ग्राहकाचे हे 5 प्रकार माहित करून घ्या! म्हणजे तुमचा वेळ वाचेल.

#Businrss_Coaching : Types of Customers

आपल्या दुकानात येणारा प्रत्येक ग्राहक हा सारखाच नसतो .
याचे साधारण पणे 5 प्रकार केले जातात .
प्रत्येक प्रकारावरुन त्याला कशी वागणूक द्यायची , त्याच्याकडून आपल्याला किती आर्थिक प्राप्ती होईल याचा अंदाज बांधता येतो .
तेंव्हा यांचे प्रकार समजावून घ्या .

1 ) Easy/Devoted Customets :

आजकाल फारच चलनात आलेला एक शब्द यांना फार फीट्ट बस्तो …
“भक्त ”
ही कॅटेगरी साधारण 3 % असते ,
याला warm market सुद्धा म्हणतात.
तुम्ही दयाल ती वस्तु, दयाल त्यावेळी आणि दयाल त्या किंमतीला रोख पैसे देऊन खरेदी करायला हे लोक तयार असतात.

खरे पाहता ही आपली जमेची बाजू असते,आपली शक्ती आणि आपले अन्नदाता.
हा वर्ग तुम्हाला सोडून कोठेही जात नाही, त्यामुळे या वर्गाला चांगले जपले पाहिजे .
जेंव्हा कधी MLM च्या विरोधात कधी मी लिहीतो त्याचे कारण हेच आहे , त्या कंपन्यांना फक्त तुमचे हेचwarm market हवं असतं.

Law of averages मध्ये हे ग्राहक मोडतात.

बाकी काही नाही .

2 ) Cheap Customers :

चीप चा अर्थ गरीब असा घेऊ नका , हे मानसिकतेने भिकारडे लोक असतात .
आपण त्यांना किती ही सांगा , क्वालीटी किती चांगली आहे,गॅरंटी किती जास्त आहे किंवा अजून काहीही ,,,, यांना फक्त स्वस्तात हवं असतं.
स्कीम हवी असते, जास्तीचा फायदा हवा असतो,तेव्हा यांना क्वालीटी बद्दल सांगून वेळ वाया घालवू नये

यांची गरज कमी किंमत अशी असते तीच पूर्ण करा.

3 ) Difficult Customers :

या लोकांनी अनेक स्टार्ट अपसची वाट लावली .
यांना स्वस्त दया,उत्तम क्वालिटी दाखवा, स्कीम दया किंवा फुकट दया, हे समाधानी होतंच नाहीत.
यांना फक्त आपला जीव खायचा असतो,
यांच्या नादी लागून त्रास करवून घेऊ नका , हे जन्मात कधीच मानत नाहीत
म्हणून सरळ सरळ घालवून दिलेले परवडतात.
शंभरात 30 ग्राहक हे Difficult प्रकारातच मोडतात.

4 ) Sophisticated Customers :

या प्रकारातील ग्राहक उत्तम मानला जातो,हे लोक पूर्ण अभ्यास करून आलेले असतात .
समजा कार डिलरशीप मध्ये गेले, तर कसे सांगतील .?
तर “ग्रे कलर मारूती डिझायर ,VDI ,With ABS , सेन्सर्स ,पेमेंट कॅश करणार ,या कलर चे सिट कव्हर,अशी ग्रिल ,पुढच्या महिन्याच्या 30 तारखेला हवीये”,

यांना विशेष काहीही सांगायची गरज नसते,हे रिकामी झीग झीग करत नाहीत,यांना “स्वस्त आहे म्हणून हे निवडा”असं सांगितलेलं आवडत नाही पण त्यांच्या माहितीत भर घातलेली आवडते,

असे ग्राहक पैसे देऊन जातात, म्हणून यांना चांगले सांभाळा .

5 ) Affulant Customer :

या प्रकारच्या ग्राहकांनी ती वस्तु किंवा सेवा विकत घेण्यासाठी स्वप्नं बघीतलेली असतात ,खूप जास्त काळ पैशाची तयारी आणि प्लानिंग केलेली असते इतकी कि हा प्रकार इश्क जादे असा आहे .
हे अगदी प्रेमात पडलेले असतात,
सध्या बुलेट गाडी खरेदी करणारे तरुण यात मोडतात यांना स्वस्त, महाग,फिचर्स यांच्याशी विशेष काहीही देणे घेणे नसतेच.

सध्या मार्केट मधे Nike,Reebok चे जे सेकंड कॉपी वर्जन विकते ते यांच्यासाठी असते ,
i – phone कितीही महाग असला तरीही … लोन काढून का होईना घेतील,आनंदाने हप्ते फेडतील पण सफरचंद मिरवणारच हा हट्ट पूर्ण करतील असा हा प्रकार .
महिला ग्राहक वर्गातसुद्धा हा प्रकार खूप आढळतो ,
म्हणून या देखील ग्राहक वर्गास खूप जपावे,आपल्या संपत्तीत हे लोक भर घालतात .

अशा प्रकारे वेगवेगळ्या ग्राहकांसाठी वेगवेगळी स्ट्रॅटर्जी लावून आपण उत्तम व्यावसायिक होऊ शकतो .

तेंव्हा , शुभेच्छा

निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
5 th floor, विघ्नहर चेंबर्स,
अभिनव चौक, नळस्टॉप पुणे .
9518950764

Office
Omkesh Munde sir:9146101663
लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा .

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *