कर्मचारी टारगेट दिल्यावरच कामे पूर्ण कशी करतात?

कर्मचारी टारगेट दिल्यावरच,कामे कशी पुर्ण करतात?

*Parkinsons Law*

आज जो आपण Law बघणार आहोत त्याचा वापर किंवा अनुभव रोज रोज घेत असतो.

हा जो लॉ आहे तो एका ब्रिटीश सरकारी अधिकारी Cyril North Cole Parkinson’s याने मांडला .

तो लॉ असा आहे .

“Work Expands so as fill the time available for its complitions”

याचा अर्थ काय आहे? तर सरळ सरळ रोजच्या भाषेत समजून घेऊ .

एखादं काम पूर्ण करायला समजा तुम्हाला 10 दिवसाचा वेळ दिला आहे .
म्हणजे Deadline दहा दिवसाची आहे .
आता ते काम तुम्ही दहा दिवसात पूर्ण करू शकता,पण तुमची सवय काय आहे?आज पासून दोन दिवसात पूर्ण करून शेवटचे आठ दिवस फ्री करून घेणार?कि,पहिले आठ दिवस मोकळे फिरून शेवटच्या दोन दिवसात मरमर करून काम पूर्ण करणार ?

95% चान्स आहे कि,आपण दुसरा ऑप्शन निवडत असणार .

ही नैसर्गिक क्रिया आहे .

त्यामुळे तुम्ही एकटेच नाही जे असे करता !

कॉर्पोरेट क्षेत्राला हा लॉ चांगलाच माहित आहे,मॅनेजमेंटच्या स्टडीमधे हा लॉ घासून शिकवला जातो,त्यामुळेच तिथे काम करणारे कर्मचारी कायम .. टारगेट आणि डेडलाईन ची भाषा करतात.

“टॉप मॅनेजमेंट कर्मचाऱ्यांना फक्त टारगेट देऊन कामे करवून घेतात, कiरण त्यांना माहित आहे कि डेडलाईन दिल्याशिवाय ते काम पूर्णच होणार नाही !” हाच आहे पार्किसन्स लॉ म्हणतात.

तुम्ही हा अनुभव कधी घेतलाय का ?

एखादे काम करायला फारच कमी वेळ आहे,पण तरिही तुम्ही ते पूर्ण करू शकला आहात.

आणि ते काम पूर्ण करून स्वतः बद्दलच आश्चर्य व्यक्त केले असेल !

तर का घडलं असेल असं ?

याचंच उत्तर हा लॉ देतो !

जेवढा वेळ आपण स्वतःला देतो ना तेवढेच आपण जास्त Relax राहतो

पण वेळः कमी असला कि आपण धावपळ करून तेच काम कमी वेळेत पण पूर्ण करू शकतो,”मग ही काय काळी जादू आहे काय ? तर नाही.
हे सगळे मेंदूचे खेऴ आहेत”

या संदर्भात Dallin oaker लिहीतात ,”We should be careful not to exhaust our time on things that are merely good and leave little time for that which is better or Best”

“कमी महत्वाच्या कामावर आपला वेळ घालवून महत्वाच्या कामासाठी वेळ शिल्लकच रहाणार नाही असे करू नका”

या संदर्भात एक “थेअरी सँड & बॉल्स” अशी पण आहे .

“समजा एका बरणीत तुम्हाला वाळू आणि तीन बॉल भरायचे आहेत , तर ते कसे भराल?”

अगोदर वाळू भरून नंतर बॉल्स भरण्याचा प्रयत्न केला तर कधीच बसणार नाहीत , पण तेच अगोदर बॉल्स भरून नंतर साईड साईड ने वाळू भरली तर ते काम अलगद होईल .

असंच आहे आपण रोजच्या कामाच्या नियोजना बद्दल पण ,

इथे बॉल्सला “जास्त महत्वाचे” कामे समजा आणि वाळू म्हणजे “कमी महत्वाचे” कामे समजा .

म्हणजे दोन्ही कामे नीट होतील .

अशा प्रकारे Parkinsons Law समजून घ्या आणि वेळेत कामे पूर्ण करा आणि स्टाफकडून करवून घ्या,तरच आपण एक “यशस्वी उद्योजक”होऊ.

शुभेच्छा

© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंटस
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764.
Office : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *