कन्फेक्शनरी मार्टचा व्यवसाय असा चालु करा !

छोटेखानी कन्फेक्शनरी स्टोर्स कसे चालु कराल ?
.
गाव छोटं असो कि मोठं असो , प्रत्येक ठिकाणी छोटी छोटी किराणा दुकानं असतातच आणि या दुकानांना वेगवेगळ्या प्रकारचा माल लागतो,यात चॉकलेट्स,गोळ्या,बिस्किटे,चिप्स , कुरकुरे आणि अशा प्रकारचा वेगवेगळा माल आला .

यांची सेवा छोट्या दुकानांना किंवा टपऱ्यांना असते,आता ही दुकाने इतकी मोठी नसतात कि,डायरेक्ट एजन्सीकडून माल घेतील,कारण??एजन्सीवाल्याला मोठी ऑर्डर लागते ,, आणि या प्रकारच्या दुकानांच खेळतं भांडवल कमी असल्याने ,, त्यांना किमान पैशात वेगवेगळी खरेदी करायची असते.

तेंव्हा असे छोटे दुकानदार कन्फेक्शनरी मार्टची निवड करतात …. तर … असे कन्फेक्शनरी मार्ट चालू करणे आणि छोट्या दुकानदारांच्या गरजांची पूर्तता करणे यातून एक चांगला व्यवसाय उभा राहू शकतो.

तर यासाठी काय काय लागेल? याचा आपण सविस्तर विचार करू ….
1)यासाठी लागते ते मेन मार्केटमध्ये दुकान,अगदीच मेन मार्केटला जरी नसेल तरी,दुकान समोरचा रस्ता एवढा तरी हवा जिथे 407 टेम्पो उभा राहू शकेल ,,,

2) दुसरी बाब थोडं खेळतं भांडवल हवं,शॉप ऍक्ट, उद्यम आणि ट्रेडरचं फुड लायसन्स काढून घ्याव (हे सगळं करायला हजार रुपये पुरतात )

3) हा व्यवसाय B2B असल्याने चांगला जनसंपर्क हवा ( नसेल तरी हळूहळू होतोच ) सुरुवातीस मोठया डिस्ट्रीब्युटर कडून,किंवा मोठ्या मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून रोखीत माल भरावा वेगवेगळ्या कंपन्यांचे चालणाऱ्या वस्तूच निवडाव्या .
हळू हळू जसे दुकान चालू लागेल तसतसे,खूपसे व्यापारी तुमच्या दारात मालाची डिलीव्हरी देतील,अगदी पारले,हिंदूस्तान युनीलीवर , अल्पेनलीबे सारख्या एजन्सीज पण दारात डिलीव्हरी देतील,तुम्ही फक्त खालचे दुकानदार जोडत चला ,,

4)या दुकानांमधे बेकरी पदार्थ जसे खारी,तोस,बटर हे देखील विकले जातात,असे बेकरीचे टेम्पो कायम येत असतात,त्यांची सेवा घ्यावी ,,,,,, लोकल चॉकलेट्समध्ये, लोकल फुड प्रॉडक्टमध्ये मार्जीन जास्त असते त्यावर भर द्यावा पण तरी ब्रॉडेंड वस्तु ठेवाव्यातच त्यामुळे इमेज वाढते,

5 )काही कन्फेक्शनरी व्यावसायिक … अंडी आणि पान मटेरियल व मसाल्याचे पदार्थ पण होलसेल विकतात त्यामुळे ग्राहकवर्ग अजून जास्त वेळा येतो,अनुषंगाने टर्न ओव्हर वाढतो आणि नफा पण. 6)सुरुवातीच्या काळात जरी शक्य झाले नाही तरी लवकरात लवकर .. हाताखाली माणूस घ्यावा जेणेकरून सर्वच बाबी जसे माल काढून देने, पॅकींग करुन देणे,बिल बनवणे,पैसे घेणे इ . स्वतःलाच कराव्या लागू नयेत.

7) माणूस जेंव्हा कामावर ठेवणार असाल तेंव्हा वेगळ्या community चा ठेवावा,या मागे कारणं दोन 1)असे कि,जेंव्हा तुमचा सण असेल त्या वेळी त्याचा असणार नाही त्यामुळे तो कामावर येईल आणि 2)त्याचा सण असेल त्या वेळी तुम्ही फ्री असाल दुकान चालवायला ,

8) आता अजून एक बाब .. हे कन्फेक्शनरीचं दुकान चालू असतानाच तुम्ही एक फिरते वाहन सुद्धा चालवू शकता,जे दूरवरील ग्राहकांना सेवा देऊ शकेल,अशावेळी एका दिवसात दोन स्त्रोतातून पैसा येतो,तुम्ही ग्राहकांना उधार माल दयायचा किंवा नाही हे सर्वस्वी तुमच्या हातात असते,पण समोरच्या व्यापाऱ्या कडून जेंव्हा माल घ्याल तेंव्हा मात्र पेमेंट साईड मागूनच घ्यावी ,,,, म्हणजे तेवढाच पैसा वापरायला मिळतो.

आता लायसन्स बद्दल ,,,, उद्योग आधार ( शॉप अक्ट ) काढून घ्यावे ,fssai चे प्रमाणपत्र घ्यावे आणि बँकेत व्यवहार दाखवून CC करून घ्यावे जेणेकरून पैशाची चणचण भासणार नाही .

9) अशा प्रकारे हा 20% ते 50% मार्जिन असणारा व्यवसाय यशस्वी पणे करता येईल, या व्यवसायात सेल सायकल कमी असल्याने थोड्या प्रयत्नानंतर लवकर सेटल होता येतं

तेंव्हा अभ्यासपूर्वक उतरा

शुभेच्छा तर आहेतच .

© निलेश काळे
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंटस,
5 th floor, विघ्नहर चेंबर्स, अभिनव चौक,नळस्टॉप पुणे .
9518950764 .
office :9146101663 .

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *