एक डॉलर किंमतचं प्लास्टिक,शंभर डॉलरला कसं विकायचं? यांचे कडून शिकावं.

#एक_डाॅलरचं_प्लास्टीक_75_डॉलरला_विकणारी_कंपनी

#LEGO

©निलेश काळे.

📌 “डेन्मार्क” हा तसा युरोप मधला अगदी छोटासा देश, या देशाची ओळख मोठ्या प्रमाणावर दूध आणि मांस उत्पादन करणारा देश असला तरीही या देशात अनेक ब्रांड विकसित झाले त्यापैकी महत्त्वपूर्ण ब्रांड म्हणजे “LEGO”!

📌 #शेतकऱ्याच्या_मुलाची_कंपनी :

या कंपनीचे संस्थापक Ole Christianson एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले, यांना लहानपणी बसून लाकूड कोरायची आणि त्यांच्या पासून वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प बनवण्याची आवड, घरची गरीबी खाणारी तोंड जास्त म्हणून Ole Christian यांनी लहानपणापासूनच लाकूड करून त्याच्यापासून काही ना काहीतरी वस्तू बनवून विक्री करायला चालू केलं , पुढे त्यांनी जर्मनीत जाऊन सुतार कामाचं प्रशिक्षण घेतलं आणि प्रोफेशनली वेगवेगळ्या प्रकारची खेळणी बनवायला चालू केले.

📌 हा काळ होता 1920 ते 1925 चा.

📌 त्यांनी पुढे अनेक छोट्या मोठ्या वर्कशॉपमध्ये सुतार म्हणून काम करून अनुभव मिळवला ,पण त्यादरम्यान देखील त्यांचं लाकडा पासून खेळणी बनवणे आणि विकणे हा छंद चालू होता.

📌 या दरम्यान लग्न झालं, चार मुले झाली आणि 1932 मध्ये त्यांची पत्नी वारली याच दरम्यान एक प्रचंड मोठी जागतिक मंदी आलेली होती, सध्याच्या काळामध्ये जसं मार्केट पूर्ण डाऊन आहे त्याचप्रमाणे ही फार भयंकर अशी जागतिक मंदी होती याला “ग्रेट डिप्रेशन” असं म्हटलं जातं.

आता यांचे उत्पादन म्हणजे लहान मुलाला खेळायचे खेळणे , जिथे लोकांना खायला पैसे नाहीत ती त्यांची खेळणी कोण विकत घ्यावी? पण तरीही Ole Christian मागे हटले नाहीत.

ते दारोदार जाऊन आपली लाकडी खेळणी विकायचे , यांची खेळणी अतिशय दर्जेदार असायची त्यामुळे लोक किमान तांदुळाच्या बदलला तरी खेळणी घेवून आपल्या लेकरांना खेळायला दयायचे याला वस्तू विनिमय म्हणलं जातं .

📌 1934 मध्ये ओले ख्रिश्चन यांनी आपल्या या व्यवसायाला ब्रँड नेम द्यायचं ठरवलं .

जेंव्हा आपण आपल्या व्यवसायासाठी एखादं Brand Name ठेवतो त्या वेळी आपला व्यवसाय स्थिर झाला किंवा तो आपला अधिकृत पैसे कमावण्याचं साधन झाला असं मानलं जातं.

Ole Christian यांनी LEGO हे नाव निश्चित केलं, LEGO याचा अर्थ Plays Well असा होतो.

📌 इथून पुढे त्यांची विक्री हळूहळू वाढत गेली, जसा व्यवसाय वाढला तसं त्यांनी एक छोटसं वर्कशॉप घेतलं त्याच्यामध्ये काही कामगारांना हाताखाली घेतलं आणि आपला खेळणी चा उत्पादने पूर्ण मार्केटमध्ये विकण्यासाठी वितरकांचे जाळे विणायला चालू केले , पण 1942 मध्ये त्यांच्या वर्कशॉपला मोठी आग लागली आणि त्यात त्यांचं वर्कशॉप पूर्णपणे खाक झालं .

पण ग्राहकाचा पाठिंबा होता म्हणून त्यांनी पुढे काही पैशाची उसनवारी करून काही स्वतःजवळचे काही पैसे खर्चून एक फॅक्टरी चालू केली आणि आता या फॅक्टरी मध्ये त्यांनी स्वतःच्या मोठ्या मुलाला मॅनेजर म्हणून नेमला.

📌 जेव्हा फॅमिली बिझनेसमध्ये नवीन पिढी ऍक्टिव्ह होते त्यावेळी काही नवीन प्रयोग करायला चालू करते ,आत्तापर्यंत यांचे 40 कामगार आणि 50 प्रकारचे खेळण्या झालेल्या होत्या.

बिजनेस चालू होता.

सन 1949 मध्ये डेन्मार्कच्या कोपनहेगन या शहरांमध्ये खेळण्यात विषयी एक एक्सपो भरला होता ,या एक्स्पोमध्ये क्रिश्चन हे गेले.

📌 जेव्हा जेव्हा उद्योगाविषयी कुठेही एक्सपो भरतात, त्या ठिकाणी आपल्याला जगात नेमकं काय चाललं आहे? हे शिकायला मिळतं !

📌म्हणून मित्रांनो जेव्हा कुठे आता हे कोरोना काळ संपल्यानंतर ,जेव्हा कुठे औद्योगिक प्रदर्शन आपल्याला दिसेल त्या ठिकाणी नक्की जा आणि नवीन ज्ञानाचा फायदा घ्या.

असा फायदा LEGO झाला, यांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा Building Bricks चं एक प्राथमिक स्वरूप बघितलं , त्या एक्स्पोमध्ये एका खेळणी निर्मात्याने वेगवेगळ्या प्रकारच्या Building Bricks चा वापर करून वेगवेगळ्या आकाराची खेळणी बनवता येऊ शकतात, अशी एक साधी कल्पना मांडली होती.

📌 गॉडफ्रेड क्रिश्चन त्याचे सॅम्पल घेऊन आपल्या कंपनीत आले आणि इथून पुढे आपण अशा प्रकारची खेळणी का करू नये ? अशी त्यांनी वडलांबरोबर चर्चा केली , निर्णय झाला आणि त्यांनी Automatic Building Bricks ला वेगळ्या रूपामध्ये आणून त्यापासून खेळणे बनवायला चालू केले , हा काळ साधारणपणे 1950 चा होता 1954 पर्यंत लेगो च्या एकूण खेळणी मार्केट पैकी फक्त 5% खेळणी या प्रकारच्या होत्या, कारण लोकांना नवीन प्रोडक्ट दिसला की, ते लवकर स्वीकारायला तयार होत नाही, परंतु उत्पादक जर या गोष्टीवर ठाम असेल त्याला जर विश्वास असेल तर यातून नक्कीच काहीतरी नवीन साध्य होऊ शकतात.

📌 1955 इंग्लंडमध्ये एक्सपो भरलेला होता त्या एक्सपोमध्ये गॉडफ्रेड यांची एका खेळणी निर्मात्या बरोबर चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये समोरच्याने असे मुद्दे मांडले,की पालकांना दरवेळी वेगवेगळी खेळणी घेणे आणि त्याच्यावर खर्च करणं हेच फार अवघड जात आहे ,दरवेळी नवीन डिजाईनचे खेळणी आली की ,त्या पालकांच्या डोक्याला त्रास होतो, मुलं हट्ट करून बसतात आणि मग याचा विपरीत परिणाम व्यवसायावर होत आहे.

डोक्यामध्ये चित्र स्पष्ट होतं,त्यांनी काही प्रिन्सिपल्स मांडली ही प्रिन्सिपल्स LEGO Principles म्हणून आजही मानली जातात.

📌1) खेळणी अशी बनवायची की त्याला खेळणारी मुलं कायम स्वरूपी वापरू शकतील.

📌 2 ) खेळणी तून सुद्धा मुलांच्या मेंदूचा विकास झाला पाहिजे

📌 3) सगळ्या वयोगटांच्या मुलांना ही खेळणी खेळता आली पाहिजे

📌अशाप्रकारे LEGO कंपनीची विजन स्पष्ट झाली आणि तिथून पुढे मात्र यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या “Automatic Building Bricks” बनवून आपली घोडदौड कायम सुरू केली .

📌1957 मध्ये LEGO ने नवीन प्रकारची आधुनिक ब्रिक बाजारात आणली,जी 2020 मध्ये आजही LEGO च्या सेट मध्ये आहे.

📌 1958 सालात त्यांचे वडील वारले आणि LEGO ने आपला लाकडी खेळण्याचा व्यवसाय पूर्णपणे बंद केला .

आता LEGO आणि प्लास्टिक हे एक समीकरण तयार झालं होतं ,ही कंपनी वेगवेगळ्या प्रकारचे खेळणी सेट बनवायची आणि या सेटच्या स्वरूपातच ही खेळणी मार्केटमध्ये विकली जायची 1960 ते 70 दरम्यान लेगो जगातील ब्रेक गेम बनवणारी सर्वात मोठी उत्पादक कंपनी बनली यांचा मार्केटमध्ये हिस्सा एवढा मोठा बनला की डेन्मार्कच्या एकूण जीडीपीमध्ये एक टक्के हिस्सा चा उत्पादन एवढा होता.

📌 1961 मध्ये LEGO ने अमेरिकेमध्ये एन्ट्री केली.

📌 परंतु ज्यावेळी आपण एखाद्या नवीन देशांमध्ये प्रवेश करतो ,तेव्हा त्या देशातील एखाद्या कंपनीबरोबर करार करून जर मार्केट ला उतरलो तर ते सोपं जातं.

हे तत्व आजही मार्केटमध्ये चालतय म्हणून LEGO ने Samsonite या कंपनीबरोबर करार केला

📌 Samsonite या कंपनीला आपण सुटकेसची कंपनी म्हणून ओळखतो ,परंतु ही कंपनी LEGO ची पार्टनर कंपनी आहे.

📌LEGO ने 1978 मध्ये आपल्या खेळण्याच्या सेटमध्ये मिनी फिगर द्यायला चालू केले, आपण जर कधी LEGO चा सेट बघितला असेल तर त्यामध्ये पोलीस/ डॉक्टर/ नर्स/ पोस्टमन/इंजिनियर/firefighter अशा छोट्या-छोट्या मानवाच्या प्लास्टिक आकृती असतात.

या प्रकाराला LEGO Mini figure म्हणलं जातं (2020 पर्यंत जवळपास पाच अब्ज मिनीफिगर बनवलेल्या आहेत )

📌 #Patent_issue :

1920 पासून व्यवसायात असलेल्या कंपनीच्या हातात , दुसऱ्याची का होईना ही Automatic Building Bricks चीआयडीया लागली होती , त्यांनी त्याचं पेटंट पण केलेलं पण,1981 मध्ये त्यांचं Expire झालं, आणि त्याच्याकडं जरासं लक्ष दिलं नाही,वेळेत परत Renew केलं नाही आणि बूम….

गोष्ट जेनरीक झाली……
हातातला एक्का गेला……

📌पण तरिही देखील LEGO ने मार्केटवर होल्ड ठेवलेलाच होता, त्यांचा बिझनेस ग्रेट होता,

“छोटया ब्रिक्सवर उभारलेला एक मोठा बिझनेस” !

📌 1992 पर्यंत बिझनेस तर चांगला होता ,पण ” Design- Patent” रिजेक्ट झाल्याने,मार्केटमध्ये “कॉपीकॅट” तयार झाले होते.

📌 ज्यावेळी असे “कॉपीकॅट” जास्त तयार होतात ,त्यावेळी मुळ बिझनेसमनचा बिझनेस नुकसानीत जायला लागतो आणि सेम Lego च्या हातातनं मार्केट जायला लागलं .

2004 पर्यंत यांचा तोटा 200 million पर्यंत गेला,आत्तापर्यंत या धंद्यांचं नेतृत्व ख्रिश्चयन फॅमिलीतच होते ,पण या नुकसानीनं सर्वांचे धाबे दणाणले,आणि पहिल्यांदा फॅमिलीच्या बाहेरचा CEO अपॉईंट केला गेला ,,,

“ज्यावेळी खांदे बदलतात ,त्यावेळी निर्णयप्रक्रिया बदलते “, या एका गोष्टीने LEGO ला दिवाळखोर होण्यापासून वाचवलं .

भलेही पेटंट रिजेक्ट झालं असलं, तरीही,त्यांची पुढची ऍक्शन कमाल होती.

Association with Greats :

LEGO ने स्टारवार्स,माईन क्राफ्ट , लॉर्ड ऑफ द रिंग्ज यांच्या बरोबर टाय-अप करून,लायसन्सड् गेमसेट आणले आणि मार्केट मधल्या “चिल्लर” स्पर्धकांबरोबर मात केली.

एका बिझनेसमन ने नेहमी असोसिएशन करिता तयार असायला हवंय, विचार करा, युती किंवा आघाडी करून सरकारे चालवता येतात तर बिझनेस काय चीज आहे?

Growth Growth Growth:

त्याच्या पुढची स्टेप म्हणून त्यांनी Disney Land च्या धर्तीवर आपले LEGO PARK उभे केले,

जगात आजपर्यंत असे 11 Theme parks यशस्वी पणे उभे आहेत.

मुळ व्यवसाय सोडून असं काही करणं देखील,फार फायद्याचं ठरतं, महाराष्ट्रात देखील, कित्येक व्यावसायिकांचे प्रायवेट पार्क्स आहेतच की?

2018 या सालात LEGO चा वार्षीक टर्न ओव्हर 5.8 Billion म्हणजे 40,000 कोटी होता .

2019 मधे हा कंपनी mattle ( बार्बी बनवणारी कंपनी ) आणि Hasbro या दोन्ही कंपन्यापेक्षा मोठी झालीये !

छंदातून >धंदा ,धंदयात >शोधक वृत्ती,धडपड करण्याची कला असं करत करत या कंपनीने ,”छोटया ब्रिक्सच्या जिवावर स्वतःचं मोठं साम्राज्य उभं केलंय,जे अजून कोणत्याच कंपनीला तोडता आलेलं नाही.

जे त्यांना शक्य झाले,,,, ते आपल्याला पण शक्य आहे…..,गरज आहे ती धडपडून उठण्याची.

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890/

शुभेच्छा.

© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764 .

आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी कोचिंग हवीये?तर कॉल करा,
श्री ओमकेश मुंडे सर :9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *