ग्राहकासमोर “रॅपोर्ट” असा तयार करावा !

953 Views

#Business_Concept

#How_to_build_Rapport_with_Customer

© निलेश काळे .

📌 ग्राहकाच्या समोर विक्रीसाठी जाण्याअगोदर आपण कोण आहोत? आपली भूमिका काय आहे? आणि आपली नॉलेज लेवल काय आहे? हे दाखवून देणे फार महत्वाचं असतं.

भलेही आपण फार प्रसिद्ध नसू, भलेही आपलं फार मोठं नाव असेल, परंतु ग्राहकांच्या समोर बसल्यानंतर सुद्धा आपला रॅपोर्ट काय आहे? आपल्याकडे किती खोल ज्ञान आहे? हे जर ग्राहकांनी ओळखलं तर तो आपल्याकडून खरेदी करण्याचे चान्सेस वाढतात.

तर हाच “रॅपोर्ट” ग्राहकांसमोर कसा वाढवायचा ?याच्या काही टिप्स तुमच्या बरोबर आज शेअर करतोय.

📌#find_out_perfect_Customer_base:

खूप जण म्हणतात आम्हाला या जगातल्या सगळ्याच लोकांना विक्री करायची आहे किंवा जो समोर दिसेल तो आमचा ग्राहक आहे.

पण मुळात असं नसतं ,प्रत्येक उत्पादनासाठी ग्राहकाची एक स्वतंत्र कॅटेगरी असते ,त्याला आपण आदर्श ग्राहक वर्ग असं म्हणू शकतो आणि आपला आदर्श ग्राहक वर्ग कोण आहे? हे सगळ्यात अगोदर शोधून काढला पाहिजे.

ज्याला हे अगदी सुरुवातीच्या काळात जमलं तो पहिली पायरी पास झाला असं म्हणता येईल.

📌 #Dont_Pitch_Everytime:

आपण एक माणूस आहोत आणि आपण माणसासारखा वागलं पाहिजे परंतु काही लोक स्वतःच्या व्यवसायाच्या मार्केटिंग मध्ये इतके गुंतलेले असतात ,की स्वतःच्या बायकोबरोबर बोलतानासुद्धा धंदाच बोलतात ,स्वतःच्या व्यवसायाच्या ॲडव्हर्टायझिंग संदर्भातच बोलतात मित्र भेटू दे ,नातेवाईक भेटू दे ,चालता चालता कोणीही भेटू दे, त्याला ते सतत स्वतच पिचिंग करत असतात ,

मित्रांनो आपण आपल्या व्यवसायामध्ये गुंतून घेतलेले चांगलं असतंय, पण लोक आपल्याला कंटाळून जावेत इथ पर्यंत पिचिंग करू नका.

या जगामध्ये फक्त मला सगळ्यात कळतं ,मीच सगळ्यात जास्त सच्च्या व्यवसायिक आहे असे म्हणणारे अनेक जण मातीखाली दफन झालेत, त्यामुळे समजुन घ्या, आपण काही फार मोठे तुर्रमखान लागून गेलेलो नाही.

📌#Research_everything_about_customer:

आपण पण या लोकांच्या समोर आपलं व्यवसायाचं प्रेझेंटेशन करणार आहोत, त्या ग्राहकांना विषयी अगोदर रिसर्च करावा ,,, कारण ? आपण ज्या व्यक्ती समोर गेलेलो आहोत त्याच्या विषयी काहीही माहीत नसेल ,तर आपलं प्रेझेंटेशन म्हणावं तेवढं प्रभावी होणार नाही !

आजकाल प्रत्येक व्यक्तीची कुंडली फेसबूक, Linkedin वर उपलब्ध आहेत कि !

त्या सर्च करा !स्टडी करा ! आणि आपला पूर्ण होमवर्क तयार ठेवा !

आता हा होमवर्क जर समोरच्या बरोबर चर्चा करताना वापरला तर आपली इज्जत वाढते !

📌 #Have_Discovery_Questions:

जो व्यक्ती योग्य प्रश्न विचारू शकतो, तो योग्य उत्तरे मिळवू शकतो.

म्हणुन समोरच्याला अपमानीत करणारे नाही, तर पर्रफेक्ट क्वालिटी प्रश्न विचारा यामुळे आपण आपली एक्सपर्टाईज ग्राहकाच्या समोर मांडू शकतो.

लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला स्वतःला एक्सपर्ट दाखवायचं आहे , पण समोरच्याला खाली दाखवायचं नाही.

यामुळे आपल्या बद्दलचं मत चांगलं होईल.

📌#learn_to_their_challenges:

बऱ्याचदा विक्रेता,,,, माझ्याकडं काय आहे? आम्ही हे किती चांगलं कसं करू शकतो , किंवा माझ्याकडं जे काही आही ते तुमच्यासाठी किती चांगलं असू शकतं हे दाखवण्यातच हुशारी मानतात !

पण ते तसं नाहीये !

त्यांना नेमके काय चॅलेंजेस आहेत त्या शोधून काढा ! आणि त्यांच्या समोर मांडा , त्यांना असणाऱ्या चॅलेंजेस आपण शोधल्या हे त्यांचे साठी शॉकिंग असतं.

आणि हा शॉक चांगला असतो, आणि याने आपली इज्जत वाढते .

📌 #Present_to_their_challanges:

आपण ग्राहकाचा नेमका प्रौब्लेम, त्याला असणारं चैलेंज, ओळखलाय ना ? मग आता त्याच्यावरच बोला.

आता इथे काय होतं ? विक्रेत्याला स्कोप दिसला,कि त्यांच्यातला स्वार्थी माणूस बाहेर पडतो, तसं करायचं नाही !

त्यांना जो प्रॉब्लेम आहे, त्याच्यावरच सोल्युशन दया ! उगाचच नाही त्या गोष्टीवर गप्पा मारू नका !

📌 या वरिल गोष्टी केल्या तर मार्केटर/सेल्समन/ क्लोजर म्हणुन आपली इज्जत वाढेल, याला ” रैपोर्ट ” म्हणतात…….

“जो कोणी मार्केटला जाणार आहे ” त्याचा मेडिकल रिपोर्ट जेवढा चांगला पाहिजे, तेवढाच “रैपोर्ट” पण चांगला हवा !

उगाचच ,,,,,,

”आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय अमूक – ढमूक ” ,असं म्हणुन काहीच होत नाही !

रॅपोर्ट लागतो ,,,,, रॅपोर्ट !

शुभेच्छा !
©निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट,
आनंद पार्क,औंध , पुणे.
9518950764,
Office : 9146101663.

Previous Post Next Post

One thought on “ग्राहकासमोर “रॅपोर्ट” असा तयार करावा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *