एका Housewife ने सुरु केलेली कंपनी कशी बनली? McDonald’s,KFC, Pizza Hut ची मेन सप्लायर

611 Views

आज एका अशा कंपनीबद्दल वाचा,जी कंपनी McDonalds, KFC, Pizza Hut Cadbury सारख्या कंपन्यासाठी मटेरियल पुरवते.

रू 30O इतकं सुरुवातीचं भांडवल, व्यवस्थित ट्रेनिंग घेण्याची,शिक्षण घेण्याची तयारी आणि फिल्डमध्ये असणारी पॅशन,या गोष्टीमुळे एका महिलेने,आपल्या घराच्या किचनमध्ये सुरू केलेली कंपनी ते 60 देशांमध्ये, एक्सपोर्ट करणारी,शेअर बाजारात लिस्टेड कंपनी कशी बनली?
याचीच ही स्टोरी.

“Cremica.” ज्याचा हिंदी उच्चार “क्रिम का” असा होतो,या ब्रॅन्डची ही स्टोरी.

या भारतातल्या 5 नं बिस्कीट कंपनीची सुरुवात,श्रीमती रजनी बेक्टर यांनी लुधियाना पंजाब,मध्ये आपल्या हवेलीच्या पाठीमागील एका छोट्या जागेत केली.

प्रत्येक inspirational story मध्ये असतो,तसा गरिबीतुन संघर्ष वगैरे या स्टोरीत नाही,परंतु सतत संशोधन आणि उर्मी या बाबी आहेतच.

रजनी बेक्टर यांचे वडिल हे आत्ताचा पाकिस्तान आणि पूर्वीचा भारतात सरकारी अधिकारी होते, जे फाळणीनंतर भारतात पंजाबमध्ये आले,त्यामुळे सरोजजींचा विवाह इथेच 17 व्या वर्षी झाला.

त्यांचं शिक्षण अर्धवट राहिलं होतं,पण रजनी बेक्टर यांनी लग्नानंतर शिक्षण चालु केलं, पंजाब युनिवर्सिटीत फुड एन्ड डेअरी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला,तिथे त्यांना चांगले मेंटर्स भेटले बेसीक्स पक्के झाले .

आईसक्रिम ही त्यांची स्पेशॅलिटी,तो पर्यंत त्यांना मुलं झाली होती, स्वतःचं शिक्षण पण चालु होतं.

मुलं मोठी झाल्यानंतर यांनी मुलांना मसुरीला बोर्डिंग स्कुलला ठेवलं, आणि 1978 मध्ये,आईने दिलेल्या 300 रूपयातुन पहिला ओव्हन घेतला.

या ओव्हनमध्ये केक बनवून, आपल्या ओळखीच्या लोकांमधे मित्रांमध्ये विकणे हा त्यांचा पहिला व्यवसाय होता.

त्यानंतर रजनी मॅडम यांनी कॉलेजमध्ये शिकलेल्या आईसक्रिम ट्रेनिंगचा वापर करून आईसक्रिम बनवायला चालू केलं.

त्यामध्ये वेगवेगळ्या फ्रुट फ्लेवरचा समावेश करून प्रयोग केले आणि बघता बघता,त्यांच्या बेकरी प्रॉडक्टत् केक प्रमाणेच आईस्क्रीम देखील लोकांना आवडू लागले,त्यांचं काम वाढलं आणि त्यांनी त्यांच्या नवऱ्याकडून वीस हजार रुपये लोन घेऊन आईस्क्रीम बनवण्याची मोठी फॅक्टरी सुरू केली,आता लुधियाना च्या प्रत्येक लग्नांमध्ये यांच्या आईस्क्रीम जाऊ लागल्या.

यांच्या प्रॉडक्टसचा मुख्य घटक क्रिम असल्याने , म्हणुनच या कंपनीचे नाव “क्रिम का” असं ठेवण्यात आलं .

📌 स्ट्रिक्ट क्वालिटी कंट्रोल, उत्तमोत्तम प्रॉडक्ट,सतत संशोधन आणि वेगवेगळे प्रयोग करण्याची तयारी,यामुळे त्यांची ख्याती पुर्ण पंजाबमध्ये पोहचली,

कंपनीचे मार्केट 1980 च्या दरम्यान यांच्या प्रॉडक्टसची मागणी अफाट वाढली, अक्षय आणि अनुप या त्यांच्या मुलांनी कंपनी जॉईन केली, तिथुन पुढे त्यांचा प्रवास जोरात सुरु झाला.

त्यांचा मुलगा अक्षय बेक्टर यानी 1989 मध्ये त्यांच्या कंपनीत ऑटोमॅटीक ब्रेड मेकिंग प्लान्ट लावला आणि त्यामुळे Cremica ची स्पीड आणखीनच वाढली.

#jackpot: परदेशी कंपन्या जेव्हा आपल्या भारतात येतात, तेंव्हा त्यांना इथल्या सप्लायर कंपन्यांचा सपोर्ट लागतो, असाच जॅकपॉट Cremica ला लाभला, McDonald’s जेंव्हा मध्ये भारतात आली, तेंव्हा ते तिथे इथे पार्टनर शोधत होते .
हा चान्स Cremica ला मिळाला, McDonald’s च्या उत्तर भारतातील आऊटलेटस साठी लागणारे बन्स, टोमॅटो केचप,लिक्वीड कच्चे मटेरियल पुरवण्याकरिता पार्टनरशीप मिळाली.

Quaker Oats या कंपनीसोबत मियोनीज,मिल्कशेक, वगैरे सप्लाय करण्याचा करार झाला,Pizza Hut,KFC आणि अशाच अन्य फ्रँचायजीज करता लागणारे जास्तीत जास्त रॉ मटेरियल क्रेमीका पुरवते .

पंजाबमध्ये ITC, Cadbury सारख्या कंपन्यांचे बिस्कीट्स देखील Cremica च्या प्लान्टमध्येच तयार होऊ लागली.

आज ही कंपनी Mrs bector speciality foods Ltd. या नावाने ओळखली जाते,कंपनीचे व्हॅल्युएशन 3500 करोड रुपये असून डिस्ट्रीब्युटर्सचं PAN india नेटवर्क असून 23 राज्यात, 644 डिस्ट्रीब्युटर्सचं नेटवर्क आहे,कंपनीचे 6 मॅन्युफॅक्चरिंग प्लान्ट आहेत त्यापैकी एक तर महाराष्ट्रात खोपोली इथे देखील आहे .

एका हाऊस वाइफने घरातून सुरु केलेली ही कंपनी आज जगभरातील 60 देशांमध्ये प्रिमियम बिस्किट्स, कुकीज वगैरे एक्सपोर्ट करते.

Cremica या कंपनीने B2C आणि B2B या दोन्ही सेगमेंट मध्ये आपलं वेगळंच स्थान निर्माण केलं याची दखल घेऊन भारत सरकारने श्रीमती रजनी बेक्टर यांना “पद्मश्री” या पुरस्काराने सन्मानित केलं .

आज बेक्टर फॅमिलीची तिसरी पिढी देखील बिजनेसमध्ये आहे.

रजनी बेक्टर या स्वतः जरी कंपनीच्या रोजच्या कामात नसल्या तरीही,त्यांच्या त्या व्हिजनमुळे Cremica ची वाढ होतच आहे.

या कंपनीबददल आपण अजून माहिती

www.Cremica.in या वेबसाईटवर माहिती घेऊ शकता .

या स्टोरीतून हे जाणवतं कि,घरातली पहिली व्यक्ती जेव्हा एखादा व्यवसाय सुरू करत असते,तेंव्हा त्याला थोडाफार त्रास होतो,परंतु पुढच्या पिढ्यांसाठी रस्ता मोकळा होत असतो.

म्हणून छोटा का होईना,एखादा बिजनेस आजच सुरु करा.

बिजनेसच्या कोणत्याही पार्टमध्ये मेंटरशीपची गरज पडल्यास,उद्योगनितीकडून प्रोफेशनल कोचिंग घ्या .

शुभेच्छा .
© निलेश काळे,
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंट्स ,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764.
Office :9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *