ग्राहक रेटसंदर्भात घासाघीस करणारच नाही, हा प्रकार वापरा.

161 Views

*AVF*

“ग्राहकाने घासाघीस करू नये,असं वाटतंय ना?मग पुर्ण वाचा”!

© निलेश काळे.

📌 ज्या वेळेपासून मार्केट ओपन व्हायला सुरुवात झाली आहे, तेव्हापासून विक्रेत्यांना ना जाणे कोण?पण एका प्रकारची घाई झालेली आहे.

प्रत्येकाला आपला माल फक्त विकायचा आहे, “माझ्याकडे माल आहे ,तो बघा आण पटटकन मला पैसे द्या ” हीच भावना सगळीकडे दिसतेय.

आणि सगळा सोशल मीडिया विशेष करून उद्योग व्यवसाय विषयाचे ग्रुप तर ,अशा प्रकारच्या मेसेज असणे अधिक गच्च भरून चाललेत.

प्रत्येक जण येतोय ,तुम्हाला याची गरज आहे का? याची रिक्वायरमेंट आहे का ? रेफरंस दयाल का ? माझ्याकडून मला घ्याल का ?मला व्यवसाय द्याल ? का हा एकच घोषा लावलाय लोकांनी पहिल्यापासून.

या अशा प्रकारच्या उथळ विक्रीला, माझा पहिल्यापासून विरोध आहे.

तुमचा माझा कसल्याही प्रकारचा परिचय नाही ,तरीदेखील मी तुमच्या तुमच्या इनबॉक्स मध्ये मेसेज टाकतो, आणि फक्त आणि फक्त दुकान मांडुन बघतोय.

_हे प्रकार प्रकार अतिशय बालीशपणाचे आहेत , यात तुम्हाला जरी वाटलं की ,मी खूप काही मेहनत करतोय,खूप काही मार्केटिंग करतोय खूप लोकांच्या समोर जातोय, किंवा अनेक लोकांना माझा प्रेझेंटेशन देतोय, तर समजून घ्या ,हे फक्त सगळे मर्कट चाळे आहेत.

📌 आपण बऱ्याच वेळेला नेटवर्किंग इव्हेंटला जातो, या इवेंटमध्ये लोक खिसा भरून कार्ड घेऊन जातात, आणि वापस येताना दोन खिसे भरून बिझनेस कार्ड घेऊन येतात, तिथेसुद्धा ज्यावेळी हे एकमेकांना भेटत असतात, पण इथे सुद्धा प्रत्येक जण समोरच्याला पिचींग करत असतो, जसं कि दुनिया उद्या बुडणार आहे.

तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल, तर मला बिलकुल कॉल करा ,आम्ही अशी सर्विस देतो, आम्ही तशी सर्विस देतो, आम्ही हे करतो ,आम्ही ते करतो म्हणजे साधारणपणे आपला अजेंडा चाललेला असतो की आपल्याला डोअर टू डोअर सेल्समन सारखं विक्री करायची आहे.
यांच्या डोक्यात बाकी कुठलीही गोष्ट का बरे घुसत नाही?, हे काही लक्षात येत नाही?

📌 एक गोष्ट आपण सगळेच मान्य करतो की पैशाची गरज सगळ्यांनाच आहे ,कारण जगायला पैसे लागतात, व्यवसाय चालवायला पैसे लागतात, आणि बाकी सगळ्या गोष्टी नाही पैसेच लागतात ,पण पैसे मागण्याची एक पद्धत आहे, इथे आपण अतिशय गरजू माणसासारखं कोणाच्या दारामध्ये याचक बनून उभं राहिलो तर तो शेवटी आपल्याला टाळणारच आहे,.

याचना करणे म्हणजे एकंदरीत भीक मागणेच आहे,आणि ही गोष्ट एखाद्या व्यावसायिकाला न शोभणारी आहे, मग आपण येथे पैशाच्या बदल्यात व्हॅल्यू देतोय तर इथे याचना करायची काय गरज आहे?

📌 गरजवंताला अक्कल नसते असं म्हणलं जातं ,पण गरज असणे ही वेगळी गोष्ट आहे आणि सगळ्या जगाला मी किती दबलेला आहे किंवा माझ्यावर किती अन्याय झालाय मी किती उपाशी आहे किंवा मला कसा त्रास होतोय, हे दाखवून त्यांच्याकडून सहानुभूती घेऊन काही होणार नाही.

ज्या प्रकारे ही भावना वापरून काही होणार नाही ,तसंच विनाकारण , “मी सुद्धा मार्केटला उभा आहे हे दाखवून सुद्धा काही होणार नाही, मागे लागू पण चालत नाही , रिस्पेक्ट कमावला कि पैसा आपोआप येतो.

The Solution :

जर आपण ग्राहकाच्या पाठीमागे लागायचं नाही ही तर मग ग्राहक आपल्याकडे कसा येईल ? आणि तो आपल्याला पैसे कसे देईल ? ही गोष्ट तुमच्या आता डोक्यात यायला लागली असेल.

याचं उत्तर अगदी सहज सोपे आणि सरळ आहे

त्याच्या अगोदर एका साध्या प्रश्नाचे उत्तर द्या आपण आपल्या आई-वडील आजी-आजोबा या लोकांना मान का बर देतो? त्यांची काळजी का बरे घेतो?? किंवा त्यांना काय हवं नको आहे ते सगळ्या गोष्टी का बरे पुरवतो? बरं आता आई-वडील सोडा आपले सासू सासरे मामा मामी काकू या सगळ्या लोकांनी आपल्याला काय केलेलं आहे म्हणून आज आपण त्यांची काळजी करायला लागतो?

तर एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळी आपण एकदम छोटे होतो ,आपल्याला पैसा काय आहे ?हे माहित पण नव्हतं आपल्याला हे पण कळत नसायचं की आपल्याला आता भूक लागलेली आहे किंवा आपल्याला कपडे बदलायची वेळ आलेली आहे किंवा अजून काहीही त्यावेळी आपले आई-वडील कुठलाही स्वार्थ न ठेवता आपल्याला जे काही हवं नको? ते बघत आलेले असतात.

त्यांनी आपल्याला शाळेत घातलेलं असतं आपल्याला कपडे घेतलेले असतात ,आपल्याला आजारपणा मध्ये डॉक्टरांकडे नेलं असतं,या सगळ्या गोष्टी त्यांनी बिना पैशाचा मोबदला घेता किंवा कसलीही अपेक्षा न ठेवता केलेल्या असतात.

म्हणून आपल्या नजरेमध्ये त्यांची किंमत ही खूप जास्त असते.

काही अपवाद सोडले तर आई-वडिलांना नीट जपणारे मुलं घरोघरी दिसतात

हे कशामुळे घडलं? तर आपल्या आईवडिलांनी आपल्या आयुष्यामध्ये एक व्हॅल्यू केलेली आहे आणि या व्हॅल्यू ऍडिशन मुळे आपण त्यांना मान सन्मान आणि काही पाहिजे असेल नसेल ते आणून देतो.

म्हणून तर जास्तीत जास्त गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेली लोक बघा, त्यांच्या लहानपणा मध्ये त्यांच्या आयुष्यात कोणीही व्हॅल्यू ऍडिशन केलेलं नसतं ,त्यामुळे त्यांना अख्ख्या समाजावर राग असतो.

आता ही भावना जरी आपल्याला वाटत असेल की साधी आहे, तर ही गोष्ट साधी नाहीये, आपण याचा वापर व्यवसायात फार चांगल्या प्रकारे करू शकतो.

एखादा सर्वसाधारण व्यक्ती आपला ग्राहक बनन्याअगोदर जर ,आपण त्याला बऱ्याच या गोष्टी मदत म्हणून केलेल्या असतील ,तर ती व्यक्ती उद्याच्याला आपला हक्काचा ग्राहक बनतो,

नंतर तो कधीही किमतीवर घासाघीस करणार नाही, तो आपल्याला सोडून आपल्या स्पर्धकांकडे जाणार नाही ,आणि या सगळ्या फायद्याच्या गोष्टी त्याच वेळी होतील ,ज्यावेळी आपण त्याच्यासमोर बिलकुल ही घाई करणार नाही.

आणि आपल्या ग्रुप मधील सर्वांना माझं हेच सांगणं आहे की ,आपण आपल्या फेसबुकवरच्या मेसेजमध्ये किंवा व्हाट्सअप वरच्या मेसेजमध्ये किंवा युट्युब व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त आपण कशाप्रकारे इतरांचे प्रॉब्लेम सोडवू शकतो ? याच्यावर फोकस करा ,,,,

विक्री करायची तर अजिबात घाई करू नका,घाईत घाईत केलीली ऍड आपल्याकडे क्वालिफाईड कस्टमरला पाठवणार नाही, कारण प्रलोभन असणाऱ्या जाहिरातीला भुलून चीप प्रकारचेच ग्राहक येतील ,खरे पैसे देणारे प्रीमियम ग्राहक हे या प्रकारच्या एैडव्हर्टायझिंगला भुलत नाहीत.

ते अगोदर व्हॅल्यू चेक करतात आणि मग नंतरच पैसे देण्याचा विचार करतात.

आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला या प्रकारचा कस्टमर हवाय ?का पैसे देणारा प्रीमियम कॉलिटी चा कस्टमर हवाय?

📌 आता तुम्ही म्हणाल की सर, जर आपण विक्रीची घाई केली नाही, तर आपण स्वतःची व्हॅल्यू मार्केटला कशाप्रकारे दाखवू शकतो?

इतरांनी मागितली नसतानाही मदत देण्याचा प्रयत्न करा,मागितल्यानंतर तर कोणीही मदत करायला पुढे येऊ शकतो, ही एक साधी गोष्ट आहे ,परंतु आपल्याला जर जाणवलं की समोरच्याला गरज आहे तेव्हा मदतीचा हात पुढे करा ,मग ती मदत ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन.

दर वेळी आपण पैशाचीच मदत करावी असं काही आवश्यक नाही, याला आपण वेगवेगळ्या प्रकाराने सुद्धा मदत करू शकतो आणि “लॉ ऑफ रिसिप्रोसिटी” सांगतो की ,आपण केलेली साधी मदत सुद्धा कधीही वाया जात नाही ती अनेक पटीने परत येते.

📌 सरळ सरळ…

“आम्ही अशा प्रकारची विक्री करतो”, असं आपण स्वतः लिहिलं किती सेल्समनशिप झाली, पण समजा आपला कोणी रेफरन्स दिला की,
“याच्याकडे ही वस्तू चांगली मिळते”

,तर विक्री होणे सोपे आणि सुलभ जाते,पण मुद्दा हा कि ,”लोक आपला रेफरन्स का देतील”?

तर त्याची सुरुवात आपण स्वतः इतरांचा रेफरन्स देऊन करावी लागेल, आणि हे आपण करू शकतो.

📌 तिसरा मुद्दा असा की आपण सोशल मीडियावर पोस्टिंग करत असताना दरवेळी विक्रीच करू नये, कधीतरी रिव्ह्यु,सल्ला,सामान्य माहिती देणारी पोस्टिंग केली तर लोक आपल्याला लक्षात ठेवतात आणि ज्यावेळी गरज पडते त्यावेळेस त्यांना ते आठवतं.

तरिही याच्यासाठी फक्त आणि फक्त आपण त्यांच्यासमोर राहणे आवश्यक आहे.

📌 आपण कधीही डायरेक्टली खरेदी करता का?
असं समोरच्याला विचारलं की,शक्यता असते की तो नाकारेल !

पण जर आपण सभ्य आहोत,प्रामाणिक आहोत ,आणि आपण चांगल्या क्वालिटीचा माल देता किंवा आपली सर्व्हिस चांगली आहे, हे जर इनडायरेक्टली सातत्याने दाखवून दिलं ,तर पुढच्या वेळी येताना ग्राहक क्वालिटी किंवा किंमत याचा विचार करणार नाही, त्याला आपल्या बद्दल चा अभ्यास तर अगोदर असतो.

त्यामुळे तो सरळ सरळ आपल्याबरोबर खरेदीचा चर्चा करेल.

📌आपल्या उद्योगनिती ग्रुपचं एक वैशिष्ट्य आहे की,आपण कधीही सेलिंग करत नाही.

कधीही कोणाला विक्रीसाठी फोन जात नाही, पण तरीही आपले जवळपास सगळे सेमिनार आणि कोर्सेस फुल्ल असतात,याचं कारणच हे आहे.

Value in Advance

📌आजपासून मागे लागणं बंद आणि फक्त Awareness करणं चालु करा,बघा फरक पडतोच.

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890/

©निलेश काळे.
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764

Office :
श्री ओमकेश मुंडे सर : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *