कोणत्याही गोष्टीत जास्तीत जास्त यश कसं मिळवायचं? हे सांगणाऱ्या 12 स्टेप्स

783 Views

कोणत्याही गोष्टीत Maximum_achievement कसं मिळवायचं?

©निलेश_काळे.

Brian Tracy हे एक प्रसिद्ध लेखक, विचारवंत, मोटीवेशनल स्पिकर आहे , ज्यांनी आजवर 80 पुस्तके लिहिलीत त्यातली बरीचशी मराठीत पण मिळतात,त्यातलं हे एक टॉप सेलिंग पुस्तक आहे Maximum achievement

📌हे पुस्तक हिंदित उपलब्ध आहे , मराठी साठी थोडं सर्च करावं लागेल .

📌 Maximum achievement हे एक मोठं पुस्तक आहे, त्याची समरी अगदीच थोडक्यात लिहिणे होणार नाही करिता , त्यातील एका महत्वपूर्ण टॉपिक ची चर्चा करूया !

📌 याचं नाव आहे ,

#12_Step_System_for_goal_achievement

Brian Tracy यांचं एक वैशिष्ठय हे कि, ते प्रत्येक गोष्ट करण्याकरिता एक फ्रेमवर्क बनवून देतात ,ज्यामुळे वाचकाला,तो टॉपीक ,व्यवस्थित समजतो .

याच्या मध्ये त्यांनी ध्येय साध्य करण्यासाठी 12 पायऱ्या सांगितल्या आहेत त्या खालीलप्रमाणे .

📗 #DESIRE :

बरेच जण फेसबूकवर एखादया जाहिरातीला उत्तरं देताना , interested हा शब्द वापरतात , आणि जाहिरात देणाऱ्याला पण असे interested म्हणणारे दिसले कि बरं वाटतं,पण यातले किती जण सिरियस असतात हो ?

सेम कंडीशन आहे,एखादं ध्येय साध्य करण्यासाठी फक्त इंटरेस्ट,किंवा पोकळ इच्छा ( Wish) असून चालत नाही,त्याच्या साठी प्रबळ इच्छाशक्ती लागते , थोडं अस्वच्छ भाषेत सांगायचं झालं तर , बुडाला आग लागली पाहीजे , म्हणजे मनुष्य कसल्याच अडथळ्यांना,भितींना न अडकता आपल्या ध्येयाकडं निघतो .

📌Burning Desire असणे , ही पहिली पायरी ! ज्याच्यात ही नाहीये , तो काहीच करू शकत नाही , लिहुन घ्या !

***********************************

📙Belief :

आपलं ध्येय जर साध्य होण्यासारखं असलं,तर पुढची गोष्ट फार महत्वाची आहे , ती म्हणजे विश्वास ,

आता हा विश्वास आपल्या स्वतःवर पाहिजे , याच्यावर,त्याच्यावर नाही !

बऱ्याचदा लोकं इतरांनाच म्हणतात,”मला तुझ्यावर फार विश्वास होता,कि तू मलl पैसे देशील ” !
अरे बावळ्या तू तुझ्या स्वता: वर विश्वास ठेऊन,”कामाला लागला असतास तर भीक मागायची पाळीच आली नस्ती ना ?”

📌ब्रायन ट्रासी लिहीतात , स्वतःवरचा अढळ विश्वास , अवघडातल्या अवघड गोष्टीला साध्य करून दाखवतय,फक्त तो विश्वास नाटकी नसावा,दुनियाला दाखवण्यापुरता !

**********************************
📒Write_Your_goals_down :

एखादी गोष्ट तोंडी सांगण्यापेक्षा, लिहुन ठेवली कि जास्त पक्की लक्षात रहाते , आणि हा अगदी साधा नियम आहे , जो सगळीकडे सेम आहे अगदी , पण आम्हाला आमची ध्येयं विचारली कि , आम्ही फक्त तोंडी सांगतो , पण आपण नेमकं काय ठरवलंय ? याची परफेक्ट ऑर्डर मेंदूला दयायची असेल , तर ती ध्येयं लिहून काढा !

लिहून काढल्याने,बऱ्याचदा (आता सगळ्यांचीच तर म्हणू शकत नाही ) ध्येयाकडे चालण्याची प्रक्रिया चालू होते .

**********************************

📙How_will_you_benifite ?

ही एक मेंदूला उल्लू बनवण्याची साधा ट्रिक आहे , बघा जो पर्यंत आपल्याला एवढं करून काय मिळणारंय ? हे माहीत होत नाही तो पर्यंत आपल्याला त्याची लालूच लागत नाही .

आता ही चांगली लालुच,चांगली गोष्ट आहे,कारण वर्दीच्या ” चांगल्या” लालसेपोटी कित्येक पोरं,तुफान मेहनत करतात .

हे असंच साध्य करावं लागतं,कारण फक्त उजेडाकडं एक टक बघत प्रयत्न करायला आपण काही , साधु,संत नाहीयेत .

📌अशा प्रकारे चारा दाखवून मासेसुद्धा फसतात,याचा अर्थ ही गोष्ट निसर्गात सुद्धा आहे .

*********************************
📕Analyse_your_starting_Point:

आपण बऱ्याचदा कित्येक यशस्वी माणसांचं भाषणात पुढचा पॉईंट ऐकला असेल , “आम्हाला रहायला घर नव्हतं , एकच शर्ट आठ दिवस घालायचो , पण नंतर मेहनत केली आणि आज हे एवढं यश मिळवलं ” !

किंवा

वजन घटवणाऱ्या औषधावाले तर शंभर टक्के Before आणि After चा फोटो दाखवतात .

तर यात पहिला फोटो का दाखवतात ? केलाय कधी विचार ?

📌त्या फोटोला initial point म्हणलं जातं, आणि इथून निघून आपल्याला ध्येय साध्य करायला , हा पॉईंट मदत करतो , आणि त्यामुळे याचं Analysis करणं खूप महत्वाचं असतं .

***********************************

📗Always_have_a_deadline

जवळपास प्रत्येकच ऑफीसमध्ये बॉस आपल्या कर्मचाऱ्याला एखादं काम पुरं करण्यासाठी Deadline देतो , कशासाठी देतो बरं ?
तर त्याचं उत्तर असं आहे,कि मानवाचा स्वभाव हा टारगेटला अनुसरून कामं करण्याचा आहे ,
डेडलाईन असली कि , कोणतीही व्यक्ती जास्त ताकदीने काम करते .

सेम स्वतःबरोबर करायला चालु करा , स्वतःला पण फार मोकळीक देऊ नका , डेडलाईन दया , ठरवा , आणि त्यानुरुपच कामं करा , बघा जादु घडल्यासारखी पटापटा कामं होतात,हे एक फार महत्वाचं मॅनेजमेंट प्रिसिपल आहे .

**********************************

📙identify_and_list_Obstacles:

कोणत्याही गोष्टीची पूर्वतयारी करताना अडथळे येणारंच हे ठरलेलं असतं,आर्मीच्या कोणत्याही ऑपरेशन मध्ये याला फार महत्व आहे , ते सर्वात अगोदर येणाऱ्या प्रॉब्लेमची लिस्ट तयार करतात , त्यावर पर्याय तयार ठेवतात , आणि मगच ऑपरेशनला निघतात , आपण पण याच पद्धतीचा वापर करू शकतोच की ?

कोणते अडथळे येऊ शकतात?याची यादीच तयार असली कि,ध्येय गाठणं सोप्पं जातं .

********************** ********

📕identify_the_People_who_can_help_You:

कोणतीही गोष्ट एका व्यक्ती कडून होत नसते,हे तर सत्य आहे,मग अशा व्यक्ती शोधुन ठेवा,जे आपले काम सोपं करू शकतात ,

समजा आपलं ध्येय हायवेवर हॉटेल टाकण्याचं आहे .
सगळ्या गोष्टी आपण एकटेच करू शकतो का ? नाही ना ? आपल्याला,मिस्त्री शोधावा लागेल , कुक , वेटर,क्लीनिंग स्टाफ,मार्केटर , सगळं सगळं शोधून ठेवावं लागेल,तेंव्हा कुठे आपले हॉटेल चालू करायचे ध्येय साध्य होईल .

**********************************

📗Make_a_Plan:

घर बांधायचं असो कि , व्यवसाय ऊभा करायचा असो , ऊठा रे ऊठा आणि काम चालू करा ! असला प्रकार ना पहिले चालत होता ना आता चालतो ,

ब्रायन ट्रासी म्हणतात,छोटया छोट्या गोष्टींकरिता पण प्लान बनवा , प्लान बनवला कि गोष्टी समोर क्लीअर दिसायला लागतात , हे चांगलं असतं , प्लान ला नीट फॉलो करता येतं, महत्वाचं काय आहे ?, कमी महत्वाचं काय आहे? हे कळतं , म्हणून सर्वात अगोदर प्लान बनवा .

**********************************

📙Make_Visualization :

Brian Tracy सांगतात कि , कधी कधी फक्त प्लान बनवून चालत नाही,आपण आपलं ध्येय साध्य केल्यावर कसे दिसू किंवा कसे असू याचं स्पष्ट चित्र स्वतः , स्वतःसमोर उभं करायला पाहिजे .

जसं आर्किटेक्ट फक्त ब्लू प्रिंट बनवत नाहीत , तर जी बिल्डींग बनवायचीये तिचे 3D image किंवा पूर्ण मॉडेल तयार करतात , जेणेकरून बांधकाम करणाऱ्याला हुरूप येतो .

अगदी तसच स्वतःला सूद्धा सवय लावूया , कि नेमकं ध्येय साध्य झाल्यावर चित्र कसं दिसणारंय ?
या मुळे आपलं ध्येय साध्य व्हायला मदत होते .

***********************************

📒Never_Say_l_Quit

ही सगळ्यात खतरनाक गोष्ट आहे .
बरेच जण ध्येय साध्य होत नाहीये,हे असं दिसलं की,हात/पाय/डोकं सगळं टेकतात .

ब्रायन ट्रासी म्हणतात,फक्त हे करू नका ,वेगवेगळ्या ट्रिक वापरल्या कि,ध्येय साध्य होणारच आहे, जरा धीर धरा ! फक्त हार मानू नका !

**********************************

📌 वरिल सर्व पॉईंटस ब्रायन ट्रासी यांच्या बेस्ट सेलिंग बुक ,,, “Maximum Achievement” मधून घेतलेले आहेत,,हे पुस्तक फार गाजलेले आहे,त्यामुळे Audio format मध्ये,युट्युबला ,अगदी हिंदीत सुध्या उपलब्ध आहे ,त्यामुळे वाचा आणि स्वतःची प्रगती साध्य करा .

📌 आमचा छोटा हा प्रयत्न सफल बनवण्याकरिता हा छोटा लेख फक्त इतरांपर्यंत पोहचवा . !

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890

शुभेच्छा !
© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट,
आनंद पार्क,औंध,पुणे
9518950764

office : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *