एक What’s app ग्रुप मधून उभी केली 2800 करोड वॅल्युएशन असणारी कंपनी

#Whatsapp_Group_ते_स्टार्टअप

#Dunzo: #हायपरलोकल_स्टार्टअप

© निलेश काळे

📌 आपण आजपण सोशल मीडिया ला, फक्त मनोरंजनाचे साधन म्हणून बसतोय , पण लोक यांच्यावर कुठपर्यंत जाऊन काय काय करतायेत? त्याच्याकडे आपल्या पूर्ण लक्ष पण नाहीये.

चला समजून घेऊयात एक अशीच स्टोरी …

एक व्हाट्सअप ग्रुप ते दोनशे पन्नास करोड रुपयांचा व्हॅल्युएशन असणाऱ्या एक भारतीय स्टार्टअप .

📌 या भारतीय स्टार्ट मध्ये गुगलची डायरेक्ट गुंतवणूक 80 करोड रुपयांची आहे

📌हे स्टार्टअप आज भारतातल्या सहा शहरांमध्ये आपली सेवा देते , ज्यामध्ये पुणे बेंगलोर दिल्ली गुडगाव हैदराबाद आणि चेन्नई ही ती शहरे आहेत.

📌तर याची कर्म कहाणी अशी आहे, “कबीर विश्वास” हा मुंबई युनिव्हर्सिटीचा इंजिनीअरिंगचा विद्यार्थी ,ज्याने NMIMS या अतिशय प्रतिष्ठित अशा मॅनेजमेंट स्कूलमधून आपली मॅनेजमेंटची डिग्री घेतल्यानंतर काही काळ Airtel मध्ये नोकरी केली.

आपण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेंव्हा कुठे नौकरीसाठी जातो, तेंव्हा तिथुन पैशासोबतच अनुभव पण घेत असतो, तसे कबीर बिश्वास यांना त्या ठिकाणी सेल आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंट याचा चांगला अनुभव मिळाला.

📌 त्यानंतर त्यांनी स्वतःचं Hiper नावाचा एक स्टार्टअप चालू केलं,,जे 2014 मध्ये Hike मेसेंजर ने विकत घेतलं.

📌 2014 मध्ये कबीर विश्वास बेंगलोरला शिफ्ट झाले, बेंगलोर ही स्टार्टअपची राजधानी मानली जाते. सहा महिने इकडे तिकडे रिकामं फिरल्यानंतर कुमार विश्वास यांना असं जाणवलं की,लोकांची त्याची पडीक कामे करणे जमत नाही, पडीक =चा अर्थ कमी महत्वाची कामे किंवा छोटी मोठी कामे.

लोक टू डू लिस्ट ( To do list वर एक लेख सेपरेट देईल ) मधील महत्त्वाचे काम करतात ,परंतु छोट्या मोठ्या कामांसाठी त्यांच्याकडे वेळ नसतो किंवा त्यांना ती करावीशी वाटत नाहीत .

📌 हा झाला पेन पॉईंट ( याच्यावर व्यवसाय उभे राहतात )

Pain point चा अर्थ अशी दुखरी बाजू ज्याच्यासाठी लोक पैसा मोजायला तयार असतात, फक्त कोणीतरी त्यांचं ते दुखणं हलकं करावं असं त्यांना वाटतं.

📌 त्यांच्या लक्षात तर आलं होतं की लोकांची ही कामे करून दिली तर, लोक त्याच्या बदल्यात पैसे नक्कीच देतील .

आणि या बिझनेस आयडिया वर त्यांनी काम करायला चालू केलं, पण सुरुवातीला एखादी वेबसाइट बनवण्याच्या ऐवजी त्यांनी एक व्हाट्सअप ग्रुप बनवला ,या व्हाट्सअप ग्रुप मध्ये,तुम्ही तुम्हाला करायचं असलेले काम सांगा >>कुठून किराणा आणून द्यायचा असेल >> मोबाईल रिपेअर करून पाहिजे असेल किंवा कुठलं कुरियर डिलिव्हर करायचा असेल अथवा गाडी दुरुस्त करून आणायची असेल, काही पण सांगा आम्ही ते करून देऊ अशी ती साधी सोप्पी सिंपल आयडीया होती.

📌 स्वतः एकटे कबीर बिश्वास हे लोकांचं काम फ्री मध्ये करून द्यायला लागले, काय होतं?? की आपण कोणतीही गोष्ट फ्री मध्ये करून दयायचं म्हटलं की, त्याला नाक मुरडतो, परंतु लक्षात घ्या मित्रांनो एखादी बिझनेस आयडिया टेस्ट करायची,असेल तर त्याच्यासाठी सुरुवातीला पैसे घेऊन चालत नाही.

काही दिवस ती गोष्ट फ्री मध्ये केली तर, त्याची टेस्टिंग होते, लोकं रिव्ह्यू देतात आणि आपली आयडीया चालू लागते.

आता थोडा खर्च होतो,ती बाब वेगळी .

Growth::

कबीर बिश्वासचं ,काम वाढू लागलं, मग त्यांनी काही स्वयंसेवी संस्थांमधून लोकांना पार्ट टाइम वर कामाला घेतलं आणि जून 2015 पर्यंत हे लोक दिवसाकाठी 70 कामे करू लागली.

Team::

कोणतेही स्टार्टअप हे एका व्यक्तीवर चालू शकत नाही ,म्हणून अंकुर अग्रवाल, दलविर सिंग आणि मुकुंद झा हे तीन नवीन फाउंडर Dunzo ला जॉईन झाले.

Funding: हा सगळा गेम व्हाट्सअपग्रुपच्या द्वारे चालू होता ,अशातच त्यांना 4.4 करोड रुपयांची फंडिंग मिळाली.

📌 फेब्रुवारी 2016 मध्ये स्वतःचे ॲप चालू केले,जेव्हा इन्वेस्टर लोकांना तुमची आयडिया पसंत येते,तेव्हा ही लोकं तुमच्या व्यवसायात फंडिंग करायला मागेपुढे बघत नाहीत आणि अशाप्रकारे Dunzo ला आठ राऊंडडमध्ये फंडींग मिळाली, पण सगळंच काही नीट का चालू होतं असं नाही,Dunzo एक रुपया कमाई करण्यासाठी 225 रुपये खर्च करत होतं ला, अशाप्रकारे कस्टमर मिळवण्यासाठी जो पैसा खर्च केला जातो त्याला बर्निंग ऑफ मनी असं म्हणलं जातं

Cashcrunch:

इन्वेस्टरचा का होईना ? पण एवढा पैसा खर्च केला की ,कधीना कधी कॅशक्रंच येणारच आणि दोन Dunzo ला मार्च 2017 मध्ये थोड्या दिवसांसाठी आपल्या सेवा बंद कराव्या लागल्या.. कारण?? त्यांच्याजवळ पैसा संपलेला होता .

📌 ज्यावेळेला, धंद्यात वाढ करण्याच्या नादामध्ये खूप जास्त पैसा खर्च करायला लागतो, तेव्हा गणित काही जुळत नाही आणि ही परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ लागते ,अशीच परिस्थिती यांच्याबरोबर झालेली ,पण यांची आयडिया भन्नाट होती आणि गुगल या कंपनीला भारतामध्ये हायपर लोकल स्टार्टअप चालू करायचं होतं !

📌 त्यांनी बघितलं की भारतामध्ये Dunzo ही कंपनी अथवा स्टार्टअप यांचं बिझनेस मॉडेल चांगलं आहे, आणि यांना सध्या पैशाची गरज आहे अशात डिसेंबर 2017 मध्ये गूगलने यांना 80 करोड रुपयांची इन्वेस्टमेंट दिली, फेब्रु 2021 मध्ये त्यांनी सिरीज E मध्ये 184 million उभे केले.

📌 Google फायदयात राहीलं कारण, गुंतवणूकीच्या बदल्यात गुगलने या स्टार्टअप चे 31% शेअर घेतले.

📌 एक फटका बसल्यानंतर या कंपनीच्या व्यवस्थापनात आणि सिस्टीम मध्ये खूप काही सुधारणा घडवून आणल्या आणि त्या वेळेपासून त्यांनी थोडा का होईना नफा मिळवायला सुरुवात केली.

📌 आज ही कंपनी एका महिन्यामध्ये/ 8 शहरांमध्ये मिळून 20 लाख डिलिव्हरी करते.

📌 यांची स्पर्धा ॲमेझॉन,स्विग्गी, आणि बिग बास्केट सारख्या मोठ्या स्पर्धकांशी आहे,तरीदेखील हे स्वतःचे वेगळेपण टिकवून आहेत आणि अतिशय यशस्वीपणे काम करत आहेत.

📌 आज आज ही कंपनी खालील सहा कॅटेगरीमध्ये आपली सेवा देते

(1) एखादा पार्सल पॉइंट A पासून घेऊन पॉइंट B पर्यंत नेऊन देणे ( अगदी ऑफीसच्या कपाटाची घरी विसरलेली चावी आणून देणे )

(2)रेस्टॉरंट मधून ऑनलाईन डिलिव्हरी आणून देणे.

(3) ऑनलाइन किराणा सामानाची डिलिव्हरी करणे.

(4) लोकल कुरियर ची डिलिव्हरी करणे.

(5) औषधांची डिलिव्हरी दुकानापासून रुग्णाच्या घरापर्यंत करणे.

(6) एखादी गोष्ट दुरुस्त करून घरापर्यंत पोहोचून देणे.

📌 या स्टार्टअपचं आजच व्हॅल्युएशन हे 200 million डॉलर्स एवढं आहे,

8 शहरांमधे 900 कर्मचारी काम करतात,

महिना 2 million डिलीवरीज करतात

या गेल्या लॉक डाऊन पासून यांची चार पट वाढ झालीये.

फक्त एक व्हाट्सअपग्रुप ते एक यशस्वी ऍप असा प्रवास यांनी स्वतःच्या हिमतीच्या, मेहनतीच्या, चिकाटीच्या जोरावर पूर्ण केलेला आहे.

📌 आपण असा विचार करत असतो की माझ्याकडे पैसा असता, तर मी व्यवसाय चालू केला असता, माझ्याकडे भांडवल असतं तर मी धंदा मोठा केला असता ,पण उद्योजकाचे वैशिष्ट्य आहे कि, त्याच्याकडे जे असतं त्यातच तो उद्योग चालू करतो, त्याला मोठा करत चलतो.

मित्रांनो आज व्हाट्सअप सगळ्यांकडे आहे या व्हाट्सअपच्या जीवावर अनेक व्यवसाय उभे राहिलेत, (आपले उद्योगनिती चे नेटवर्क एक What’s app group मधूनच सुरुवात झाले )Dunzo हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे.

📌 तेंव्हा हातावर हात धरून बसू नका ! हाताबरोबर डोक्याला कामी लावा ! यश येतंय,नक्की !

Important:

आज या दुसऱ्या लॉकडाऊन दरम्यान आपण बघत असाल,कि लोकांना सगळया वस्तू होम डिलीवरीने हव्यात,

जर आपण सेम टू सेम डिलीवरी मॉडेल चालू केलात तर खरंच ” सुपरहीट” व्हाल.

बघा,जमतंय का ते?

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890

शुभेच्छा तर आहेतच.

© निलेश काळे ,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट ,
आनंद पार्क,औंध, पुणे !
9518950764.

उद्योगनिती मधून आम्ही पर्सनल बिजनेस कोचिंग करतो,आपल्याला जर मोठं व्हायचं असेल?तर कोचिंग शिवाय पर्यायच नाही ! कारण? एकटं डोकं सगळा विचार करूच शकत नाही.

श्री ओमकेश मुंडे सर : 9146101663. यांना कॉल करा आणि आमच्या टेलीफोनीक कन्सल्टींगची माहिती घ्या!

Previous Post Next Post

2 thoughts on “एक What’s app ग्रुप मधून उभी केली 2800 करोड वॅल्युएशन असणारी कंपनी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *