खाद्यतेल पॅकेटवर,”FREE FROM ARGEMONE OIL” का लिहितात ?

956 Views

खाद्यतेल पैकेटवर असं का लिहिलेलं असतं? Free From Argemone oil.

काल एका फेसबुकवर “बिलायती” ( एक जंगली झुडूप ज्याला Argemone Mexicana म्हणतात ) बद्दल एकाने माहिती विचारली कि, हे झुडूप औषधी आहे का विषारी?

त्याच्यावरच हा लेख आधारित आहे.

भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी खाद्यतेलं रोजच्या स्वयपाका मध्ये वापरली जातात.

शेंगदाणे, सोयाबीन, सुर्यफुल, करडी, तीळ, खोबरेल तेल,राईसब्रान, आणि मोहरीचे तेल, या तेलांचा प्रामुख्याने समावेश होतो.

उत्तर भारतात तर सर्वात जास्त उत्पादन मोहरीचे होते, मोंढयात मोठया प्रमाणावर, या तेलबियांची उलाढाल होते, त्यामूळे साहजिकच इकडे मोहरीचे तेल जास्त प्रमाणात खाल्ले जाते.

भेसळ जिवावर उठली :

हा प्रकार घडला, सन 1998,मध्ये

दिल्ली आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर Epidemic Dropsy चे पेशंट येऊ लागले.

त्यांच्या हातापायाच्या रक्तवाहिन्या आतल्या आत फूटुन, मोठय़ा प्रमाणावर सुजलेले अवयव घेऊन पेशंट दवाखान्यांमध्ये येऊ लागले.

दिल्लीमध्ये तर महामारी आल्यागत, परिस्थिती निर्माण झाली.

लोक दवाखान्यात येतानाच,हातामध्ये खाद्यतेलाची बाटली घेऊन यायचे.

एकूणच सगळी इमर्जन्सी निर्माण झालेली होती.

या केसला आपण “1998 Delhi oil poisoning” असं सर्च करू शकता.

चौकशी कमिटी बसवली गेली,त्यात असं आढळलं कि, या खाद्यतेलात भेसळ म्हणून Argemone Mexicana चे स्वस्त तेल मिसळले गेले होते.

या विषारी घटकामूळे 60 लोकांचा जीव गेला,3000 लोक अत्यवस्थ स्वरूपाने बिमार झाले, आणि एवढं सगळं, नफेखोर आणि नीच वृत्तीने केले.

Testing :

दोन तीन राज्यांमध्ये याचा कहर माजला,खूप गजहब झाला, चौकशीत असं दिसून आलं कि,खालपासून वरपर्यंत कुठेही टेस्टींग करिता नीटनेटकी सिस्टिम नाही.

तेल मोठया प्रमाणावर खूल्या स्वरुपात विकलं जातेय,नियम सोप्पे आहेत.
निर्बंध कमी आहेत.

मग FDAनी,पॅकेजिंग केलेल्या तेलासाठी मोठया प्रमाणावर नियम घालून दिले.

प्रत्येक बॅचच्या इतर सर्व टेस्ट बरोबर, Argemone ची भेसळ तर नाही यासाठी टेस्ट केली जाते,आणि तेलामध्ये बिलायतीच्या तेलाची भेसळ नाहीये,हे स्पष्ट लिहिलं जाते.

आजकाल खाद्यतेला बाबतीत उत्पादनाचे नियम फार कठोर आहेत, पण वैयक्तीकरित्या सांगायचं झालं तर, समोरासमोर काढून घेतलेलं घाण्याचं तेल कधीही चांगलं.

आर्टिकल आवडलं असेल तर नक्की शेअर करा.

तेंव्हा काळजी घ्या ! स्वस्थ रहा!

© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंटस,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764.

Office :
श्री ओमकेश मुंडे सर : 9146101663

Default image
Nilesh Kale
Articles: 83

Leave a Reply