चांगली ऑफर खराब होणे, याला Dilution Effect म्हणतात. काय असतो तो ? वाचा !

आपण काढलेली ऑफर खराब करणे म्हणतात याला.

“The Dilution Effect”

सध्या लोकांची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेकांना आपले उत्पादन विकण्यासाठी त्रास होतोय, मग अशा वेळेला अनेकजण त्या मूळ उत्पादनावर दुसरी छोटी छोटी उत्पादना फ्री मध्ये देऊन विक्री वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत,

तसं बघायला गेलं, तर ऑफर करणे म्हणजे गिफ्ट करणे,आणि गिफ्ट करून धंदा होत नसतोय, तर पुर्ण वॅल्यु वसुल करूणच धंदा होत असतो , पण तरिही ऑफर काढलीच तर तिला कसं मेंटेन ठेवावं, याचा परिणाम काय होईल? ते या इफेक्ट मधून समजावून घ्या.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये वर्तणूक शास्त्र याला Behavioural Sciences म्हणतात, त्याच्या प्रोफेसरांनी केलेला हा प्रयोग आहे, मानसशास्त्र आणि विक्रीशास्त्र याचा अतिशय जवळचा संबंध असल्यामुळे, असे प्रयोग केले जातात, आणि याच्या निष्कर्षावरूनच व्यवसायासंबंधी आखाडे प्लान होतात .

तर प्रयोग असा होता,
ऑक्सफोर्ड विद्यापिठातील प्रोफेसरांनी ,एका विद्यार्थी गटाला हा प्रश्न विचारला, कि”समजा तुमच्या समोर एक डिनर सेट आहे, ज्यामध्ये 8 छोट्या प्लेट,8 मोठ्या प्लेट आणि8 बाउल्स आहेत. असे 24 पीसचा हा सेट आहे.

तर त्याची किंमत तुमच्या मते काय असेल?विद्यार्थ्यांचे उत्तर आलं : “साधारण 200 डॉलर्स”!

आता, या प्रोफेसरांनी विद्यार्थ्यांना दुसरा एक सेट दाखवला त्यांनी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की या सेटमध्ये सेम कॉलिटी च्या 8 छोट्या प्लेट, 8 मोठ्या प्लेट,8 बाउल्स आहेत.
अजून या सेटमध्ये 8 कप आहेत त्यापैकी 2 फुटलेले आहेत आणि 8 चमचे आहेत त्यापैकी 7 तुटलेले आहेत.
तर या दुसऱ्या 4O पीसच्या सेटची किंमत काय असेल? तर विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं 50 डॉलर्

आता तुम्हाला वाटेल की,24 पीस असणाऱ्या डिनर सेटची किंमत 200 डॉलर्स आणि 40 पीसचा सेट ,ज्यामध्ये काही वस्तू तुटलेल्या आहेत त्याची किंमत 50 डॉलर्स कशी?

तर या परिणामालाच डायल्यूशन इफेक्ट असं म्हणलं जातं,

****************************
📌 याठिकाणी विक्रेत्याने 24 पीसचा मेन सेट व्यवस्थित व्हॅल्यू देऊन विकला असता,तर त्याची किंमत व्हॅल्यूवरच केली गेली असती,परंतु विक्रेत्याने त्या मेन वस्तूची व्हॅल्यू अजून थोडी वाढावी,याच्या करिता त्यामध्ये विनाकारण काही ॲड-ऑन दिलेले आहेत ज्या ॲड-ऑन ची किंमत ग्राहकाच्या नजरेमध्ये शून्य आहे.
बऱ्याचदा आपण अशा गोष्टी फ्री देतो ज्यामुळे मुख्य वस्तूची किंमत ग्राहकाच्या नजरेमध्ये एकदम कमी होऊन जाते आणि त्यानंतर पुन्हा ग्राहक मूळ किमतीला,ती मुख्य वस्तू घेत नाही.

त्याला असं वाटायला लागतं की या फ्री वस्तू आपण याच्या बरोबर देऊ शकतो तर मूळ वस्तूची किंमत नक्कीच खूप कमी असली पाहिजे.

म्हणून करिता सेल हा पाँईटेड असायला हवा.

**************************
याबाबत घडलेलं एक उदाहरण सांगतो, आपण चिक्की प्रशिक्षणाला तीन हजार रुपये घेतो,यामध्ये राजगिरा लाडू शिकायचा असेल, तर त्याची किंमत 3000 वेगळी असते आणि शेंगदाणा लाडू शिकायचा असेल,तर तीन हजार वेगळी .
एकदा एका ग्राहकाने असं विचारणा केली की,ण ” सर तुम्ही हे तीनही प्रॉडक्ट मला पाच हजार रुपयात शिकवाल का?”
आता समजा दोन हजार जास्तीचे मिळत आहेत, म्हणून मी तीनही प्रॉडक्ट त्याला पाच हजार रुपयात शिकवायला तयार झालो,तर मूळची की प्रशिक्षणाची किंमत किती होते?

5000/3 = 1666 रु.

म्हणजे या प्रकरणांमध्ये मी माझ्या मूळ किमतीची डीव्हॅल्युएशन केलेली आहे

जे आपण कधीही करत नाही.

**************************
अशाप्रकारे ग्राहकाला आपण जर त्याने न मागितलेली गोष्ट किंवा त्याच्या नजरेमध्ये कमी महत्त्व असलेली गोष्ट विनाकारण फ्री द्यायला लागलो,तर मूळ उत्पादनाची देखील व्हॅल्यू एकदम कमी होऊन जाते आणि ग्राहकाने जर परत फक्त मूळ उत्पादन मागितलं,तर मात्र आपल्याला नुकसान होऊ शकतं.

***************************
एक अजून उदाहरणावरून ही गोष्ट लक्षात घ्या समजा घट्ट म्हशीचे दूध ते ऐंशी रुपये लिटर आहे.

त्या घट्ट एक लिटर दुधामध्ये आपण जर एक लिटर पाणी टाकलं, तर ते दूध ऐंशी रुपये लिटरने विकल्या जाईल का?

सहाजिकच नाही,या पातळ केलेल्या म्हणजे (Dilute केलेल्या ) दुधाची किंमत 40 रुपये सुद्धा होणार नाही.

यालाच Dilution Effect म्हणतात.
***************************
अनेक वेळा दुकानदार अशा काही गोष्टी फ्रि देऊ करतात ,ज्याची ग्राहकाच्या नजरेमध्ये काहीही किंमत नसते.

म्हणून तर एकावर एक फ्री, एकावर दोन फ्री,एकावर 3 फ्री असल्या ऑफरला, ग्राहक आज कालचा ग्राहक भुलत नाही.

आपल्याकडचा पडीक स्टॉक विकण्या करता दुकानदार हा फार्मुला वापरतात परंतु त्यामुळे त्यांना कचऱ्याच्या भावांमध्ये सुद्धा पैसे मिळत नाहीत.

**************************

तेव्हा लॉकडाऊन आहे, विक्री कमी होतेय म्हणून ऑफर काढण्याअगोदर हा Dilution Effect लक्षात घ्या, आणि त्यानंतरच ऑफर काढा.

© निलेश काळे
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंट्स
आनंद पार्क, औध,पुणे.
9518950764
Office : 9146101663

Previous Post Next Post

2 thoughts on “चांगली ऑफर खराब होणे, याला Dilution Effect म्हणतात. काय असतो तो ? वाचा !

 1. सर माझ्या कडे इन्व्हर्टर बल्ब agency आहे मी प्रति नग 299 ला विक्री करतो पण wholsale मध्ये द्यायचे असतील तर price कमी करावेच लागेल ना याला dillution effect म्हणता का

  1. तुम्ही 299 का लावता ? ती चार्म प्राइसिंग आहे .
   एक तर 300 करा किंवा 280,

   डायल्युशन इफेक्ट तेंव्हा होईल, जेंव्हा तो बल्ब विकण्यासाठी एखादा तुटका बल्ब फ्री दयाल .

   जेंव्हा एखादी गोष्ट फ्री देऊन पण कस्टमरला त्याची काही किंमत नसते तेंव्हा त्याला डायल्युशन म्हणतात .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *