी , करावीच लागणार आहेत त्याला या यादीत A कॅटेगरीत ठेवावं , बाकी काहीही झालं तरी ही कामे सर्वात अगोदर घ्यावी . कितीही नको वाटलं तरीही , ही कामं जर आपण केली नाही त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात , जसं महत्वाच्या ग्राहकांना फोन करणे , बॉसने दिलेल्या असाइनमेंट पूर्ण करणे , रिपोर्ट तयार करणे . ही कामे करावीच लागतात नाही तर जगण्याचा प्रश्नच तयार होऊ शकतात म्हणून ही कामं अगोदर करावी .

*****************************

B: ही कामं आपण केली किंवा नाही केली तरी काहीsss विशेष फरक पडत नाही. म्हणून जो पर्यंत आपली A या कॅटेगरीतील कामे पूर्ण होत नाहीत तो पर्यंत B या स्वरूपाच्या कामाकडे बघायचं पण नाही . यामुळे काय होतं कि , आपलं A वरचं लक्ष कमी होत नाही , आपण distract होत नाही .
जसं e-mail चेक करणे , सहकाऱ्या बरोबर डिनरला जाणे , मित्राला Reply देणं ही असली कामं आपण नंतर करू शकतो कि .

**********************
C = या प्रकारची कामं केल्यानं फक्त आपल्याला आनंद मिळतो , ज्या कामांना पूर्ण केलं किंवा नाही केलं तरी त्याचा आपल्या Work life वर काहीही फरक पडणार नसतो ,
जसं मित्रांना whatsapp मॅसेज करून शुभेच्छा देणं , किंवा दुर च्या नातेवाईकांच्या फंक्शन ला अटेंड रहाणं इ .
पण असं आहे कि आपण आपल्या दिवसाचा 50% वेळ इथेच खर्च करत बसतो आणि महत्वाच्या कामाकडे पूर्ण अथवा अर्धवट दुर्लक्ष होतं .
पण A कडे दुर्लक्ष म्हणजे मोठ्ठी चुक
म्हणून A आणि B प्रकारची कामे झाल्या नंतरच C प्रकारच्या कामाकडे बघावे तो पर्यंत काही संबंध नाही असे समजा
******************************
D = या प्रकारातली कामं आपण deligate करू शकतो , म्हणजे आपण करण्या ऐवजी इतरांकडून करवून घेऊ शकतो , ती कामे तुम्ही केली काय ? आणि इतर कोणी केली काय विशेष फरक पडणार नसतोच मुळी , मग अशा प्रकारच्या कामात आपण आपला वेळ का खर्च करावा , तोच वेळ आपण A या कामासाठी वापरू शकतो ना ?
जसं बँकेत चेक ड्रॉप करणं , काही झेरॉक्स कॉपी तयार करून घेणं , अशी टेक्नीकल विशेष स्कील न लागणारी कामं दुसऱ्यांवरच सोपवावीत , त्यांचा वेळ आणि त्यांची एनर्जी वापरून आपला फायदा करून घ्यावा , असं साधं सोप्पं गणित आहे .

****************************

E = आपल्या To Do list मध्ये अशी काही कामे असतात कि , जी आपण किंवा आपल्या स्टाफ ने पूर्ण पणे टाळली तरी काही फरक पडत नाही .
पण अशा कामांसाठी पण आपण आपला वेळ खर्च करत बसतो आणि आपली A किंवा B ही कामे पेंडींग राहतात .
” दादा ही कामे टाळून टाका ” यांच्या मुळे आपल्या आयुष्यात काही फरक पडणार नाही ये .. तेंव्हा चक्क दुर्लक्ष करा .

**************************

Brian Tracy चं हे पुस्तक Time Management मधील बायबल मानलं जातं , यात त्यांनी सांगितलेली तत्वे ही B-Schools मध्ये मॅनेजमेंट च्या विद्यार्थ्यांना शिकवली जातात , त्यामुळे Amazon किंवा offline कुठेही हे पुस्तक विकत घ्या , आणि वाचा , अभ्यास करा , फारच पॉजी टीव impact करेल हे पुस्तक आपल्यावर .

शुभेच्छा .

© निलेश काळे
उद्योगमिती बिझनेस कन्सलटंट
Anand Park.Aundh,Pune .
9518950764,

Office: 9146101663 .

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *