एका रशियन गणितज्ञाने दिलेला फॉर्मुला वापरा : आणि व्यवसाय वाढवा.

“Ansoff matrix ”

© निलेश काळे

Ansoff Matrix ,,, हे एक बिझनेसचं तत्व आहे ( ज्याला Tool असं म्हणू ) जे जगातल्या सर्व मॅनेजमेंट स्कूल मध्ये शिकवलं जातं , या tool चा वापर करूनच कोणतीही कंपनी आपल्या विस्ताराची स्ट्रॅटर्जी प्लान करते .
तर ,,,,
समजून घेऊया या tool ला .
हा सिद्धांत H. Igar AnsOff या गणितज्ञ आणि बिझनेस मॅनेजर ने 1957 मध्ये विकसीत केला,जो कि पहिल्यांदा Harward Business Review मध्ये प्रकाशीत झाला होता , तेव्हापासून हा सिद्धांत Business Topic म्हणून Management studies मध्ये आहे .
या matrix मुळे बिझनेस ओनर्स आणि मॅनेजर्सला रिस्क आणि ग्रोथ चं अनालिसीस नीट _ नीटकं करता येतं .

याचे चार भाग आहेत , जे कि आपण टप्प्याटप्प्याने पाहुया .
1) Market penetration
2) Product developement
3) Market developement
4) Diversification .
***************************

(1) MARKET PENETRATIOIN :

हा पहिला आणि सर्वात सोप्पा प्रकार .
ही स्ट्रॅटर्जी असं सांगते कि , तुम्हाला मार्केट मध्ये उपलब्ध असलेल्या प्रॉडक्ट सारखाच प्रॉडक्ट तयार करून , त्याच रेटला आणि त्याच वजनाप्रमाणे विकायचा असतो .
म्हणजे काय ? तर चार जण जर अगोदरच तो प्रॉडक्ट विकत असतील तर आपण पाचवे .
म्हणजे अगदी काहीच रिस्क नाही , लोकांना तो प्रोडक्ट माहित पण असतो आणि विकत घेण्याची सवय पण असते , आपल्याला काय करायचं आहे तर … ABC नावाचा ब्रँड रिप्लेस करून XYZ नावाचा ब्रँड वापरायला दयायचाय ,,, जसं कि आज Bisleri ची बॉटल मिळाली नाही कि आपल्याला Kinley , Aquafina नाहीतर कोणताही लोकल ब्रँड चालतो , म्हणजेच काय झालं कि , जो सेगमेंट त्या Bisleri ने तयार करून ठेवला होता , तिथे ही दुसरी मंडळी अक्षरशः घुसली ( Penetration यालाच म्हणतात ) आणि जो वाटा Bisteri ला मिळाला असता , तो यांनी मिळवला .

आज मार्केट मध्ये बघा ना ,,, एकाचं बघून दुसरा व्यक्ती दुकान टाकतो , सगळं जशाला तस्सं कॉपी करतो आणि पहिल्याला टक्कर देतो .
व्यवसाय उभा करण्याची / वाढवण्याची ही एक पद्धत आहे .

तर ही कशी करावी लागते ?

A) पहिल्यांदा रेट थोडा कमी ठेवा आणि ग्राहक आपल्याकडे बळवून घ्या रेट कर्मा ठेऊन ग्राहक वळवणे ही नॉर्मल बाब आहे,आणि ही टेक्नीक यशस्वी पण आहे .
B) आपल्या स्वतः च्या उत्पादना करिता दणकट डिस्ट्रीब्युशन आणि मार्केटींग नेटवर्क तयार करा .
C) आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रातल्या आपल्या स्पर्धकालाच विकत घ्या ( जसं Bajaj Electronics ने Nirlep ला विकत घेतलं )

आता बघा हे कसं घडतं विशेष करून mobile operators आपले प्लान कमी जास्ती करून,आपला हिस्सा वाढवण्याचा सारखा प्रयत्न करत असतात , यालाच Ansoff matrix मध्ये market Penetration म्हटलं जातं

*****************************

(2) PRODUCT DEVELOPEMENT FOR EXISTING MARKET :

या प्रकारच्या स्ट्रॅटर्जी मध्ये,तुम्ही ज्या मार्केटला सध्या व्यवसाय करताय त्याच मार्केटसाठी नवीन प्रोडक्ट डिझाईन आणि डेवलप केला जातो .
म्हणजे काय तर जसं Bajaj ज्या लोकांना 1990 च्या काळात Chetak Scooter विकायचे त्याच घराला ते आज pulsor किंवा Dominor सारख्या सुपर बाईक्स विकतात .
म्हणजे काय ?
तर जुन्याच ग्राहकाला किंवा ग्राहकवर्गाला नवीन उत्पादन बनवून विकणे .
ही Ansoff ने सांगितलेली दोन नंबरची स्ट्रॅटर्जी आहे , जी कि ,, सोप्पी आहे,फक्त यात खालील बाबी कराव्या लागतात .

(a) मार्केटला सध्या जे प्रॉडक्ट उपलब्ध आहेत,त्यापेक्षा सरस किंवा वेगळी उत्पादने आणावी लागतील, जेणेकरून आपल्याला वेगळा ग्राहक वर्ग मिळेल .
(b) एक तर आपल्या स्पर्धक कंपनीकडून त्याचे प्रॉडक्ट विकत घ्यावे लागतील जसे कि , Coca-Cola चा slice हा मेंगो ड्रिंक ब्राण्ड ट्रॉपीकाना ने विकत घेतला आणि Tomco या टाटा ग्रुपच्या कंपनीकडून Moti हा साबण Unilever ने विकत घेतला , किंवा
(b) इतर कोणत्या कंपनी बरोबर स्ट्रेटर्जीक पार्टनर शीप करावी लागेल , जशी Suzuki ने Maruti बरोबर केली यामुळे काय होतं कि , लोकल पार्टनरचे नेटवर्क आणि चॅनेल दुसऱ्या पार्टनरला रेडीमेड वापरायला मिळते .

अशा प्रकारे नवीन प्रॉडक्ट आपण आहे त्याच मार्केट मध्ये लॉंच करू शकतो,जसं आता इलेक्ट्रीक वाहने तयार होताहेत,पण त्यांना ग्राहक वर्ग जुनाच असेल याला म्हणतात product Developement for Existing market .

**************************

(3) Market Developement for Existing product :

हा तिसरा प्रकार ज … रासा अवघड आहे,कारण का ?
तर आपल्याला आपला जुनाच प्रॉडक्ट नवीन मार्केटला घेऊन जायचं असतं.

जमतं का हे ?

हो … जमतं .. थोडा त्रास होतो , पण जो पर्यंत आपण आपला comfort zone सोडून नवीन एरिया मध्ये जाणार नाही,तो पर्यंत आपल्या उद्योगाची वाढ कशी होईल .
उदाहरण बघा . अहमदाबादचा वाघ बकरी चहा,आणि कानपूर चे घडी डिटर्जट पावडर .. त्यांनी त्यांचं लोकल मार्केट अगोदर काबीज केलं , तिथे लिडर झाले आणि त्यानंतर पूर्ण भारतात पसरायला चालु झाले .
म्हणजे काय तर त्यांनी त्यांचा जुनाच प्रॉडक्ट नवीन भूभागात लाँच केला .
कधी – कधी एखादा आपल्याला माहितीच नसणारे उत्पादन कंपन्या नवीनच लाँच करतात आणि करतात मार्केटला काबीज .
या प्रकारासाठी काय करावं लागतं ?
तर
(a) नवीन भूभागातील लोकांसाठी तो ब्रॅण्ड किंवा तो प्रॉडक्ट नवीनच असतो,त्यामुळे तिकडे आपल्याला अगदीच मोनोपली मिळू शकते .
(b) ज्या फर्मकडे त्या त्या प्रकाराची मालकी असते ,,, त्या त्या फर्म ला त्याचा फायदा होतो

(c) परकीय देशात Expansion करणे यात येते .

*****************************

(4) Diversification : New Product for New market :

हा प्रकार सर्वात अवघड .
का ?
तर नवीन एरियात जाऊन , त्या एरियासाठी नवीन प्रॉडक्ट डेवलप करणं एवढं सोप्पं नसतं .
बघा भारताच्या Driving condition वेगळ्या आहेत,त्यामुळे Kia,Jeep सारख्या कंपन्यांनी इकडे येण्या अगोदर भारताला सुट होतील अशीच वाहने बनवली.

McDonald’s जगात कुठेही Pure Veg उत्पादने बनवत नाही , पण त्याला भारतासाठी pure Veg उत्पादने बनवावी लागली कारण त्यांना जाणवले कि इथे एक मोठा वर्ग फक्त शाकाहारी लोकांचा आहे .

या Diversification ला पण दोन प्रकारात करता येतं

(1) Related Diversification : म्हणजे सध्या आपण ज्या फिल्डमध्ये काम करतोय,त्याच फिल्डमधे एखादा नवीन प्रॉडक्ट तयार करून नवीन एरियात घेऊन जाणे,जसं लेदर बुट बनवणाऱ्या कंपनीने लेदर जॅकेट अथवा लेदर वॅलेट तयार करणं.

(2) Unrelated diversification : याचा अर्थ आपण ज्या एरियात काम करतो ते सोडून वेगळाच प्रॉडक्ट बनवणे जसं Miraj या तंबाखू बनवणाऱ्या ब्रँण्ड ने नमकीन आणि शेतीत ले पाईप बनवायला चालू केलं
आणि त्यांचा स्वतःचं लोकल मार्केट सोडून इतर मार्केट कॅप्चर करायला चालू केलं .

याला म्हणतात Diversification:

वरिल थेअरी कोणताही नवीन उद्योजक व्यवसाय चालू करताना वापरू शकतो आणि ती वापरावी .

हे MBA च्या अभ्यासक्रमातील ज्ञान आपल्याला उपलब्ध होतच आहे , त्याचा फायदा करून घ्या मोठ्ठे व्हा !

©निलेश काळे .
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट,
आनंद पार्क,औंध,पुणे.
whatsapp / 9518950764

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *