कधीही बंद न पडणारा डिलीवरी बिजनेस असा चालू करा 7 स्टेपमध्ये समजून घ्या .

#हायपरलोकल delivery business कसा चालु कराल ?

©निलेश काळे .

📌 सध्या चालू असलेल्या लॉकडाउन पिरेड मध्ये हे सगळ्यात जास्त पैसे कुणी कमावले असतील ? किंवा कोण कमवतंय ? जरा बघिताय का नीट?

📌 ते धंदे किंवा ते व्यवसाय खरंच पैसे कमवा लागलेत जे लोक आपल्या दारावर आणून वस्तू दयायलेत , हो ! खरंच !
📌 आपल्याच लोकलचे पोरं, लोकलच्या समाजाला सर्विस देतात या धंदयाच्या प्रकाराला #हायपरलोकल म्हणायचं .

📌 कारण आत्तापर्यंत असं वाटायचं की यश मिळवण्यासाठी आपला कम्फर्ट झोन सोडून बाहेर जावं लागेल, पण आज अॅग्रीगेटर कंपन्या ( जसं OLA ,UBER , Flipcart , Amazon, किंवा मोठाले किंवा इथलेच काही लोकल दुकानदार आपल्या कम्फर्ट झोन मध्ये येऊन धंदा करू लागलेत.

📌 आता एक साधं उदाहरण समजून घ्या….. समजा बाहेर राज्यातली काही लोक तुमच्या गावात आलेत आणि त्यांना तुमचं गाव फिरायचंय,, तर लोकांना सगळ्यात चांगली माहिती कोण देऊ शकतंय ?तर तेच लोक माहिती देऊ शकतात जे त्या गावचे आहेत .

त्यांना सगळं गाव खडानखडा माहिती आहे मग जर या पोट्ट्यांना पैशाच्या बदल्यात गावभर फिरून माहिती द्यायची झाली तर त्यांच्यासाठी काय नुकसान आहे?
त्यात त्याला काय अवघड आहे?

हे त्याच्यासाठी तर एकदम सोप्पंय आणि त्याच्या बदल्यात पैसे मिळत असतील तर सोन्याहून पिवळं !

📌 हायपरलोकल डिलिव्हरी /हायपर लोकल मार्केटिंग / हायपरलोकल मार्केटप्लेस या सगळ्याचा अर्थ तोच,
धंदा इतक्या कमी जागेत करायचा किंवा अशा लोकल जागेत करायचा जागा आपल्याला पूर्ण माहिती आहे .

आणि तो त्या लोकांसाठी करायचा ज्या लोकांना एक तर ही जागा इतकी चांगली माहिती नाही किंवा त्यांना तेवढी धावपळ होत नाही

📌 आपल्याला इथं त्या माणसाची मदत करायची आहे ज्यांना गरज आहे, आणि जो ते काम करून दिल्यावर आपल्याला 2-5 पैसे देईल.

📌 मजाक ची गोष्ट नाहीये पण आज हायपर लोकल डिलिव्हरी स्टार्टअपला सोन्याचे दिवस आहेत.

📌 आता हे कसं करायचं ते स्टेप-बाय-स्टेप समजून घेऊ

📒1) #Think_what_to_deliver:

आज आपण बघतोय सर्वत्र डिलिव्हरी चालू झालीये, लोक गाड्यांवर बसून, पाठीवर लादून, सगळ्या प्रकारचे सामान इकडून तिकडे तिकडून इकडे पोहोचवत आहेत.

अगदी पोस्टमन पासून सुरुवात झालेला हा ट्रेन्ड झोमॅटो ,अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्वीग्गी टॉमॅटो यांच्या डिलिव्हरी बॉय पर्यंत चालू आहे.

तुम्ही ठरवा आपण कोणत्या प्रकारची डिलिव्हरी करणार आहोत ?सुरुवातीला जवळपास सगळेच स्टार्टअप हे एका माणसापासून चालू झालेत त्यामुळे आपण ठरवलं तर कुणीही स्वतःच्या दोन पायांपासून सुरुवात करू शकतो.

बघा…. हा सेवा द्यायचा बिजनेस आहे त्यामुळे आपल्याला एक गाडी जर सोडली तर दुसरी कसल्याही प्रकारची गुंतवणूक नाही

📗2) #Target_customer_शोधा !

📌 आपला मेन ग्राहकवर्ग ती मंडळी असणार आहे ज्यांना स्वतःसाठी बाहेर जाऊन खरेदी करता येणे शक्य नाही किंवा त्यांचा वेळ त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे , आणि अशा छोट्या-मोठ्या गोष्टी ते बाहेरून करून घेऊ शकतात.

ते लोकं अशा प्रकारचे पण असू शकतात ज्यांच्याकडे खूप पैसा आहे परंतु वेळ कमी आहे.

लक्षात आले का?????
की टारगेट कस्टमरला आपल्याला सेवा द्यायची , आहे कारण आपल्या सेवा देण्यामुळे त्याचा वेळ वाचतोय आणि आपली जी कमाई होणार आहे ती त्याचा वेळ वाचून होणार आहे.

📘 3)#Local_business_बरोबर_पार्टनरशीप_करा :

काल मी माझ्या गावी, आमच्या मित्राच्या हॉटेलमधून पार्सल मागवलं , गाव छोटं आहे, त्यामुळे डिलिव्हरी सिस्टिम वगैरे अजून तरी सोय नाही, परंतु त्याने त्याच्या माणसाला पाठवल, त्याचा माणूस पार्सल घेऊन आला, परंतु त्यात त्या माणसाचे पंचवीस मिनिट गेले आणि पंचवीस मिनिटे हॉटेलमध्ये त्याच्या जागेवर काम करायला कोणी नव्हतं.
सध्या बघा…ना ,किराणा दुकानदार, जनरल स्टोअर वाले, इलेक्ट्रिकलवाले किंवा अन्य कोणीही दुकानदार फोर्स केला तर त्यांच्या स्वतःच्या माणसाला पाठवतात, पण त्यांचा त्रास असा आहे की, एक माणूस दोन ठिकाणी चांगलं काम नाही.

याचा अर्थ असा आहे की ग्राहकाला तर घरपोच पाहिजे आणि त्या समोरच्या दुकानदाराकडे तेवढे मनुष्यबळ नाहीये ही जी पोकळी आहे ती आपण भरून काढू शकतो. लोकलच्या दुकानदारांना बरोबर पार्टनरशिप करा.

सुरुवातीला लोकांना विश्वास बसणार नाही ,मान्य परंतु एकदा का आपण पण आपले टी-शर्ट घातलेली मुलं गावात फिरू लागली ,की बघता बघता इतर लोक सुद्धा आपल्या सेवा घेऊ लागतील .

कारण जो दिखता है ! वो बिकता है !

📙(4 ) #Do_partnership_and_hire_associates:

📌 सध्या मार्केटमध्ये अनेक कंपन्या डिलिव्हरी देत आहेत, याप्रकारच्या स्टार्टला अग्रिगेटर बिझनेस मोडेल असं म्हणलं जातं या कंपन्या (जसं की फ्लिपकार्ट ॲमेझॉन,)

अजूनही यांच्याकडे डिलिव्हरी बॉईज करिता नेहमी मागणी असते , त्यामुळे जेव्हा आपल्याला एकट्याला बघून कमी ग्राहक येत असेल, तेव्हा सुरुवातीच्या काळात या कंपन्यांबरोबर आपण करार करून त्यांच्यासाठी काम करता येईल.

एकदा का काम वाढलं की ,मग आपली कामगार संख्या वाढवा, कॉलेजचे विद्यार्थी / होस्टेलवर राहणारी मुले /रिटायर व्यक्ती/ कोणीही ज्याला खूप जास्त अपेक्षा नाही ,जे कमी पगारावर काम करू शकता अशा लोकांना आपल्याबरोबर घेता येऊ शकता .

📔(5) #पक्कं_income_model_बनवा

ज्या स्टार्टअला फंडिंग मिळते ते स्टार्ट सुरुवातीला नफ्याचा नसल्याचा विचारच करत नाहीत , परंतु आपल्या व्यवसायासाठी कमिशन बेसिस वर का होईना पैसा येत राहणारा आवश्यक आहे.

त्यामुळे दुकानदारा बरोबर आणि ग्राहकांबरोबर त्यांना व्यवस्थित वाटेल/ त्यांना परवडेल /आपल्यालाही परवडेल /अशाप्रकारे कमिशन ठरवून घ्या कारण धंद्यामध्ये पैसा आलाच पाहिजे .

जेणेकरून आपली रोजची कामे व्यवस्थित पार पडतील

📒(6) #Make_a_App_or_Portal :

ज्या वेळेला आपल्या व्यवसायासंदर्भात एखादं मोबाईल ॲप्लिकेशन तयार करून घेतलेलं असतं, त्यावेळी ग्राहक आपल्याशी सहज कनेक्ट करू शकतो.

आज काल मोबाईल अप्लिकेशन बनवणं,हे स्वस्त आणि सोपं झालय , त्याच्या पुढे जाऊन एक गोष्ट अशी आहे की, आपण अगदी फेसबुक पेज किंवा व्हाट्सअप ग्रुप चा वापर करून देखील आपला बिजनेस उभा करू शकतो.

अगदी सुरुवातीला वेबसाईटच पाहिजे किंवा एखादं मोबाईल ॲप्स पाहिजे अशातला काही भाग नाही.

📕(7) #Deliver_on_Bike_Cycle_Anything :

कोणत्याची व्यवसायामध्ये सुरुवातीलाच सगळ्या सुधारणा होऊ शकत नाहीत ,आपल्याला सुरुवात आपल्या दोन पायावरच करायची आहे.

त्यामुळे अगदी सुरुवातीलाच माझ्या सगळ्या डिलिव्हरी बॉईज कडे गाडी असेल, असं अपेक्षित करून बसू नका, असेल तर चांगलंच आहे पण कंपलसरी नाही !

ॲमेझॉन /एप्पल /मायक्रोसॉफ्ट अशा कंपन्यांची ऑफिसेस सुरुवातीला कशी होती ? हे आपण नेहमीच बघत असतो.

त्यामुळे सुरुवातीलाच सगळा तामझाम करायची काहीच गरज नाही.

आमच्या गावातील राधेश्यामजी आज चार कपड्याच्या शोरूमचे मालक आहेत पण 40 वर्षांपूर्वी ते डोक्यावर किंवा घोड्यावर कापडाचं गाठोडं बांधून पांड्या वाड्या-वस्त्यांवर जाऊन कापड विकायचे त्यांचं एक वाक्य आज पण फेमस आहे

“जिथे जाऊ शकत नाही बैलगाडी तिथे जाऊन धंदा करतो मारवाडी”

त्यामुळे स्वतःचं जास्त कौतुक करत बसायचं नाही, जे भेटल त्याच्यावर डिलिव्हरी झाली पाहिजे ,तरच व्यवसाय उभा राहायला सुरुवात होईल.

📘Dont_Have_Fear

बघा मराठी माणूस विचारांमुळे मागं राहतो ?
मला लायसन कसं मिळेल ?
कुणी अडवलं तर काय करू?
धंदा झाला नाही तर कसं करू?

या सगळ्या गोष्टी गौण आहेत जो भेटेल त्या माणसासाठी डिलिव्हरी आणि मागेल त्याला सेवा देण्याची तयारी असलं की झालं ,कारण पहिल्याच काळातच आपल्याला सगळं कळेल,असं काही नाही !

बऱ्याच गोष्टी करता करता शिकता येतात

📙Copyकरणेवाईटनाही :

सगळे शब्दाचे खेळ आहेत.

1) आम्ही XYZ माणसाने दाखवलेल्या किंवा ABC महापुरुषाने सांगितलेल्या मार्गावर चालतो म्हणलं….. ..की, गोड वाटतं !

2) आणि ABC माणसाचा धंदा कॉपी करून करतो म्हणले ,की वाईट वाटतं !

काय वाईट वाटून घ्यायचे?
आपण आज देखील आपली कार इतरांनी बांधलेल्या रस्त्यावर चालवतच की?
दरवेळी मीच रस्ता बांधणार आणि मग मी त्याच्यावर माझी गाडी चालवणार म्हणल्यावर तर मग झालं !

तेव्हा त्या माणसाचा अनुभव कॉपी करायचा आणि आपल्या धंद्यात वापरायचा हे उद्योजक बनायचं मूळ तत्त्व आहे त्याच्यामुळे हा लोकल डिलिव्हरीचा बिझनेस इतरांकडून बघून शिकून-सवरून गरज पडल्यास कॉपी करून बिनधास्त चालू करा !

आज लोकांना याची अत्यंत गरज आहे .

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890/

शुभेच्छा

© निलेश काळे ,
उद्योगनीती बिजनेस कन्सल्टंट,
आनंद पार्क,औंध,पुणे !
9518950764.

Office : 9146101663 .

लेख आवडल्यास नावासहित फॉरवर्ड करा ! चोरी करून स्वतःच्या नावाने खपवलेले दिसल्यास , आहात तिथे येऊन वाजवू !

Previous Post Next Post

3 thoughts on “कधीही बंद न पडणारा डिलीवरी बिजनेस असा चालू करा 7 स्टेपमध्ये समजून घ्या .

  1. छान कल्पना आहे .. चालू करायचा आहे मार्गदर्शन मिळेल का

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *