कोणतं काम कधी करावं? यावर एका अमेरिकन राष्ट्रपतीने मांडलेली जगप्रसिद्ध मॅनेजमेंट थेअरी

2,858 Views

#कोणतं_काम_अगोदर_करावं?

#Eisenhower_Matrix

© निलेश काळे .

📌मॅनेजमेंट च्या अभ्यासक्रमात अनेक पुस्तके , अनेक विषय असतात ,Time management हा त्यातला महत्वाचा विषय , कोणतं काम?कधी करावं ? या विषयीचा हा अतिशय महत्वाचा सिद्धांत आहे .

हा सिद्धांत
#Dwight_Eisenhower(1953- 1961)या अमेरिकेच्या 34 व्या राष्ट्रपतींनी मांडला , म्हणून याला Eisenhower matrix किंवा Eisenhower Box असं म्हणतात .

📌 “Dwight Eisenhower” हे राष्ट्रपती बनण्याअगोदर अमेरिकन आर्मिचे चीफ होते,NATO चे सुप्रीम कमांडर होते,आणि त्यांचे आयुष्य अतिशय Productive असं जगले , त्यामुळे या सिद्धांताला महत्व प्राप्त होते..

या Matrix मध्ये चार पार्ट आहेत .

📘1) Do it first
📔2) schedule
📕3) Delegate
📘4) Delete

*******************************

#Do_it_first:

काही कामे इतकी अर्जंट असतात कि , दिवस उजाडल्या बरोबर करुया इतकी घाई असते.

आपल्याला बहुतेक वेळा ही कामे due असतात , Time Sensative असतात ,तसेच ही कामं आपल्यासाठी अतिशय महत्वाची असतात ,म्हणून वरिल चॅप्टर मध्ये सांगितल्याप्रमाणे 90 – 90 मिनीटांचा सायकलमध्ये ही कामे पूर्ण करून टाकावीत,ज्यामध्ये आपल्याला स्वतःला व्यस्त करावं लागतं.

***************************

#Schedule

या प्रकारची कामे महत्वाचीच तर असतात फक्त यात आपल्याकडे ती पूर्ण करण्यासाठी बराच वेळ असतो, साधारणपणे त्याची डेडलाईन ही दूर असते,,, मग आत्ताच त्याचं टेन्शन घेऊन बीपी वाढवून घ्यायची गरज नाही.

त्याच्यासाठी एक शेडयुल बनवा, आणि नंतर आपल्या सोईनुसार ती कामे पूर्ण करा.

सोप्पं आहे,या साठी एक Ball & Sand , नावाची Method वापरतात

समजा एका काचेच्या बरणीत आपल्याला 3 Balls आणि वाळू भरायची आहे.

सुरुवातीस वाळू आणि नंतर बॉल्स भरले,तर बरणीत बसणार नाहीत , पण अगोदर बॉल्स नंतर साईड साईडने वाळू भरली तर सहज बसतील,या न्यायाने अगोदर महत्वाची कामे आणि नंतर शेडयुल्ड कामे करावी,परफेक्ट होतात..

*****************************

#Delegate :

कामाचा हा तिसरा प्रकार आहे ,यात particuler काम अर्जंट तर आहे , पण इतकस महत्वाचं नाही.

मग या प्रकारात आपण स्वतः सहभागी व्हायची गरज नाही, ही कामे आपण इतरांकडूनच करून घेतली पाहिजेत,,,याला मॅनेजमेंटच्या भाषेत OPT( Other person’s Time ) असं म्हणतात,काम महत्वाचं तर आहे ,पण आपल्या जवळ दोनच हातं आहेत,दिवसाचा बारा तासांचाच वेळ आहे तर मग एक्स्ट्रा कामं करण्यासाठी आगाऊ वेळ आणि हातं कोठून आणावी? तर सोप्पं आहे,, इतर व्यक्तींवर ते सोपवा, म्हणजे? Delegate करा.

ज्यामुळे आपला वेळ आणि उर्जा दोन्ही वाचेल.

प्रत्येक यशस्वी मोठा माणूस हा स्वतःच सगळं केल्याने यशस्वी झालेला नसतो, तर त्याला इतरांकडून काम करवून घेण्याची कला आलेली असते म्हणून तो यशस्वी झालेला असतो.

तेंव्हा अशी कामं तात्काळ डेलीगेट करा !

***********************

#Delete

आपल्या समोर येणारा कामाचा चौथा प्रकार ,, यात हे विशिष्ट काम गरजेचं पण नसते आणि अर्जंट तर मुळीच नसते,यात आपला किंवा आपल्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा वेळ घालवण्यात काहीच पॉइंट नाही… मग ही कामं आपण आपल्या डोक्यावर का घ्यावी?

तुमच्या आयुष्यात असं बऱ्याचदा घडलं असेल,कि एखादं काम अंगावर घ्यायचं नव्हतं,पण कुणाच्या तरी प्रेशर मुळे ते घेतलं गेलं,आणि आता त्याचा पश्चात्ताप होतोय.

म्हणून “नाही ” म्हणायला शिका.

उद्योजकाने तर हे असे वेळखाऊ आणि मेंदुखाऊ कामे सरळ टाकून दयायला हवीत,कारण? काही केल्या आपल्याला ती परवडत नसतात, त्यामुळे,सरळ ते कामं करायलाच काय? तर त्याच्यावर विचार करायला पण नकार दया .

Delete करा …ती डोक्यातून..

म्हणजे पुढचं चित्र जास्त स्पष्ट दिसतं .

📌अशा प्रकारे ही थेअरी 4DX या नावाने सुद्धा ओळखली जाते ,
अभ्यासा,वापरा आणि प्रगती करा !

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890

शुभेच्छा

© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटन्टस,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764

आपली विक्री वाढवायची आहे?तर आजच आमच्याकडून सेल्स कन्सलटन्सी घ्या, कनेक्ट करा :

ओमकेश मुंडे सर :9146101663 .

Default image
Nilesh Kale
Articles: 83

2 Comments

  1. Nice sharing thanks

  2. Very useful method… For daily work management…

Leave a Reply