चांगली ऑफर कशी तयार करावी?

चांगली ऑफर कशी तयार करावी?

© निलेश काळे.

📌 जेंव्हा ग्राहक एखादया प्रॉडक्ट मध्ये Value बघतो,त्यावेळी किंमत मॅटर करतच नाही, खरेदी सहज सहज होऊन जाते, पण ज्यावेळी ग्राहकाला प्रॉडक्ट मधील व्हॅल्यु नीट नीटकी लक्षात येत नाही त्यावेळी अनेक जण ऑफरचा आधार घेतात, पण ऑफर मध्ये काही गुणधर्म असायलाच पाहिजेत नाही तर ऑफरचा परिणाम दिसत नाही.

📌 (1) Highly Desirable :

Offer ही गोष्ट अशी असावी , ज्याची ग्राहकाकडून मागणी व्हायला हवी , जर आपण अशी ऑफर काढली जी ग्राहकाला नकोचय, तर त्या ऑफरचा काय फायदा होणारंय , म्हणून ऑफर अशी काढावी जी ग्राहक हातोहात उचलतील.

एका हलक्या क्वालिटी च्या खोबरेल तेलाच्या 200 Rs अर्धा लिटर च्या बॉटलवर ,प्लास्टीकची मोठी बकेट फ्री देण्याची ऑफर आणली आणि ग्रामीण भागातील जनतेने ही ऑफर हातोहात उचलली.

अशा प्रकारे ग्राहकाची मागणी असेल अशी ऑफर काढावी.

📌 (2) it should be Easy to understand :

आपण देत असलेली ऑफर इतकी सहज सहज आणि ग्राहकाला समजण्यास सोप्पी असावी .

बरेच व्यावसायिक इतकी कन्फयुजींग ऑफर काढतात,कि ती समजुन घ्यायला अवघड असते ,

phone pay सारखे प्लॅटफॉर्म अनेक वेळा अशा प्रकारचे डिस्काऊंट कुपन ओपन करून देतात,ज्या कंपन्यांची नावं सुद्धा आपण कधी ऐकलेली नसतात,मग ते त्याचा काय उपयोग ?

म्हणून ऑफर इतकी सोप्पी असावी कि,ती सहजपणे कोणालाही समजेल.

📌 (3) it Should be Easy to buy:

काही व्यवसाय इतक्या ठिकाणी फॉर्म भरा,या लिंक ला क्लीक करा,तिकडे जाऊन असं लॉगीन करा ! तिकडे गेल्यावर असं करा,तसं करा अशी भली मोठी प्रोसेस असते.

ग्राहकाला इतकं फिरवू नये ! जी काही ऑफर द्यायची ना ! ती सोप्या पायऱ्यात दया ना ? उगाचच त्याला असं वाटायला नको कि, यार कुठे फसलो मी ?

📌 (4) Offer विश्वास ठेवण्यासारखी आणि प्रामाणिक वाटावी :

आपण अनेक वेळा,फेसबुकला वाचतो ,

“रु 300 मध्ये स्वतःचा बिझनेस चालू करा आणि आयुष्यभर लाखो कमवत रहा !” कुछ भी ??????????

या शब्दातच खोटारडेपणा दिसून येतोय ! मग कसा कोण विश्वास ठेवणार ?

म्हणून ऑफर प्रामाणिक आणि विश्वास ठेवण्यासारखी वाटावी, नाहीतर ऑफर देऊन ना देऊन काहीच उपयोग होणार नाही.

📌 (4)Give them a Reason

आपण ऑफर का देतोय ? याचं उत्तर तुम्हाला देता येतंय का ?

प्रॉडक्ट नवीन आहे ?मार्केट मध्ये खोलवर शिरायचंय ?तुमच्याकडे भरपुर स्टॉक आहे?कच्चया मालाचे रेट कमी झालेत?टॅक्स कमी झालाय?काही तरी पक्कं कारण पाहिजे,नाहीतर ग्राहक विश्वास ठेवणार नाही .

📌(5 ) Low Risk_किंवा No Risk Offer असावी :

ऑनलाईन काम करणाऱ्या ई – कॉमर्स कंपन्यांनी,एक ऑफर दिली आणि त्यांना मोठा ग्राहक वर्ग मिळाला .

ही ऑफर No Risk ऑफर असते ,

30 days/90 days मनी बॅक गॅरंटी,घ्या रिस्कच संपली !

ग्राहकांना माझी फसवणूक होतेय का काय ? याची भिती असते,पण मनीबॅक गॅरंटीची ऑफर दिली कि, त्यांची ती भितीच मरते !

आणि ऑफर तिचं राईट्ट काम करते !
बघा, विषय असा आहे कि, ग्राहकाला खरेदी करताना कसलीच भिती वाटायला नको, तसं असेल तर आपण ती भिती अगोदर दुर करायला हवीये.

📌 (6) Create Urgency

Delay kills the sale असं म्हणलं जातं.

कारण ?एकदा का ग्राहक खरेदीच्या मोमेंटम मधून बाहेर पडला कि, पुन्हा खरेदी करण्याची,त्याची उर्मीच संपते .

म्हणुन काहीतरी योग्य असं कारण दिलं पाहिजे,जेणेकरून ग्राहकाला ते पटलं पाहिजे आणि त्याच्या मनात खरेदी करण्या विषयी घाई झाली पाहिजे.

स्टॉक किंवा सिट्स लिमिटेड आहेत,कच्च्या मालाचा सप्लाय नाहीये , पाऊस पडलाय,लॉक डाऊन चालु होणारय वगैरे वगैरे !

पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या,कि ग्राहकाला वाटतंय कि,सप्लाय मुबलक आहे आणि आपण उगाचच अर्जन्सी तयार करतोय,तर मात्र आपलं हसू होईल आणि ती पॉलिसी काम करणार नाही.

पण लक्षात घ्या, आपण ज्या कारणांचा आधार घेऊन घाई करतोय ते कारण एकतर खरंखुरं पाहिजे किंवा ग्राहकाला त्यातलं काहीच कळत नसायला हवंय

!

************************
अशा प्रकारे,ग्राहकांना हवी तशी,समजायला सोप्पी,खरेदी करायला सोप्पी,खरंखुरं कारण असणारी,रिस्क नसणारी,आणि अर्जन्सी असणारी ऑफर काढावी!

ती नक्की काम करेन,यातला एक जरी गुण नसेल तर ऑफर कच्ची राहून जाईल आणि ग्राहकाला पचणार नाही!

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890/

©निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764.

Udyogniti कडून तुमच्या बिझनेससाठी कोचिंग घ्यायचीये? किंवा उद्योगनितीच्या व्हाट्सअपग्रुपमध्ये सामील व्हायचंय.
संपर्क करा :श्री ओमकेश मुंडे सर:9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *