कोणतंही ध्येय साध्य करण्यासाठी, हा 5 पाँईटसचा SMART फॉर्मला वापरा.

Resolution_and_Goals:

©निलेश काळे

या पृथ्वीवर आपण सर्वात यशस्वी प्राणी आहोत, का? तर आपण इतर प्राण्यांप्रमाने फक्त आत्ताच्या भूकेपूरता विचार करत नाही,लांबचा विचार करतो,म्हणून आज उद्योगनिती च्या सर्व वाचकांसाठी मॅनेजमेंट मधील हा एक एक अनोखा फार्मुला आपल्यासमोर मांडत आहे.

आपल्यासमोर जी उद्दिष्टे आहेत ती कशाप्रकारे असावेत? याचं वर्णन पाच मुळाक्षरांमध्ये हे केलं गेलेलं आहे .

📌 SMART

ही ती इंग्लिश मधील पाच मूळाक्षर आहेत.

SPECIFIC :

पुढील ठरावीक काळामध्ये आपल्याला जे काही उद्दिष्ट साध्य करायचं आहे ते? ठळकपणे आपल्या नजरेमधे असावं.

म्हणून तर प्रत्येक क्रिकेट मॅचमध्ये स्टेडीयमवरच एक मोठ्ठा स्कोरबोर्ड असतोय…. जे काही आहे?ते स्पष्ट दिसावं.

एखाद्या गोष्टी संदर्भात आपली विचार करण्याची क्षमता क्लियर असली, म्हणजे???? जसंआपल्याला ज्या रस्त्याने गाडी चालवायची आहे, तो रस्ता क्लिअर दिसत असेल ,तर आपण त्या रस्त्यावरून गाडी अतिशय वेगात चालू शकतो आणि योग्य त्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकत असतो, पण जर आपल्याला ज्या रस्त्यावर जायचं आहे तो रस्ता दिसत नसेल तर आपण आपल्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचणार आहोत का?तसं आपलं उद्दीष्ट आपल्याला परफेक्टली आणि स्पेसिफिकली माहीत असायला हवंय .

***************************

MEASURABLE:

आपल्याला ज्या प्रकारचे यश मिळवायचं आहे,जेवढे पैसे मिळवायचे आहेत?किंवा जे काही साध्य करायचं आहे?ते मोजता येण्यासारखं असावं !

उगाचच मला खूप पैसे मिळवायचे आहेत ,मला पातळ व्हायचं आहे, किंवा मला वजन कमी करायचं आहे किंवा मला खूप आनंदी व्हायचं आहे, हे ठीकेयरे दादा,पण अशी मोजता न येणारी गोलमोल उद्दिष्ट पूर्ण होत नसतात,

“ठराविक आकडा” आपण स्वतःला सांगावा लागणार आहे, म्हणजेच उद्दीष्ठ असं असावं जे कोणत्या ना कोणत्या परिमाणात मोजता येईल.

******************************

(3) Attainable:

उगाचच काहीही स्वप्नं बाळगुन काहीही होत नसतं.

माणसांमध्ये हा गुण निसर्गात हाच आहे की त्याला साधारणपणे त्याच्या, शारिरिक,मानासिक आणि बौद्धीक क्षमता माहीत असतात.

“पूर्ण प्रयत्न जर केला तर काहीही साध्य होऊ शकतं ही गोष्ट खरी आहे” ज्याला इंग्लिश मध्ये Nothing is impossible म्हणतात”,,,, ते ठिकय परंतु त्याला सुद्धा काही मर्यादा पडतात.

आपण एखादी गोष्ट किती प्रमाणामध्ये साध्य करू शकतो ?किंवा ते साध्य करू शकतो ?किंवा नाही? हे साधारणपणे आपल्याला कळत असतं, की इथपर्यंत होऊ शकत आणि हे आपल्याला शक्य नाहीये.

म्हणून करता या सूत्रांमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की की आपण उद्दिष्ट ठेवतानाच असं ठेवायचं की जे आपल्याला साध्य करता येईल.

म्हणजे पुढे पश्चाताप करण्याची वेळ येत नाही.

📌 Relavant_to_long_term_Goal:

आपलं उद्दिष्ट असं असावं,जे आपल्या लॉंग टर्म उद्दिष्टाचा एखादा भाग असेल.

याचं उदाहरण, असं समजून घ्या ,जर एखाद्या व्यक्तीचं असं उद्दिष्ट आहे की, ” माझ्या हॉटेलच्या पूर्ण महाराष्ट्रभर 25 शाखा पाहिजेत “!

मग या वर्षी माझं उद्दिष्ट आहे की, “या वर्षी मराठवाड्यामध्ये मला पाच शाखा उघडायचे आहेत ” .

आता गोष्ट साधी आहे ,माझं लॉंग टर्म उद्दिष्ट 25 शाखा उघडायचं आहे ,परंतु या वर्षीचं उद्दिष्ट मराठवाड्यात पाच शाखा उडायचं आहे तर ते, लहान उद्दिष्ट हे मोठ्या उद्दिष्टाला पूरक आहे.

जे होऊ शकतं.

(5) Time_Bound :

ज्या वेळी आपल्याला एखादा काम पूर्ण करण्यासाठी,एखादी वेळेची मर्यादा दिलेली असते,त्या वेळेला ते काम तेवढ्या वेळेतच आश्चर्यकारक रितीने पूर्ण होऊ शकतं,

परंतु जर माझ्यासमोर वेळेच बंधन नसेल ,तर ते काम कधीही पूर्ण होणं शक्य नाही,आणि हे अगदी जगन्मान्य मॅनेजमेंट तत्व आहे, म्हणुन तर सेल्स टिमला टारगेट्स असतात.

या तत्वाला, “Parkinson’s Law” म्हणतात,त्यामुळे आपली उद्दिष्टे ही वेळेच्या बंधनात बांधली गेली असावीत, भलेही ती वेळ एका महिन्याऐवजी दोन महिने असू द्या, पण तारीख निश्चित असावी.

***********

📌 “वरिल पाच गोष्टींचा आधार घेऊन आपणकरता उद्दिष्टे ठरवली,तर वर्षभरात आपण ती पूर्ण केलेली असतील.

अशाप्रकारे आपण स्वतः ही ध्येय साध्य करा,लेख आवडला असेल?तर तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी नक्की फॉरवर्ड करा !

धन्यवाद.

© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764
office : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *