कुणासाठी?? लेकरासाठी… 4 वर्षात 700 करोडची कंपनी बनवणं ? अफाट आहे.

पहिल्यांदा आईबाप बनताना तुम्हाला कशाची चिंता असते ? या दोघांनी 700 करोडचं स्टार्टअप चालु केलं.

हो तुम्ही वाचली ती खरी गोष्ट आहे, एका सत्यकथा आहे,अशा एका जोडप्याची .. ज्यांना बाळ होणार होतं,

बऱ्याचदा काय असतं? काही लोक काही गोष्टींविषयी जरा जास्तच जागरूक असतात,तसच हे एक जोडपं.

उच्चशिक्षित,चांगल्या नोकरीवर असणारे आणि आरोग्याविषयी जागरूक असणारे ही दोन लोक Gazal alagh आणि Varun alagh.

याचं स्टार्टअप mamaearth पुर्णपणे केमिकल फ्री बेबी केअर प्रॉडक्ट,Health product,baby toys असे प्रिमियम प्रॉडक्ट बनवते, आणि चार-पाच वर्षात यांचा रेवून्य 700 करोडवर पोहचलाय.

कोणाला वाटेल ? इथे भारतामध्ये लोक जे आहे ते खाऊन जगतात, कुठल्याही प्रकारची कोणी तक्रार करत नाही,मग तू इतके नखरे कशासाठी????? तर एक असा देखील ग्राहक वर्ग आहे जो या प्रकारचे नखरे करतो .

नखरे का म्हणायचं ? त्याचे कारण देखील असेच आहे 99% जनता ही कुठल्याही प्रकारची कुरकूर न करता केमिकलयुक्त गोष्टी खाते आणि किती आहे परंतु या दोघांनी जी वाट निवडली त्यामध्ये केमिकलला कुठेही थारा नव्हता .

वर सांगितल्याप्रमाणे यांना मूल होणार होतं, निसर्गाच्या नियमाप्रमाणे हे मूल देखील वाढले असते, झाले देखील आणि हे दोन मायबाप शोधायला लागले असे प्रॉडक्ट जे त्यांच्या लहानग्याला योग्य असतील.

भारतामध्ये जे ब्रांड लहान मुलांच्या करिता वेगवेगळे प्रोडक्ट बनवतात त्या सगळ्या ब्रान्डसला यांनी चेक केलं, प्रत्येकामध्ये काही ना काही तरी केमिकल होतच,अगदी फुलपाखरा सारख्या लेकरांची चित्र दाखवणारी ब्रांडदेखील,आपल्या प्रॉडक्टमध्ये भरमसाठ केमिकल टाकतात,हे बघितल्यानंतर यांनी आपल्या मुलासाठी अमेरिकेतून प्रोडक्ट मागायला सुरुवात केली .

पण हे गणित काही परवडणारं नव्हतं, आता ही स्टोरी उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातल्या लोकांची असल्यामुळे इथे थोडासा क्वालिटीचा विषय होताच, त्यात हे दोघेही नवरा बायको जरा पेटलेले होते की आम्हाला हवाय तर चांगल्या क्वालिटीच्या प्रॉडक्ट आहे, पण तसे प्रॉडक्ट मार्केटला उपलब्ध नाही,असं कळल्यानंतर या दोघांनी 2016 मध्ये mamaearth या ब्रँड खाली आपली स्वतःची बेबी केअर
प्रॉडक्ट बनवायला सुरुवात केली.

यांचा टारगेट कस्टमर यांना माहीत होता,असे पालक ज्यांना आपल्या मुलांच्या आरोग्याविषयी आणि त्यांच्याकरता असणाच्या प्रॉडक्ट विषयी काळजी आहे,असे पालक आपले नक्की ग्राहक होतील,हे त्यांना जाणवलं होतं.

जेव्हा तुम्ही स्वतः एखादी गोष्ट अनुभवता,तेव्हा तुम्हाला त्याची वास्तविक माहिती असते,

तसेच हे दोघे नुकतेच आई-वडील झाल्यामुळे यांना आपल्या कस्टमरला काय हवं असणार आहे? हे पक्कं माहीत होतं.

सुरुवातीच्या काळात फक्त 6 बेबी केअर प्रॉडक्टसहित यांच्या कंपनीची सुरुवात झाली, हळूहळू प्रॉडक्ट वाढत गेले,आज ही कंपनी 700 कोटी रुपयाचा व्यवसाय करते.

भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टअप असतील,परंतु त्यापैकी काहीच स्टार्टअप हे प्रॉफिटेबल झालेत, त्यापैकी mamaearth हे असंच स्टार्टअप आहे,जे प्रॉफिटमध्ये आहे.

Business model:

mamaearth ची पॉलिसी अशी आहे,की स्वतः प्रॉडक्ट डिझाइन करा >> मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या उत्पादकांकडून त्यांच्यात मशीन वापरून बनवून घ्या आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विका.

म्हणजे सगळा खेळ हा लोकांच्याच वस्तू + लोकांचीच साधने वापरून करायचा खेळ आहे .

यांचे प्रोडक्ट 90% ऑनलाईन विकले जातात तर काही कॉस्मेटिकच्या दुकानांमध्ये यांचे प्रोडक्ट मिळतात, परंतु जास्त कस्टमर हा ऑनलाईनच आहे.

D2C :

आज काहीही नवीन स्टार्टअप करणारी नवीन पिढी
पारंपरिक अशा सुपर स्टॉकिस्ट >> डिस्ट्रीब्यूटर > > एजन्सी >> रिटेलर अशा पॅटर्नमधून न जाता डायरेक्ट टू कस्टमर याचे मधून व्यवसाय करणे पसंत करत आहे, mamaearth ची विक्री पॉलिसी ही अशीच आहे, ही कंपनी डायरेक्ट कस्टमरला घरपोच सेवा देत आहे.

Marketing policy:

mamaearth ही कंपनी शक्यतो ऑनलाईन विक्री करत असल्यामुळे, यांच्या जाहिरातीचे माध्यम देखील ऑनलाइन आहे,influncer marketing, Mouth publicity शिल्पा शेट्टी सारख्या सेलिब्रिटी ला घेऊन Celebrity endorsement आणि आता आता अगदी टीव्हीवर सुद्धा जाहिरात करणे हे यांच्या मार्केटिंग strategy चा भाग आहे.

यांची गोष्ट अगदी साधी आहे ….फक्त Formulation तयार करायचं,Third party तयार करून घ्यायचं,आपण फक्त Marketing करायची आणि Customer ला सुद्धा घरपोच डिलिव्हरी द्यायचे,हे इतकं सुटसुटीत D2C मोडेल असल्यामुळे,सेलिब्रिटींनी सुद्धा याच्यामध्ये इन्वेस्टमेंट केलेली आहे.

म्हणून तर ज्या अभिनेत्रीला यांनी आपली जाहिरात करायला बोलावलं त्या शिल्पा शेट्टीनेसुद्धा या स्टार्टअप मध्ये इन्वेस्टमेंट आहे,

आपण बघितलं असेल ? Phool.com कॉम किंवा nykaa.com या अशा अभिनव स्टार्टमध्ये सेलिब्रिटी इन्वेस्टमेंट करतात………….. कारण ? हा आता ट्रेंड बनला आहे.

mamaearth बद्दल अजून एक गोष्ट सांगायची झाली,तर यांचे प्रोडक्ट स्वस्तामध्ये बिलकुल नसतात, ISO,GMP आणि Non GMO असे Non-toxic असे नॉन toxic, केमिकल फ्री घटक आणल्यामुळे ही प्रॉडक्ट बर्‍यापैकी महाग असतात,त्यामुळेच अजूनही mamaearth ची प्रॉडक्ट आपल्याला महाग वाटू शकतात.

प्रॉफीट मार्जिन मोनोपली :

एखादं स्टार्टअप तेंव्हाच यशस्वी होतं, जेंव्हा ते येणारा बहुतेक नफा परत धंद्यातच गुंतवतं,या तत्वाला धरुनच mamaearth ची वाटचाल सुरु आहे .

बेबीकेयर प्रॉडक्टमध्ये J&J, Himalaya अशा FMCG प्रचंड मोठ्या कंपन्याची स्पर्धा असताना, देखील Mamaearth ने संशोधन आणि purity बाळगण्याच्या जोरावर बाळसं धरलंय .

तात्पर्य : आजकाल परफेक्ट आयडिया लावली,योग्य खरेदी करणारा ग्राहक (Target Audience) परफेक्ट प्रॉडक्ट आणि प्रोफेशनल मॅनेजमेंट असेल? तर आज कोणतंही स्टार्टअप स्वतः करता मार्केटमध्ये जागा तयार करू शकतेय, हेच कळतं या स्टोरी वरून .

या दांपत्याचं हे स्टार्टअप खूप पुढे जाईल हे मात्र नक्की .

© निलेश काळे
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंट
5th Floor, विघ्नहर चेंबर्स,
अभिनव चौक,नळस्टॉप,पुणे .
9518950764.
Office: 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *