चार्ली मंगर (वॉरेन बफेट यांचे पार्टनर) यांनी सांगितलेले Businessचे 5 पार्ट लक्षात ठेवा !

चार्ली मंगर( वॉरेन बफेट यांचे पार्टनर) यांनी सांगितलेले, बिझनेसचे 5 पार्टस लक्षात ठेवा!

आजचा हा सुरुवातीचा लेख जोश कॉफमनच्या “द पर्सनल MBA” या पुस्तकातील कन्सेप्ट वर आधारीत आहे .”
या माणसाचं MBA झालेलं नव्हतं पण मग P&G सारख्या मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्यावर काम करताना त्याला अडचणी येऊ लागल्या,अशावेळी त्यानं मार्केटमधीव त्या लोकाचा अभ्यास केला,कि …जे विना फॉर्मल एज्युकेशन मस्त व्यवसाय करत होते.

त्यात सर्वात पहिलं नाव “चार्ल्स मंगर”

याचं नाव आपल्याला फारसं माहित नाही पण हा व्यक्ती वॉरन बफेट चा बिझनेस पार्टनर आहे ज्याने 400 Billion Dollars ची कंपनी उभी केली.

यांचे विषयी अधिकची माहिती युट्युब ला मिळू शकते.

वॉरेन बफेट स्वतः सांगतात कि चार्ल्स मंगर सारखी संधी शोधणारा माणूस शोधून सापडणार नाही .

अशा लोकांचा अभ्यास जॉश कॉफमन ने या पुस्तकातून मांडलाय .

ते म्हणतात बिझनेस हा 5 Part frame work ने बनलेला असतो .
आणि हे पाच पार्ट जर व्यवस्थित नसतील तर बिझनेसच नाही

1) Value creation
2) Marketing
3) Sales
4) Value Delivery
5) finance .

*****************************

(1) VALUE CREATiON :

ज्या उदयोगातून आपण समाजासाठी काहीही वॅल्यू तयार करवून देऊ शकत नाही , त्या उद्योग नाही छंद म्हणतात .

म्हणून आपण एखादं उत्पादन तयार करतानाच किंवा विक्रीला आणताच असं आणलं पाहिजे ज्यासाठी लोक पैसा देतील .

आज एकाचा फोन होता ? कि सर त्या टायर पंक्चर न होऊ देणाऱ्या जेल ची एजन्सी घेऊ का ?

साधी गोष्ट आहे,ज्या काळात ट्युब लेस टायरची चलती आहे तिथे याचं हे असलं सोल्युशन कोण घेईल ?

त्याला ज्यावेळी समजून उलगडून सांगितलं तेंव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडला .

असो,तर कधीही प्रॉडक्ट असा असायला हवा ज्याची लोकांनी value करावी .
लोक दोन प्रकाराच्या बिझनेस साठी पैसे मोजतात .

1) Conveynience.
2) High- fidality.

याचा अर्थ काय? तर ,लोकांना अँवरेज देणारी स्प्लेंडर पण पाहिजे आणि शान दाखवत फिरता येईल अशी बुलेट पण पाहिजे .

अशा दोन्ही प्रकारे जर आपण value तयार करू शकलो तर प्रॉडक्ट यशस्वी होतो.

(2) Marketing :

या बद्दल आपण अनेक स्ट्रॅटर्जी येत्या दिवसात बघूया पण , असं म्हटलं जातं किं बिना marketing , अनेक उच्च दर्जाचे प्रॉडक्ट , हे चाऱ भिंतीच्या आड सडत आहेत , रडत आहेत .
का ? तर जगाला त्याची भनकच नाही कि, त्या चार भिंतीच्या आड खरच काहीतरी जगाला बदलू शकणारं बनतय .

ज्यावेळी CD मार्केटला आल्या त्या वेळी त्याची मार्केटींग अशी केली गेली कि , त्यात 100 कॅसेट इतुके गाणे बसतील , प्रॉडक्ट हीट झाला ,
आणि मेमरी कार्ड ज्यावेळी मार्केटला आले त्यावेळी असं सांगितलं गेलं कि , दिवसाचे चोवीस तास संपतील पण यातील गाणे संपणार नाहीत ,
प्रॉडक्ट हीट झाला .
तर लक्षात घ्या हा प्रकार बिझनेस चा प्राण आहे याशिवाय बिझनेस होऊच शकत नाही .
यावर आपण खूप बोलणार आहोत .

(3) Sales :

हा कोणत्याही बिझनेस चा core. element असतो ,
जो बिझनेस दणकट विक्री मिळवत नाही तो नॉन प्रॉफीट असा समजावा , कारण विक्रीच नाही तर , प्रॉफीट येईल कोठून ? आणि बिना प्रॉफीट बिझनेस करून काय खडे खायचे का आपण ?

म्हणून सर्वात प्रथम ,,, विक्री घडण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत ते म्हणजे ग्राहकाला आपल्यावर Trust पाहिजे आणि उत्पादनाबददल खात्री पाहिजे कारण त्याशिवाय ग्राहक त्यांनी घाम गाळून कमावलेला पैसा देणारच नाही .

आता या दोन्ही गोष्टी कशा मिळवायच्या ते आपण येत्या दिवसात पाहू या .

(4) Value Delivery :

जो व्यवसाय त्याने वचन दिलेली value देत नाही तो scam असतो , त्याला आपण बिझनेस म्हणतच नाही , कोणत्याही व्यवसायाची ही चौथी अतिशय महत्वाची बाजू असते .

Nilesh Kale ने समजा प्रॉमीस केलंय कि ,तो valuable content देईल आणि त्याने थातूर मातूर पोस्ट टाकल्या तर त्याचं दुकान तर बंद होऊन जाईल ना ?
शेवटी एक रुपया असो कि सहाशे कोणी ते का मोजावे
म्हणून लक्षात घ्या कोणत्याही बिझनेसने वचन दिलेली value द्यावी म्हणजे द्यावीच ! अन्यथा बिझनेस मॉडल फेल होऊन जाईल .

(5) Finance :

बऱ्याच लोकांना या विषयी बोललेलं पण आवडत नाही , पण लक्षात घ्या जो बिजनेस खर्चा पेक्षा जास्त प्रॉफी ट आणत नाही , त्याला दुर्देवाने बंद करावं लागतं हे सत्य आहे .

कारण शेवटी आकडे जुळले नाहीत तर
आपली वाढ होणार नाही .

या वरच्या पाच पॉईंट मधेच सगळा बिझनेस सामावला आहे .

त्यातील प्रत्येक पॉईंट ची सखोल चर्चा आपण येत्या दिवसात करणारच आहोत .

तेंव्हा आज एकच अभ्यासा कि , आपण वरील कोणत्या पौईट मध्ये सुधारणा घडवून आणू शकतो ?

जॉश कॉफमन चे हे पुस्तक मार्केट मधील व्यवसायासंबंधी बेस्ट सेलर आहे .

विकत घ्या,वाचा आणि वापर करा .

नक्की पुढची पायरी गाठता येईल.

© निलेश काळे.
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स
आनंद पार्क, औंध,पुणे.
9518950764

ऑफिस ; ओमकेश मुंडे सर : 9146101663.

Previous Post Next Post

4 thoughts on “चार्ली मंगर (वॉरेन बफेट यांचे पार्टनर) यांनी सांगितलेले Businessचे 5 पार्ट लक्षात ठेवा !

  1. तुमच्यासारखे लहान उद्योजकांना तुमच्या पोस्ट म्हणजे संजीवनी असतात

  2. Dear Kale Sir,
    First Heartily Salute to you and your Deep Study, Feel very Proud after read this Post thanks a lot for providing and share this valuable information.

    Thanks Regards,
    Rohit S 8999445384

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *