गुगल,मायकोसॉफ्ट सारख्या फंडिंग करूनही,फेल झालेले स्टार्टअप

68 Views

#आपलं_Segway_होऊ_नये_म्हणुन

© निलेश काळे.

📌 एखादा प्रॉडक्ट जेव्हा मोठ्या हाईपने मार्केटला लॉन्च केला जातो, आणि जगातल्या प्रसिद्ध लोकांतर्फे त्याला शुभेच्छा मिळतात, तरीही तो मार्केटमध्ये यशस्वीपणे चालेल याची खात्री देता येत नाही .

जगातल्या टॉप लोकांकडून स्तुती झालेला असाच एक प्रॉडक्ट ,जो वाहतूक इंडस्ट्रीची पूर्ण दिशा आणि दशा बदलेल अशी कंपनीला अपेक्षा होती, परंतु तो त्याच्या अपेक्षाला कशाप्रकारे उतरला नाही?

कशाप्रकारे? एखादा प्रॉडक्ट अर्धकच्ची प्लानिंग केल्यावर आणि टेक्नॉलॉजीमध्ये होणारे नवीन बदल तसेच ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा यावर खरा न उतरल्यावर अपयशी होतो याची ही कहाणी.

📌 अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅली मधील प्रसिद्ध संशोधक आणि उद्योजक आहेत Dean kemon.

त्यांनी व्हीलचेअरवर असणाऱ्या लोकांसाठी i bot ही बॅटरीवर चालणारी व्हीलचेअर बनवली आणि सगळ्या सगळ्या जगाने कौतुक केलं.

या संशोधकाने एक कल्पना केली की, फक्त्त दोन चाकावर सेल्फ बॅलंसिंग, बॅटरी ऑपरेटेड स्कूटर बनवलीत लोकं गर्दीतुन, जास्त लवकर प्रवास करू शकतील.

एखादा मनुष्य जर या बॅटरी ऑपरेटेड वाहनावर उभा राहून संपूर्ण शहरभर प्रवास करू शकला तर ,त्याला कार / बाईक / स्कूटर याची काहीही गरज लागणार नाही , आणि तो चालत जाण्याच्या स्पीडपेक्षा अधिक वेगाने जाऊ शकेल आणि अशा प्रकारे वाहतूक क्षेत्रांमध्ये एक क्रांती येऊ शकते

आणि त्यांनी प्रयोग करायला चालू केले, हे मिशन इतका गुप्त ठेवलं गेलं की, कोणालाही याची कानोकान खबर लागली नाही आणि एक दिवस 2001 सालामध्ये त्यांनी जाहीर केलं की, आम्ही असा प्रॉडक्ट लॉंच करतोय जो इंटरनेटच्या संशोधनपेक्षा किंवा कॉम्प्युटरच्या संशोधनपेक्षा ही महत्त्वाचा ठरू शकतो.

📌 2001 मध्ये प्रॉडक्ट लॉंच झाल्यानंतर सगळ्यात जगामध्ये त्याच्याविषयी कौतुक होतं, 2002 मध्ये पूर्ण अमेरिकेला सेगवे चालवून बघायचं होतं ,म्हणजे एकंदरीतच भविष्य चांगला दिसत होतं.

📌 John Diorr हे अमेरिकन लेखक आणि Venture Capitalist ज्यांनी गुगलमध्ये इन्वेस्टमेंट केलेली, त्यांनी या प्रोजेक्ट मध्ये पैसा लावला.

कंपनीला अशी अपेक्षा होती,कि पहिल्या वर्षात किमान 1 लाख मॉडेल विकले जातील.

*********************************

📌 #Premature_Launch :

कधी कधी,Hype आणि कल्पनाशक्ती एवढी जास्त होऊन जाते कि, व्यावसायिकांना मार्केटचे अंदाजच कळत नाहीत.

आणि प्रॉब्लेमला सुरुवात झाली.

📌 हा वाहन प्रकार, सेल्फ बॅलन्सींग स्कुटरचा असल्याने, फक्त धडधाकट आणि तरूण माणसांनाच यावर उभे राहून व्यवस्थित हे चालवता येत होतं.

**********************************

📌 #Hefty_Pricetag:

$4995 = म्हणजे आजच्या हिशोबाने जवळपास 3.5 लाख रुपये,,,

म्हणजे ????किंमत जरा जास्तच ठेवली गेली.

**********************************

📌 # Battary_issue:

त्यावेळी बॅटरी इतकी प्रगत नव्हती, सहा तास चार्ज केल्यानंतर 10km / hr या स्पीडने,13 मैल प्रवास करता यायचा….. बस्स एवढंच .

म्हणजे????
याची टेक्नोलॉजी सुद्धा पाहिजे तेवढी Cooool नव्हती.

**********************************

#Recall :

सुरुवातीच्या दिवसातच बॅटरी आणि सॉफ्टवेअर प्रॉब्लेममुळे 6000 सेगवे स्कुटर्स, दुरुस्तीसाठी परत मागवाव्या लागल्या,तसं बघीतलं तर अशा प्रकारे वाहने रिकॉल करणे वाहन उद्योगाला नवीन नाही,पण तरिही हा पहिला फटका होता.

**********************************

#Non_Practical :

एखादा प्रॉडक्ट हा वापरासाठी एकदम प्रॅक्टिकल हवा, “हवेतल्या गप्पा” चालत नाहीत.

Segway चा वापर लांब रूटसाठी करता येत नव्हता,शॉपींगसाठी करता येत नव्हता,काही सामान घेऊन जाण्याकरता येत नव्हता

,म्हणजे?????या कंपनीने जे म्हणलं होतं कि,आमची स्कुटर कार्सला रिप्लेस करील, .तसं तर काहीच घडत नव्हतं.

*********************************

📌 #Only_One%_Projected_Sale:

2001 ते 2007 पर्यंत कंपनीने रेंज वाढवुन,चार्जिंग टाईम कमी करून अनेक मौडेल बाजारात आणले,पण ग्राहकांनी हातच लावला नाही तर काय होणारं?

2001 ते 2008, या 8 वर्षात,विक्रीच्या उद्दीष्टापैकी फक्त 1% विक्री करता आली या कंपनीला.

मालच विकला नाही !

*****************************

#Media_Reports_Backfired:

हा वाहन प्रकार सेल्फ बॅलन्सींग स्कूटरचा असल्याने,हे चालवायला चांगलीच ट्रेनिंग लागायची,पण तो पर्यंत सेगवेवरून लोकं कसे पडतात ?याचे मजेदार व्हिडिओ व्हायरल होऊ लागले.

त्यावेळचे अमेरिकन राष्ट्रपती जॉर्ज बुश देखील,सेगवे वरून पडले,…त्याची मोठी बातमी झाली.
याच्यावर प्रवास सुरक्षेची काहीच गॅरंटी नाही,अशी चर्चा रंगली .

2015 मध्ये उसेन बोल्टने 200 मी रेस जिंकल्यानंतर त्याची शुटींग करणारा व्हिडिओग्राफर सेगवेवर चालत होता, तो पण पडला, न्युज व्हायरल झाली. ( हा व्हिडियो युट्युबला आहे ),

शेवटी जीव प्रत्येकालाच “प्यारा”…नाही का?

**********************************

📌 #मालकचाच_अपघात

Segway ची आर्थिक परिस्थिती . काही सुधारत नाही म्हणल्यावर कंपनी विकण्याशिवाय पर्यायच नव्हता,

Jimmy Heseldon या ब्रिटीश उद्योगपतीने या कंपनीला 2009 मध्ये विकत घेतले,पण नशीबच फालतू म्हणल्यावर काय? कंपनी खरेदी केल्याच्या दहा महिन्यातच सेगवेवरून पडून त्यांचा अपघात झाला, त्यातच ते मृत्यू पावले.

*********************************

📌 #कौतूक_वापसी :

स्टीव्ह जॉब्सने, आणि John Doerr यांनी ,प्रॉडक्टची 2001 मध्ये स्तुती केलेली होती,पण हे असले प्रकार होताना बघुन त्यांनी पण, “It Sucks” “Not innovative” या शब्दात, यावर आगपाखड केली.

**********************************

#final_Survival_attempt:

2015 मध्ये या कंपनीला वाचवायचा लास्ट प्रयत्न म्हणून, Nineboat या चायनीज कंपनीने ,या ब्रॅन्डला विकत घेतलं.

बरेच बदल केले, वेगळे मॉडेल आणले परंतु नाही…. ग्राहकांनी स्विकारलेच नाही.

“पर्यटक आणि गस्त घालणारे पोलीस” यांना सोडून, कुठेही त्याचा नीट वापर होत नाही,असं त्या कंपनीला सुद्धा लक्षात आलं.

**********************************

#New_boom_and_No_target_customer:

एखादया प्रॉडक्टचा “टारगेट ग्राहक” कोण आहे ? हे निश्चित पाहिजे, तरच मार्केटिंग करून विक्री होऊ शकते, तो घटक या उत्पादनात नव्हता.

तितक्यात नव नवीन मॉडेलचे इलेक्ट्रीक स्कूटर मार्केटला आल्याने स्पर्धा आणखीनच तीव्र झाली.

📌 आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं

काय करता ?ढक्कल स्टार्ट गाडीने रेस जिंकता येत नाहीत ,Nineboat ने स्वतःच्या इतर मॉडेलवर लक्ष वाढवलं आणि या प्रॉडक्टच्या डेवलपमेंटवरचं लंक्ष कमी केलं.

***********************

#Lesson :

आपण कितीही कल्पक,आधुनीक वगैरे उत्पादन काढू, पण जास्तीत जास्त लोकसंख्येला त्यात फायदा दिसत नसेल ,तर ते त्याला स्विकार नाहीत,आणि शेवटी फ्लॉपचा ठपका बसेल.

तेव्हा आपण आपला प्रॉडक्ट मार्केटला आणण्याअगोदर पूर्णपणे Validate करूनच आणावं.

म्हणजे आपला….. Segway होणार नाही.

https://www.facebook.com/groups/675025626396370/?ref=share

शुभेच्छा
© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स,
आनंद पार्क , औंध ,पुणे .
9518950764 .

office ओमकेश मुंडे सर : 9146101663 .

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *