कंपन्या स्वतःचाच चांगला चालणारा प्रॉडक्ट का संपवतात? वाचा

1,807 Views

कंपन्या स्वतःचाच चांगला चालणारा प्रॉडक्ट का संपवतात? वाचा !

आपण मार्केटमध्ये बघत असाल कि, एखाद कंपनी आपला चांगला चालणारा प्रॉडक्ट काही दिवसात बंद करते आणि त्याऐवजी दुसरा प्रॉडक्ट लॉन्च करते.

पूर्वीच्या काळी असं फार प्रमाणात होत नव्हतं परंतु 4G स्मार्टफोन आल्यापासुन तर हा प्रकार मोठया प्रमाणावर होऊ लागलाय.

कधी विचार केलात कि असं का केलं जातं?

वाहने, मोबाईल आणि टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट जसं कि मोबाईल ऍप्स बाबतीत ही गोष्ट जरा ठळकपणे दिसून येते.

कारण बघा ना ! ऍप्सच्या बाबतीत तर दर आठवडयाला एक अपडेट येतच रहाते, आणि आपण ते अपडेट केलं नाही तर जुनच व्हर्जन वापरत बसावं लागतं.

ही जी काही प्रक्रिया आहे, त्याला कॅनीबलायजेशन (Cannibalization) म्हणतात.

📌 Cannibalization चं उत्तम उदाहरण बघायचं तर Toyota कंपनीच्या Qualis या Compact MUV चं घेऊ.

ही गाडी टाटांच्या Sumo ला स्पर्धा म्हणुन आणली गेली.

परंतु काही वर्षातच टोयोटाने ही गाडी बंद केली, आणि तिच्या ऐवजी अजून चांगली Innova ही गाडी मार्केटला आणली.

या Cannibalization मुळे एक ब्रॅन्ड पुर्ण संपला…. टोयोटाने innovaचे वेगवेगळे वर्जन मार्केटला आणले ही गाडी भारतातली नं 1 MUV बनली.

पण पुढे टोयोटाने Innova ला फेसलिफ्ट देऊन ( म्हणजे तेच नाव कायम ठेवुन मोठे बदल केले जसं सध्या टाटा सफारीला लाँच केले गेलंय ) Innova crysta मार्केटला आणली गेली.

iPhone1 पासून iPhone 12 पर्यंत यायची काय गरज होती?

कंपन्या आपला चांगला चालणारा प्रॉडक्ट वर्षानुवर्षे तसाच ठेऊ शकतात ना ?

मग Cannibalization का करायचं त्याचे फायदे काय आहेत?

(1) सध्या मार्केट पुर्वीसारखे राहीले नाहीये, लोकांना प्रत्येक वेळी काहीतरी नवीन पाहिजे आहे.

(2 ) लोकांच्या अपेक्षेला आपण पुरते पडलो नाही तर आपले स्पर्धक त्यांना खेचतील ही किती आहे.

( 3) Cannibalization केल्यामुळे कंपन्यांना रेट कमी जास्त करता येतात.

(4) आपल्या स्पर्धकाने जर अजुन काही चांगले फिचर्स दिले असतील तर त्या फिचर्सना पटकन आपल्या प्रॉडक्ट मध्ये आणता येतं.

(5) या प्रकारामुळे मार्केटमध्ये एक फ्रेशनेस रहातो,ग्राहक कंटाळत नाही.

(6) Cannibalization मुळे विक्री वाढते.

अशा प्रकारे मार्केटमध्ये टिकून रहाण्यासाठी जुनं ते फेकून दयावं लागतं किंवा त्याला घासून पॉलिश तरी करावं लागतं.

वेळप्रसंगी स्वतःचाच प्रॉडक्ट किंवा ब्रॅण्डला खतम करावं लागतं, या मॅनेजमेंट स्ट्रॅटजीला #Cannibalization असं म्हणतात

📌 म्हणून आपल्याला जर एखादं उत्पादन बंद करावं लागलं, तर कधीही घाबरू नये, किंवा वाईट वाटून घेऊ नये, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे हे समजून चला !

© निलेश काळे.
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764.

Business कोचिंग हवीये?कॉल करा ;
ओमकेश मुंडे सर : 9146101663.

Default image
Nilesh Kale
Articles: 83

One comment

  1. Dear Sir, myself staying in thane wants to know any business plan in the budget of Rs. 20000/- Twenty thousand only.
    Thanks/Regards,
    Rahul Lotlikar
    Mob. 9221708679

Leave a Reply