कोणीही टॅलेंटेड बनु शकतं का? बापाने कसं बनवलं आपल्या तीन मुलींना चेस ग्रॅण्डमास्टर रियल स्टोरी

कोणीही टॅलंटेड बनू शकतो का?

बापाने कसं बनवलं आपल्या तीन मुलींना चेस ग्रॅण्डमास्टर?

रियल स्टोरी.

“Story of Polgar Sisters”

टॅलेंट,या शब्दाला आपल्याकडे प्रचंड महत्व आहे,कारण?? जास्त टॅलेंट = जास्त चांगलं शिक्षण = जास्त चांगला जॉब = श्रीमंती

म्हणजेच

टॅलेंट = श्रीमंती,हे तत्व सगळीकडे मानलं जातं.

,पण विषय असा आहे कि,कोणतीही व्यक्ती टॅलंटेड बनू शकते का?

तर याचे उत्तर आहे ….. हो !

तर ही स्टोरी आहे एका कुटूंबाची !

तसं दंगल सिनेमात फोगाट बहिणींच्या यशाची कहाणी आपण बघीतलीच आहे.

तसंच काहीशी ही स्टोरी आहे असं समजा.

हंगेरी या छोटयाशा युरोपीयन देशात Leszlo Polgar नावाचा युवा शिक्षक आणि लेखक होता,त्याने एका पुस्तकातून थेअरी मांडली कि,मुलांना अथवा असं म्हणा कोणत्याही हेल्दी व्यक्तीला एखादया क्षेत्रात जिनीयस बनवणे शक्य आहे.

पण लोकांनी त्याच्या पुस्तकाचा आणि थेअरी चा उपहास केला,थट्टा टिंगल किंवा टवाळी या लेवल पर्यंत त्याची मस्करी झाली .

आता Leszlo ची पंचाईत झाली.

ते त्या वेळी अविवाहीत होते,म्हणून त्यांनी ठरवले कि,आपल्या अजून न जन्मलेल्या मुलांना जिनीयस बनवायचे.

केवढा तो कॉन्फीडन्स???

आता त्यांनी विविध मुलींना प्रपोज करणारी पत्रे पाठवायला चालू केली, ( समजून घ्या, हा काळ साठीचं दशक आहे )आणि कार्ला नावाच्या एका युक्रेन मधील युवतीने लग्नाला संमती दिली.

पण या पठ्ठ्याने तिला सर्व बाब अगोदरच सांगितली होती .

एखादी व्यक्ती आपली थेअरी सिद्ध करण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकते याचे हे पॉजीटीव उदाहरण आहे.

त्यांना पहिली मुलगी झाली1969 मध्ये Susan Polgar.

बरं आता थेअरी सिद्ध करायची वेळ चालू झाली आणि चालु झाला,मानवी शिक्षण क्षेत्रात Amazing ठरणारा प्रयोग.

Laszlo ने Chess हे क्षेत्र निवडलं ,, कारण त्यांना त्यातलं थोडंफार कळत होतं.

इथे थोडंफार मुद्दाम लिहीलय, कारण त्याला थोडफारच कळत होतं आणि या क्षेत्रात त्याची थेअरी सिद्ध करता येऊ शकत होती.

मुलगी मोठी होऊ लागली तस _ तसं Laszlo ने “चेस कसा शिकवायचा? ” याचे स्वतः शिक्षण घेतले,आणि Susan ची ट्रेनिंग चालू झाली .

दोघं _ बाप – लेक चेसची प्रॅक्टीस करत असत,असं करता – करता .
त्यांनी Susan ला वयाच्या चौथ्या वर्षी लोकल स्पर्धत उतरवले, जिथे किमान क्वालिफाय करणाऱ्या मुली तिच्या पेक्षा दुप्पट वयाच्या होत्या.

आणि कमाल बघा,या पोरीने 10-0 अशा फरकाने ती टूर्नामेंट जिंकली

पण इथे पण लोकांनी असं म्हणायला चालू केलं कि,ती जन्मजात Talented आहे.

झाला का लोच्या ?

पण त्यांनी Susan ची प्रॅक्टीस चालू ठेवली,दरम्यान त्यांना Sofia आणि Judit नावाच्या दोन अजून मुली झाल्या.

Susan ला आता प्रोफेशनल चेसची कोचींग चालू झाली,होती.

तासन् तास ती आणि तिचा कोच प्रॅक्टीस करत असंत आणि Sofia आणि Judit आपल्या बहिणीला बघत असत .

पुरुषांच्या खेळात ,,,वयाच्या पंधराव्या वर्षी 1984 मध्ये बुद्धीबळातला सर्वात प्रतिष्ठीत Top 15 Player मध्ये तिने स्थान मिळवलं आणि 1991 मध्ये Grand Master आणि 1996 _ 1999 पर्यंत world champion राहिली.

दुसरी बहीण Sofia ही पण Womans’ Top Player मध्ये पोहचुन international master बनली.

तिसऱ्या Judit ने मात्र चमत्कार,केला तिचं रेकॉर्ड … “strongest Chess Player of ALL TIME” असं आहे.

Judit ही पण Grand master आहे वयाच्या 15 व्या वर्षी Bobby fisher ला हरवून ती ग्रॅन्ड मास्टर बनली,गैरी कॉस्पोरॉव,विश्वनाथन आनंद आणि अशा 11 ग्रॅन्ड मास्टर्स ला तीने चेस मध्ये हरवले आहे .

अशा प्रकारे जगात असणाऱ्या 950 ग्रॅण्डमास्टर्स मधील 2 याच कुटूंबातून आले .

आता सर्वात महत्वाचा प्रश्न : का आले ?

कारण एका माणसाने ठरवलं,कि टॅलेंट हे जन्मजात असलं तरीही,योग्य दिशेने भरपूर प्रॅक्टीस ने कोणीही टॅलंटेड बनू शकतो,

हवी असते ती मेहनतीची तयारी आणि थोडी कोचींग .

वरिल स्टोरी ही काल्पनीक नसून, सत्य घटना आहे.

आज Susan Polgar या 50 वर्षाच्या असून …. चेस ऍकेडमी चालवतात .

Judit Polgar यांचे TedX मधील भाषण पण ऐकण्यासारखे आहे.

Polgar sisters बद्दल अजुन जास्त माहिती गुगलवर मिळू शकेल.

यातून प्रेरणा मिळावी,

आणि कोणीही टॅलंटेड होऊ शकतो , हे आपल्या लक्षात यावे कि कोणीही आईच्या पोटातून शिकून येत नाही … हे सांगण्यासाठीच सगळं.

super 30 मध्ये पण आपण हे बघीतलेच आहे,”राजा का बेटा अब राजा नही बनेगा,वो बनेगा जो हकदार होगा” हे परत एकदा सिद्ध करून सांगण्यासाठीच हा लेखाचा पसारा.

निलेश काळेला कधीही निबंधात चांगले मार्क पडले नाहीत, मराठीच्या शिक्षकांनी नेहमीच वाजवलं.. पण आज त्याचं लिखाण वाचण्यासाठी लोकं ब्लॉगवर येतात.

टॅलेंट नव्हतं… प्रॅक्टीस!

एकच सांगायचंय ,मेहनत घ्या,यश नक्की मिळेल

असेच लेख वाचायचे असतील तर आपल्या वेबसाईटवर रोज या,लिंक खाली आहे.
www.nileshkale.com

शुभेच्छा

© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764

उद्योगनिती कडून तुमच्या सेल्स वाढीसाठी कोचींग हवीये? तर कॉल करा.
ओमकेश मुंडे सर : 9146101663

Previous Post Next Post

3 thoughts on “कोणीही टॅलेंटेड बनु शकतं का? बापाने कसं बनवलं आपल्या तीन मुलींना चेस ग्रॅण्डमास्टर रियल स्टोरी

  1. तुमचे लेख नेहमीच प्रेरणादायी असतात, मी आवर्जून तुमच्या पोस्ट्स आणि लेख वाचत असतो, तुमचं प्रोफाइल मी see first या कॅटेगरी मध्ये ठेवलं आहे जेणेकरून तुमची एकही पोस्ट मिस होणार नाही, समाजाप्रती तुमचं मार्गदर्शन हे एक अमूल्य योगदान आहे
    आपल्याला धन्यवाद व खूप खूप शुभेच्छा,
    भगवंताची कृपा आपल्यावर सदैव राहो

  2. Really practice makes man perfect.. Nice story n lesson as well… Kale sir… Your blog topic are very different n interesting…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *