एखादा प्रॉडक्ट किंवा सर्विस मार्केटमधून गायब का होते?

एखादा प्रॉडक्ट मार्केटमधून का गायब होतो?

Product life Cycle

📌 बरेच जण बोलताना म्हणतात , माणूस काय इथे कायमस्वरूपी रहायला आला नाहीये ? एक ना एक दिवस गाशा गुंडाळायचा आहे !

खरं आहे !

📌 अगदी सेम कोणत्याही उत्पादना बरोबर सुद्धा असतं,

तो प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणला जातो , लोक रांगा लावुन खरेदी करतात,थोडे दिवस तो असाच ढिकी-ढिकी चालत रहातो,आणि एक दिवस विक्री शून्य होऊन मार्केट मधून कायमस्वरूपी बाद होतो.

एखादा व्यवसाय किंवा तशा प्रकारचे व्यवसाय पूर्णपणे बंद होण्यापाठीमागे हेच एक महत्वाचे कारण आहे.

आपले कोणते उत्पादन किंवा सर्विस कोणत्या स्टेजमध्ये आले आहे ? ते जर व्यवस्थित कळले तर आपल्याला जिथे पाहिजे तिथे व्यवस्थित लक्ष केंद्रित करता येते.

तर चला समजून घेऊया कोणत्या कोणत्या स्टेजेस असतात प्रॉडक्ट लाईफ सायकलमध्ये.

काही लेखक याच्या चार किंवा पाच स्टेजेस सांगतात आपण इथे याच्या सहा स्टेजेस बघूया

1) Development
2) introduction
3) Growth
4) Maturity
5) Decline
6) *Death

******* Development *****

📌 _डेवलपमेंट ही स्टेज रिसर्च स्टेज आहे ,यामधे आपण ते उत्पादन मार्केटला आणलेलं नसतं, पण त्याच्यावर प्रयोग चालुच असतात , ज्याप्रमाणे सध्या कोरोनाच्या लसीवर संशोधन चालू आहे,ती ही स्टेज !

या स्टेजमधे आपल्याला त्या उत्पादनातून एक रुपया सुद्धा प्राप्ती होत नसते उलट संशोधन करण्यात , प्रोटोटाईप बनवण्यात , त्याला स्टॅन्डर्डाइज करण्यात खूप पैसा खर्च होत असतोय , पण जो व्यवसाय इथे पैसा खर्च करतो त्याला पुढे फार कमी अडचणी येतात ! कारण संशोधन करून नंबर 1 प्रॉडक्ट किंवा सेवा बाहेर येऊ शकते,म्हणून याला R&D phase सुद्धा म्हटलं जातं .

ही स्टेज जरा जास्त लांब काळ चालू शकते ,कारण ज्यावेळी एखादी नवीन गोष्ट मार्केटला आणायची असते, त्यावेळेला धीर , संयम हवाच असतो !
बरेच जण इथे गडबड करतात ,खूप घाई करतात ,कच्चा प्रॉडक्ट मार्केटला आणतात आणि फसतात ,त्यामुळे टेन्शन घेऊ नका ,वेळ लागला हरकत नाही पण रिसर्च निट नेटकाच करा.

****** introduction *******

📌 Product Life Cycle (PLC) मधील ही दुसरी स्टेज

📌 या फेज मध्ये आपले प्रॉडक्ट मार्केटला सादर केले जाते , इथे मार्केटिंगची टीम , मार्केटिंगफनल मधली पहिली स्टेज म्हणजे अवेअरनेस चालु करून Potential customer ( म्हणजे ती जनता जी उद्या आपला ग्राहक बनु शकते ) त्यांचे पर्यंत उत्पादनाची माहिती घेऊन जात असते.

आता या स्टेजला एक तर प्रॉडक्ट किंवा सर्विस नवीन असल्याने तितकीशी विक्री येत नाही पण हळूहळू विक्री वाढू शकते.

इथे वेगवेगळे मार्केटिंगचे फंडे ( जे आपण पुढे बघणार आहोत ) ते वापरून ग्राहकाला शिक्षित ( Educated) करण्याचा प्रयत्न करायला लागतो , तो जर यशस्वी झाला तर आपले उत्पादन पुढच्या स्टेजमध्ये जाते.

या स्टेजमध्ये आपल्याला मार्केटिंग आणि एडवर्टाइजमेंट साठी जोर लावायचा आहे.

तेव्हा आपले उत्पादन किंवा आपण देत असणाऱ्या सर्विसेस या पुढच्या स्टेजमध्ये जातील

********* Growth ******

📌 या स्टेजमध्ये ग्राहकांनी आपले उत्पादन किंवा आपण देत असणाऱ्या सर्विसेस या स्वीकारलेल्या असतात, याचा अर्थ असा की पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही येत असतं नफा वाढायला चालू होतो आणि आपलं काम पुढे असा आहे की हा जो स्पीड आपण घेतलेला आहे तो कायम ठेवायचा आहे.

📌 या स्टेजमध्ये आपल्या उत्पादना करता मार्केट वाढत असतं ,पैसा येत असतो याचा अर्थ असा की जेआपले स्पर्धक आहेत त्यांचादेखील नजरेमध्ये आपण येतअसतो ,त्यामुळे इथे स्पर्धा वाढायला देखील सुरुवात होते, त्यामुळे हा फॅक्टर आपण लक्षात ठेवला पाहिजे आणि त्यानुसारच आपल्या मार्केटिंगच्या पद्धती लावल्या पाहिजेत ग्राहकांना थोड्याबहुत ऑफर देऊन आपल्याकडे वळते केले पाहिजे.

📌 या स्टेजमध्ये आपण आपल्या उत्पादनासाठी वेगवेगळ्या डिस्ट्रीब्युटर्स ची नेमणूक करून घेतली पाहिजे किंवा वेगवेगळे विक्रीचे मार्ग ऑनलाईन असो की ऑफलाईन असो निवडून घेतले पाहिजेत त्यामुळेच उत्पादनाच्या विक्रीचा जोर वाढायला मदत होते.

या स्टेजमध्ये आपले उत्पादन जितके दिवस राहील तेवढा आपल्याला फायदा जास्त होतो म्हणूनच कंपन्या आपल्या उत्पादनाच्या पाठीमागे जाहिरातीचा जोर लावून त्याला सातत्यपूर्ण वाढवण्याचा प्रयत्न करतात.

********* Maturity ********

ज्या वेळेला आपले उत्पादन हे मार्केटच्या ओळखीचे होऊन जाते आणि ग्राहक त्याची खरेदी सातत्यपूर्ण रीतीने रोजच्या जीवनात करू लागतो त्या वेळेला या स्टेजला मॅच्युरिटी असं म्हणल जातं ,आता या ठिकाणी आपण स्पर्धा करून पुढे आलेलो असतो त्यामुळे स्पर्धकांचा प्रॉडक्ट आणि आपल्या प्रॉडक्ट यांची विक्री समसमान व्हायला लागते ,मग या ठिकाणी अवेअरनेस करत बसण्यापेक्षा इतरांपेक्षा आम्ही वेगळे कसे आहोत हे दाखवण्याची डिफरन्सीएशन स्ट्रॅटजी लावली तर फायदा होतो.

या स्टेज मध्ये कंपन्या जास्तीत जास्त प्रभावीपणे उत्पादन घ्यायला चालू करतात त्यांना मार्केटचा अंदाज आला असतो रॉ मटेरियल किती स्वस्त मिळू शकते याचा अंदाज आलेला असतो, त्यामुळे कंपन्या या स्टेजला आपल्या किमती थोड्या कमी करतात आणि आपला मार्केटचा शेअर वाढवण्याचा प्रयत्न करतात साधारणपणे ही स्टेज किती दिवस राहते? याचा ठोकताळा नाही काही उत्पादनांसाठी ही सहा महिने असू शकते तर काही उत्पादनांसाठी ही स्टेज साठ वर्ष देखील असू शकते .उदाहरणार्थ लक्षात घ्या फेअर अॅन्ड लवली हा हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड या कंपनीचा ब्रांड गेली चाळीस वर्ष मॅच्युरिटी स्टेजमध्ये आहे ,तरीदेखील त्याची विक्री काहीही कमी झालेली नाही.

_कोलगेट टूथपेस्ट या पेस्टला देखील मार्केटमध्ये येऊन अनेक वर्ष झालेली आहेत पण तरीदेखील हा प्रॉडक्ट सॅच्युरेशनकडे गेलेला नाही.

📌 असा आहे की ज्या वेळेला आपला प्रॉडक्ट मॅच्युअर होऊन जातो त्यावेळी त्याच्यामध्ये थोडेफार बदल करून आपण आपली स्पर्धा वाढवत ठेवू शकतो, उत्पादनामध्ये थोडाफार बदल करत राहणे, त्याचे नवीन वर्जन काढत राहणे ,त्याच्या पॅकिंग मध्ये बदल करणे ,थोडा फ्लेवर मध्ये बदल करणे ,या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण करत राहिलो तर लोकांना जूनं उत्पादन हे नवीन नवीन दिसायला लागतं ,म्हणून लोक त्याच्यामुळे बोअर होत नाहीत, हेच कारण आहे की मारुती सारखी कंपनी आपल्या जुन्या ब्रँडच्या कारचे फेसलिफ्ट वर्जन सातत्यपूर्ण रीतीने काढत असते.

📌 ही स्टेज कोणत्याही कंपनीसाठी किंवा व्यवसायासाठी सगळ्यात जास्त नफा देणारी फेज आहे म्हणून या फेजमध्ये कंपन्या किंवा व्यवसाय हे स्वतःचा विस्तार करतात त्या उत्पादनाची जास्त छेडछाड न करता त्याच्या जीवावर दुसरे नवीन उत्पादनाची रिसर्च अँड डेव्हलपमेंट करण्याची तयारी चालू करतात.

या स्टेजमध्ये आपली उत्पादन करण्याची क्षमता वाढते आणि निर्मिती करता होणारा खर्च कमी होतो म्हणून अनेक व्यवसाय ही स्टेज अतिशय जास्त दिवस कशी लांबेल याचा प्रयत्न करत राहतात.

********* Saturation *******

📌 या स्टेजमध्ये जास्तीत जास्त ग्राहक आपले उत्पादन वापरत असतात किंवा आपली सर्विस रोजच्या जीवनात वापरत असतात, म्हणजे जवळपास सगळ्या ग्राहकापर्यंत आपला उत्पादन पोहोचलेलं असतं ज्याप्रमाणे उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचलेला असतो त्याप्रमाणेच आपले स्पर्धक देखील आपल्या उत्पादनाची कॉपी करून मार्केटमध्ये त्यांचे उत्पादन घेऊन आलेले असतात,

📌 एका लिमिटेड मार्केटमध्ये अनेक स्पर्धक सारखे दिसणारे प्रॉडक्ट घेऊन आल्यामुळे मार्केटमध्ये एकच तीव्र स्पर्धा सुरू होऊन जाते ,तिथे लोकांच्या लक्षात येत नाही की नेमकं चांगला कोण आहे? आणि वाईट कोण आहे? जुना कोण आहे? आणि नवा कोण आहे?

जवळपास सगळ्या उत्पादनांच्या किमती यासारख्या होऊन गेलेल्या असतात ,त्यामुळे मग या स्टेजमध्ये वाढ होत नाही, आणि विक्रीची घट पण होत नाही.

म्हणजे इथे उत्पादन एकदम स्थिर होऊन जातात आणि अशी स्थिरता व्यवसायांसाठी घातक असते लक्षात घ्या ,ज्यावेळी बिसलेरी आपल्या पाण्याची बॉटल घेऊन मार्केटमध्ये आली होती त्यावेळी त्यांनी खूप पैसे कमावले पण आज दिसली सारख्या दिसणाऱ्या पाण्याच्या बाटल्या या प्रत्येक गावांमध्ये 2-4 प्लांटमध्ये तयार होतात याचा अर्थ हे मार्केट सॅच्युरेट झालं आहे

📌 पूर्वी अमृततुल्यांची संख्या कमी होती परंतु ज्या प्रकारे हा प्रॉडक्ट मार्केटमध्ये वाढू लागले त्याप्रमाणे स्पर्धा पण वाढली, आणि आज कंडिशन अशी झालेली आहे की अमृततुल्य मार्केट सॅच्युरेटट बनून गेले आहे , इथे प्रत्येकजण आपापल्या नावाचा अमृततुल्य काढू लागला आहे मग नवीन जो कोणी नवीन उतरत आहे त्याला पैसे कसे मिळणार? तो तर नुकसानीतच जाणार ना !

📌 या स्टेजला differentiation करून दाखवावं लागतं,स्पर्धा तीव्र होत गेल्याने किंमती कमी कराव्या लागतात , जास्त ऑफर दयाव्या लागतात , प्रमोशन वर पैसा खर्च करावा लागतो.

📌 हे जर केलं नाही तर मात्र उत्पादन पुढच्या स्टेजमधे जातं.

********* Decline ******

दुर्दैवाने जर आपला उत्पादन मार्केट ची पहिली किंवा दुसरी चॉईस बनवू शकलं नाही तर आपल्याला वाढत्या तीव्र स्पर्धेमुळे या स्टेजला सामोरं जावं लागू शकतं.

या स्टेजमध्ये उत्पादनाची विक्री वरचेवर कमी होऊ लागते आपल्या उत्पादनासाठी पर्यायी उत्पादने मार्केटमध्ये उपलब्ध होऊ लागल्यामुळे ग्राहक आपल्या उत्पादनाकडे दुर्लक्ष करू लागतो.

या स्टेजमध्ये अनेक कंपन्या स्वतःचा व्यवसाय विकून टाकतात किंवा आपल्या प्रॉडक्ट लाईन ला पूर्णपणे नवीन बनवतात जी उत्पादने बंद करता येणे शक्य नाही अशा उत्पादनाची पॅकेजिंग एडवर्टाइजमेंट हे सगळं सगळं नवीन बनवतात नवीन वेगवेळ्या मार्केटमध्ये उतरण्याचा प्रयत्न करतात.

हा त्या उत्पादनासाठी शेवटचा चान्स असतो,जर इथुन तो प्रॉडक्ट सटकला तर तो प्रॉडक्ट बंदच करून टाकावा आणि परत रिसर्च करून वेगळे उत्पादन बनवण्याचा प्रयत्न करावा.

जर इथुन उभारी घेतली नाही,असं केलं नाही तर ते उत्पादन किंवा तो व्यवसाय बंद करण्याची खेरीज पर्यायच उरत नाही.

अशाप्रकारे एखाद्या उत्पादनाची लाईफ सायकल हा चाप्टर आपल्याला समजला असेल ,तो स्वतःच्या व्यवसायांमध्ये अभ्यासा आणि त्यानुसारच कोणत्या उत्पादनावर किती खर्च करायचा आहे? हे ठरवा ! फायदा होईल.

धन्यवाद !

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890/

© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स,
आनंद पार्क, औंध , पुणे .
9518950764

उद्योगनिती, व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात विक्री वाढवण्यासाठी पर्सनल कोचिंग करते, खालील क्रमांकावर संपर्क करा |

office :
श्री ओमकेश मुंडे सर : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *