एक्स्ट्रा इन्कम मिळवण्यासाठी हे आहेत एकदम चांगले पर्याय एकदा वाचून बघा

1,280 Views

“Extra income कमावण्यासाठी हे आहेत चांगले पर्याय”

आपण जॉब करता आहात !पगार पण चांगला येतोय,सगळं छान छान आहे, पण दोन पाच हजार जास्त कॅश आली तर कोणाला नकोय ? पूर्वी नौकरपेशा असणारी मंडळी Lic अथवा पोस्टाची RD वगैरे एजंट बनुन कमवत .

आजकाल अनेक फसवेगिरी करणारे लोक स्वतःच्या जाहिरातीची सुरुवातच एक्स्ट्रा इन्कम मिळवायची संधी असे करतात परंतु खालील संधी या आपण आपल्या स्कील वापरून निर्माण करू शकता.

आताच्या नवीन युगात सुद्धा अनेक नवीन पर्याय खुले झालेतखालील काही पर्याय नक्की ट्राय करून बघा .

(1) CLOSING :

एखादया फर्मसाठी आपण ज्यावेळी ग्राहक मिळवून देतो,तो शेवटच्या टप्प्यात पैसे देऊन बुक पण करतो या स्टेजला क्लोजींग म्हणतात.
फक्त ग्राहकासमोर ऍड फिरवणे हा प्रकार प्रॉस्पेक्टींग मध्ये येतो,म्हणून यात जास्त पैसा नाहीये, पण डायरेक्ट कमिशन घेऊन शेवटचा व्यवहार पार पाडणे यात जास्त पैसा आहे .
अनेक क्षेत्रं आहेत ज्यामध्ये आपण कामं करू शकतो,यात डबल फायदा आहे, एकतर आपल्याला त्या फर्म करता Job करण्याची गरज नाही आणि आपण आपली नौकरी डिस्टर्ब करायची पण आवश्यकता नाहीये .
प्लॉट विक्री,लग्न जमवणे , शाळांकरिता ऐडमिशन्स देणे , सेमिनार्ससाठी पार्टिसिपंट्स देणे , वाहनांची खरेदी विक्री ,,,अशा डिलींग्स सध्या मार्केटला उपलब्ध आहेत.

**********************************

(2) Copywriting :

सध्या सोशल मिडियाचा आणि त्याच्यावर चालणाऱ्या पोस्टचा च जमाना आहे , . तुमच्याकडे शब्दांचं सामर्थ्य आहे का ? मग लोकं तुमच्यासाठी पैसे घेऊन उभे आहेत .

शब्दांनी दुनिया फिरते !

त्यामुळे जर आपण उत्कृष्ट कन्टेन्ट लिहू शकत असाल ! तर इंडस्ट्री त्यासाठी पैसा मोजायला तयार आहे .

सुरुवात फेसबुकवर वेगवेगळ्या विषयांवर आर्टीकल लिहीण्यापासूनच करा ,फ्री आर्टीकल्स,फक्त तुमचा नंबर सोडत चला ! बघा लोकांना तुम्ही ठळकपणे दिसू लागलात कि झालं .

लोक त्यांच्या सोशल मिडिया पोस्ट करिता तुमच्याकडून फ्री लांन्सींग कामे नक्की करुवून घेतील ,यासाठी काय लागतं ? तर फक्त एक चांगला फोन किंवा लॅपटॉप .

*************************************

(3) Tutoring :

पूर्वी असं मानलं जायचं कि ट्युशन म्हणजे , इंग्लीश , गणित , विज्ञान इतकंच , पण आजकाल अनेक असे काही भन्नाट क्लासेस चालतात कि त्याला मर्यादा नाही .
बघा आपण जॉबला आहात , पण आपल्याकडे असं स्कील आहे कि जे इतरांना शिकायचय ! त्यासाठी ते पैसा दयायला तयार आहेत .
जसं
गिटार , बासरी किंवा पियानो शिकवणे
पेंटींग शिकवणे
इतर देशातील किंवा राज्यातील भाषा I शिकवाणे
Online selling शिकवणे
ज्योतीष शिकवणे
कूकींग शिकवणे
इतकंच काय ?तर साडी कशा प्रकारे नेसावी या सारखे पण क्लासेस आहेत .
एकूणच काय ? तर आपला जॉब करत करत हे करता येऊ शकतं .

*************************************

(4) Used stuff selling :

Olx सारख्या कंपन्या फक्त जुन्या सामानाची विक्री करता यावी म्हणून उभ्या राहिल्या , एकाच्या बिनाकामाची वस्तु कोणाच्या तरी अत्यंत गरजेची असू शकते . त्यामुळे या मार्केटची स्टडी करा ! डायरेक्ट विकतच घ्या आणि मग निवांत विका !
कमीशन बेस्ड विकण्यापेक्षा असं विकण्यात जास्त फायदा राहू शकतो , आता फायदा जास्त म्हणल्यावर थोडी जास्तीची रिस्क पण येणारंच म्हणा ! पण हे चालतं .

************************************

(5) Reselling :

आपला मित्र वर्ग मोठा आहे ? त्यात आपलं नाव चांगलं आहे किंवा लोक आपल्याला मानतात तर मग Online चं घ्या आणि online चं विका , याला रीसेलिंग म्हणतात ,
यात ना तर पैसा गुंतवायची गरज य ना स्टॉक मेंटेंन करण्याची झंझट !
लोक लाखो रुपये कमवतात हे सगळे प्रकार करून

*************************************

(6) Social media management for others :

सोशल मिडिया हाताळणी एवढी अत्यावश्यक झालीये कि,सोशल मिडियावर आपण एक दिवस दिसले नाहीत तर गेले कि काय ? असं लोक गंमतीने विचारतात !
खरं आहे ते !
समाजात प्रभाव पाडत रहायचे असेल तर सोशल मिडिया रोज हाताळला पाहिजे,पण कित्येक लोकांना ते वेळेअभावी जमत नाही,मग ते आपला सोशल मेडिया इतरांना सांभाळायला देतात आणि अशा प्रकारे एका जणाला एक्सट्रा इन्कम ची संधी निर्माण होत असते.

(7) Digital ad creation

आपल्याकडे जर थोडी कलात्मकता असेल आणि आपण कोरल ड्रॉ किंवा फोटोशॉप मध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे डिझाइन्स बनवून देऊ शकत असाल तर आज जग तुमच्यासाठी पैसे घेऊन उभे आहे

यासाठी कोठेही जायची गरज नाही घर सोडायची गरज नाही फक्त सोशल मीडियाचा वापर करून सुरुवातीला स्वतःची जाहिरातबाजी करा आपण मार्केटमध्ये डिझाईन बनवण्यासाठी उपलब्ध आहोत हे मार्केटला दाखवून द्या स्वतःच्या डिझाइन्सचे काही सॅम्पल इतरांना पाठवत रहा आणि एक दिवस उजाडेल ज्या दिवशी लोक तुम्हाला एका डिझाइन साठी किमान दोनशे रुपये देतील

आज अनेक चांगले नावाजलेले डिझायनर व्यवसायिक जाहिरातीसाठी 500 रुपये प्रति डिझाईन आकारतात

तेव्हा अशा प्रकारे आपण आपला स्वतःचा एक नवीन अस्तित्व निर्माण करून वेगळ्या प्रकाराने पैसे कमवू शकता.

(8) Mentoring :

समाजामध्ये शिक्षकाला नेहमी महत्व आहे आणि जो कोणी आज शिकवायला तयार आहे त्याच्यासाठी विद्यार्थी उपलब्ध होतातच

पाश्चिमात्य देशांमध्ये मेंटेन हा प्रकार मोठ्या प्रमाणावर चालतो समजा आपल्याला एखाद्या क्षेत्रातलं भरपूर ज्ञान आहे आणि कोणीतरी या ज्ञानाचा वापर करून स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो तर स्वतःची पोझिशन मेंटर अशी करा.

मार्केटला जाहिरात करा आणि लोक तुमच्याकडे असणारे ज्ञान शिकायला येतील आणि पैसा पण देतील.

ही झाली आपण काय? आणि कसं करू शकतो ?याची शॉर्ट लिस्ट.

आपण रिटायर व्यक्ती असाल नोकरदार असाल व्यापारी असाल किंवा कोणीही असाल वरीलपैकी अनेक गोष्टी आपण आज सुरुवात करून त्यातून पैसे मिळवू शकता

नक्की प्रयत्न करा.

शुभेच्छा .
© निलेश काळे .
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
Aundh ,Pune ,
9518950764

श्री ओमकेश मुंडे सर : 9146101663

Default image
Nilesh Kale
Articles: 83

One comment

  1. Excellent

Leave a Reply