कंपन्या,स्वतःचा प्रॉडक्ट स्वतःच का संपवुन टाकतात?

चांगला चालणारा प्रॉडक्ट बंद करून नवीन प्रॉडक्ट का लाँच केला जातो?

आजकाल मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे.
ज्या वेळेपासून मोबाईल भारतात आले तेव्हापासून आत्तापर्यंत तुम्ही कितीतरी मॉडेल्सचे मोबाईल वापरले असतील.

मोबाईल कंपन्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर तीन महिन्यापूर्वी चांगला चालणारा मोबाईल हॅन्डसेट तुम्हाला आज मार्केटला दिसणार नाही, ही प्रक्रिया इतकी फास्ट झालेली आहे.

असं का होतं? तर,, कंपन्या त्याच्या पुढचं मॉडेल मार्केटमध्ये आणतात, ही एक पद्धत आहे, कि जोपर्यंत आपला जुना प्रॉडक्ट स्वतःच्याच नवीन प्रॉडक्ट ला स्पर्धा देत राहील तोपर्यंत नवा प्रॉडक्ट घेतला जाणार नाही त्यामुळे हे असं करतात कधी मजबूरी म्हणून तर कधी कधी जाणिवपूर्वक केलं जातं.

हे फक्त कंपन्यांच्या बाबतीत असं घडतं. असं काही.

भारतीय राजकारणामध्ये तुम्ही प्रत्येक राजकीय पक्ष बघा, या पक्षांमध्ये नवनवीन नेत्यांची भर पडत जाते,जुने नेते मागे ढकलले जातात, असं का केलं जातं? तर पहिल्या जुन्या नेत्यांचा प्रभाव थोडासा कमी झालेला असतो, नवीन लोकांना वाव दयायचा असतो.

📌 मारुती सुझुकी ही कंपनी कित्येक दिवसापासून स्वतःच्या डिझेल कार बनवते आहे,परंतु ज्याप्रकारे संपूर्ण विश्वामध्ये प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी डिझेल इंजिनचा वापर कमी करायची सहमती बनली आहे, तसं भारत सरकारने 2030 पर्यंत डिझेल कार बंद करायचा निर्णय घेतलेला आहे.

📌 त्याचाच एक भाग म्हणून डिझेल ऐवजी पेट्रोल गाड्या किती चांगल्या असतात? लोक त्याला किती चांगल्या प्रकारे खरेदी करत आहेत? हे सांगण्याचा प्रयत्न या कंपन्यांनी केलेला आहे.

📌 खरोखर जर त्यांना असं वाटत असतं की डिझेल ऐवजी पेट्रोल गाड्याच ग्राहकांना परवडतात आणि त्याच विकल्या गेल्या पाहिजेत तर मग तुम्ही डिझेल गाड्या आणल्या कशासाठी?

📌 पण असं बघा कि,बिजनेसमध्ये PESTELनावाचं एक अनालिसिस असतं ,राजकीय सामाजिक /आर्थिक/ कायदेशीर / वातावरणीय बदलाला अनुसरून आणि अन्य मुद्द्यांचा विचार करून उद्योगांना निर्णय घ्यावे लागतात आणि आज जो आपल्याला परिणाम दिसतोय, तो वातावरणीय निर्णयाचा परिणाम आहे.

अशाप्रकारे स्वतःचाच एकेकाळी खूप चांगला चालणारा प्रॉडक्ट स्वतःच्या हाताने स्वतःच खतम करणे, या मॅनेजमेंट स्ट्रॅटजीला #Cannibalization असं म्हणलं जातं.

म्हणून आपल्याला जर एखादं उत्पादन बंद करावं लागलं,तर कधीही घाबरू नये,कारण बदल ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जो व्यक्ती/ जी कंपनी / जो व्यवसाय / जी संघटना स्वतःहून असे बदल करत नाही ,त्याला निसर्ग किंवा समाज बळजबरीने बदल करायला भाग पाडतो.

हे समजून चला !

© निलेश काळे,
उद्योगनीती बिजनेस कन्सल्टंट,
आनंदपार्क,औंध,पुणे.
9518950764
office : 9146101663

Previous Post Next Post

One thought on “कंपन्या,स्वतःचा प्रॉडक्ट स्वतःच का संपवुन टाकतात?

  1. I am regular reader and follower of your posts.
    They are really very informative and helpful.
    Thank you 🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *