ग्राहक आपल्यापासून दूर का पळतो ? महत्वाचं कारण !

#business_coaching

ग्राहक आपल्यापासुन दुर का पळतो?

© निलेश काळे.

आपलं एक छोटं आर्टिकल होतं,ज्यामध्ये असं लिहिलेलं होतं कि “तुमच्याकडे करोडचा डाटाबेस असुन उपयोग नाही तर, नेटवर्क पाहिजे चांगल्या लोकांचं नेटवर्क .
त्यावर एका नेटवर्कर मित्रांने कमेंट केली कि,तरिही लोकं नेटवर्किंग पासून का दुर पळतात ?
चांगला प्रश्न आहे !

📌 त्याचं उत्तर सगळ्यांनाच कामी पडेल,म्हणून नीट वाचा.

आपले पूर्वज,ज्यांना आपण आदिमानव म्हणतो,त्यांच्यापासून काही चांगल्या/ वाईट गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत,ज्या आपल्या “जिन्स”( Genes) मध्ये आहेत.

समजून घ्या, ज्यावेळी हे आदिमानव शिकारीला बाहेर पडायचे तेंव्हा यांच्याकडे ना शिंग होते, ना दात, ना स्पीड होती,ना साईज,त्यामुळे हे सतत अलर्ट राहयचे शिकारी प्राण्यांपासून.

त्यांना एक शंका होती किंवा असं म्हणा ,कि भिती होती,कुणीतरी कुठूनतरी येईल आणि आपल्याला खाऊन टाकील.

याला fear of unknown असं म्हणलं जातं,आणि हीच भिती आजही प्रत्येक मानवामध्ये आहे, त्यामुळेच तुमच्या ग्राहकामध्ये देखील आहे.

Fear of unknown : म्हणजे? अनोळखी व्यक्ती,उत्पादने,किंवा व्यवहाराबद्दल साशंकता वाटणे,किंवा पट्टकन एखादा निर्णय देण्याची भिती वाटणे अथवा लगेच अनोळखी व्यक्तीकडून दोन पैसे देऊन खरेदी करण्याची भिती वाटणे.

हेच मुख्य कारण आहे,कि,जेंव्हा आपण अनोळखी व्यक्तीला, किंवा ओळखीच्याच व्यक्तीला त्याला माहित नसलेला प्रॉडक्ट किंवा सर्विस विकायला जातो, तेंव्हा तो दुर पळतो, कारणं सांगतो,किंवा तुमचा पुन्हा फोन सुद्धा उचलत नाही.

कारण???? “तुम्ही त्याची भिती घालवलेली नाही”.

******** ******** ******** ***

यावर उपाय काय ?

मला सांगा,तुम्ही जो मोबाईल वापरताय किंवा घरामध्ये जे काही तेल, साबण,शाम्पू, पावडर वापरताय, त्य ब्रॅन्डची ओळख तुम्हाला किती वर्षापासून झाली,आजही त्याची जाहिरात कुठे ना कुठे दिसतेच ना?
का दिसते?
तर या कंपन्यांना माहितंय,कि सतत मार्केटला दिसून लोकांच्या मनातील भिती घालवता येते.
लोकांना तुम्ही किंवा तुमचा प्रॉडक्ट सतत अगदी वर्षानुवर्ष दिसायला लागला कि, विक्री होणार, ऑटोमॅटीक होणार.

पण कित्येकांना वाटतं कि,आम्ही ऑफर देऊ, एकावर एक फ्रि देऊ,थोडया दिवसात जास्त वेळा दिसून लोकांना फिचर्स बेनिफिट सांगून त्यांचं मन वळवू.

काही लोकं ( शंभरातले 3 )याला भुलून तुमच्याकडे येतीलही, पण जर जास्तीत जास्त लोकं संपर्क करत नसतील,केला तरी पुर्ण ऐकून घेत नसतील,पुर्ण ऐकून घेतलं तरिही तुमच्याकडून पैसे देऊन खरेदीला टाळत असतील.
तर समजून जा ! “त्यांच्या मनात कशाची तरी भिती आहे किंवा शंका आहे,जे ते कधी बोलवुन दाखवतील किंवा दाखवणार सुद्धा नाहीत”.

तेंव्हा कस्टमर च्या डोक्यातली भिती ओळखा त्यावर काम करा, त्यासाठी इमानदारीने सतत दिसत रहा, कुठल्या ना कुठल्या रुपाने सातत्याने मार्केटिंग करून अगोदर विश्वास संपादन करा !

ग्राहकाच्या डोक्यातली भिती घालवा !

ट्रस्ट तयार करा !

मग जो ग्राहक येईल,तो खरेदी करेल सतत करेल आणि इतरांना पण आपल्याकडे खरेदीकरिता घेऊन येईल.

मार्केटिंग साठी शुभेच्छा !

© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंटस
आनंद पार्क औंध पुणे.
9518950764
Office : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *