कोणत्याही डिल मध्ये वापरायचं शेवटचं अस्त्र आहे,”हे” वापरताय का?

कोणत्याही डील मध्ये वापरायचा शेवटचं अस्त्र आहे हे, वापरताय का?

Power of _WALKING AWAY

📌 आजपर्यंत या आपल्याला हेच सांगत आलोय कि ,ग्राहकाला जपा ,त्यांच्याकडून रेफरंस मिळतो, त्यांच्याकडून पैसा येतो,वगैरे ,वगैरे! पण आज याच्या कम्प्लीट विरोधात जाऊन एक गोष्ट सांगणार आहे, विषय थोडा वेगळ्या स्वरूपात घ्या !

📌ग्राहकाबरोबर प्रेझेंटेशन, वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर,प्रॉडक्ट त्यांना पसंत वगैरे आल्यानंतर आपण ज्यावेळेला निगोशिएशनला बसतो,त्यावेळी ती डिल होण्याची शक्यता किती पर्सेट असू शकते ? सांगू शकता?

नाही … आपण ते सांगू शकतच नाही, कारण ते आपल्या हातात नसतं.

बऱ्याचदा अनेक विक्रेते इतक्या उत्साहात म्हणा किंवा गरज दाखवुन म्हणा विक्री करायला जातात कि, समोरचा समजून जातो,कि याला विक्री करायची फारच गरज आहे.

सध्या अनेक वेळा आपण अशा बातम्या वाचतो कि,शेतकऱ्यांची पिळवणूक होते,किंवा त्यांना योग्य रेट मिळत नाही, फुकट भावात पडेल त्या किंमतीत माल विकावा लागतो.

तेंव्हा, जर अशी परिस्थिती आपल्यासोबत उद्भवली तर काय कराल?

आता ही जी पुढची पायरी सांगणार आहे ती जरा कठोर आहे.

पण ती गरजेची असते, कारण एक बाजू कच्ची आणि दुसरी बाजू पक्की अशाप्रकारे व्यवहार होत असेल तर एका कोणावरी अन्याय होणे स्वाभाविक आहे आणि तो नक्की होणार.

📌 समजा आपण विक्रेते आहोत आणि आपल्याला खरोखरच गरज आहे.

ती विक्री झाली पाहिजे ,परंतु आपण आपल्या मर्यादा समोरच्याला किती ओलांडू द्यायच्या? हे ठरवलं पाहिजे.

कारण काही लोक इतके विचित्र असतात ती त्यांना समोरच्याचा मान सन्मान ठेवताच येत नाही ,आणि अशा लोकांना अशा लोकांना आपण त्यांची जागा दाखवून द्यावी लागते, त्यांना दाखवून द्यावं लागतं की ,आपण त्यांच्यावर अवलंबून नाही आहोत.

📌 कोणताही व्यवहार जर आपल्याला आपल्या बाजूने व्हायचा असेल तर नेहमी उठण्यासाठी तयार रहा.

📌 माझं नेहमीच सांगणं आहे की आपण खूप चांगले (So Nice) बनून दरवेळी जिंकू शकत नाही,गरज पडली गरज पडली तर मर्यादा सोडून / अव्यवहारी वागून उठावं लागतं आणि हा पर्याय अतिशय परिणामकारक आहे.

समोरच्याला सरळ सरळ शब्दात सांगून द्या कि, “माझी मर्यादा इथपर्यंत आहे आणि तुम्ही जर पुढे येऊ शकत नसाल तर आपला व्यवहार होणार नाही ” !
जागेवरून उठा आणि सरळ चालायला लागा.

70 टक्के वेळा ही ट्रिक काम करून जाते.

आपल्याला या जगात प्रत्येकाला खुश करायचं नाहीये, कारण शेवटी पैसा मिळवण्यासाठी सगळेच जण विक्री करत असतात, तोच मिळणार नसेल तर काय उपयोग आहे?

📌 कित्येक लोक नाही (NO) हा शब्द उच्चारायला सुद्धा घाबरतात.

पण ” नाही” या शब्दाला इतकं जास्त महत्त्व आहे की, तो शब्द जर आपण परिणामकारक रीतीने आणि योग्य ठिकाणी वापरला तर आपला फार मोठे नुकसान होण्यापासून वाचू शकतात आर्थिक फायदा झाला नाही पण मानसिक नुकसान तर होणार नाही.

बघा एखादा व्यक्ती भिकारी जरी असला तरी त्याला स्वतःचा एक स्वाभिमान असतो, म्हणून माणुस दुसरा कुठेही आघात सहन करेल पण स्वाभिमान आवर आघात देत नाही.

त्यामुळे विनाकारण समोरच्याला शरण जाऊ नका,तो आपला गैरफायदा घ्यायला लागेल.

📌 No आणि Walkaway Direction

या दोन गोष्टींचा वापर निगोसिएशन मध्ये नेहमी करावा ,ही एक पावर आहे आणि त्यावर योग्य ठिकाणी योग्य व्यक्ती समोर वापरावीच लागते नाहीतर लोक आपल्याला त्यांचा नौकर समजायला लागतात.

📌 आपल्याला प्रोफेशनल सेल्स पर्सन बनायचं आहे People pleaser नाही.

📌 अनेक विक्रेत्याला समोरच्या माणसाला दुखवू वाटत नाही.

इथे खरंतर आपल्याला प्रत्येकालाच दुखवायचं नाहीये, पण माणूस पारखून तरी घ्या ,समोरचा व्यक्ती ऐकतच नसेल तरीही आपण त्याचं मन वळवायचा किती प्रयत्न करायचा?

📌 त्यामुळे इथून पुढे कोणताही व्यवहार करत असताना हा व्यवहार आपल्या बाजूने फायद्याचा व्हावा असा वाटत असेल, तर उठून जाण्याची तयारी ठेवा, यात दोन गोष्टी आहेत.

1) तो सांगणार कि, आपला व्यवहार होणार नाही,
2) आपण त्याला सांगणार कि, आपला व्यवहार होणार नाही.

काही तरी एक होणारच आहे.

तर मग हा चान्स त्याला का दयायचा?तुम्ही निघा ! म्हणजे शेवटी सुद्धा आपलं कंट्रोल राहिल , आणि तो आपलं म्हणणं कदाचित मान्य करेल सुद्धा !

हा एवढा एकच नियम आपण जर पाळला ,तर अनेक व्यवहार आपल्या बाजूने होतील यात तिळमात्र शंका नाही.

https://www.facebook.com/groups/675025626396370/?ref=share

©निलेश काळे.
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स
आनंद पार्क, औंध, पुणे.
9518950764

office : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *