“चॅम्पीयन उद्योजक” बनायचंय का ? तर मग खेळाडूंचे 10 गुण नक्की वापरा.

#Business_Coaching:

#Sportsman_spirit_in_Business:

📌 बहुतेक टॉप प्लेअर हे अतिशय यशस्वी बिझनेसमन झालेत , त्यांचा हा मेकशिफ्ट पॅटर्न खूप काही सांगून जातो ! या दोन वेगवेगळ्या करीयर मध्ये वरून भिन्नता दिसत असली तरी , दोन्ही मध्ये अनेक कॉमन पॉईंट आहेत , खेळातून अनेक बाबी आपण शिकू शकतो ज्या रोजच्या व्यवसायात आपल्या कामी येतील.

(1) #Prepare to_work_Hard_from_Every_other_person:

📌 खेळाडूंना हे माहिती असतं कि , फक्त टॅलेंटच्या भरवशावर गेममध्ये जिंकता येत नाही , त्यासाठी कठीण मेहनतच करावी लागते , constant practise हा त्यातला मेन फंडा आहे , म्हणून तर मायकल फ्लेप्स सारखा ऑल्मपीक चॅम्पियन रोजचे 10 तास स्विमिंग पुल मध्ये घालवतो ते पण गेल्या 14 वर्षापासून !

” Hard work will always overcome talent , when talent will not work hard ” असं म्हणलं जातं ते यासाठीच !

त्यामुळे रात्रंदिवस कष्ट करायची नेहमी तयारी ठेवा .

(2) #Have_Daily_Routine_stick_to_it

📌 कोणताही चांगला प्लेअर बघा , त्यांचे डेली रुटीन ठरलेले असते , त्यांना उन्हाळा , पावसाळा काही काही थांबवू शकत नाही !

📌 व्यावसायिकाला सुद्धा असंच करावं लागतं , दुकान कधी उघडलं कधी नाही ! असलं चालेल का ?

📌 चांगल्या व्यावसायिकाचं बघा ! ते त्या वेळेला उघडे असतात आणि वेळेवर बंद ! हेच मोठं गमक आहे !

📌 रूटीन ठरवून घ्या ! आणि त्याच्यावर कायम रहा ! बघा फरक पडतोच !

(3) #Learn_from_your_Losses:

📌 खेळात कोणीच नेहमी जिंकू शकत नाही , कधी जीत कधी हार हे ठरलेलं असतंय !

📌 पण हारणाऱ्या टिम रडत बसतात का ? नाही , IPL मध्ये सुद्धा प्रत्येक टिमच्या अपयशानंतर ते ती हार का झाली ? याची व्हिडीओ रेकॉर्डिंग बघत बसतात ! कारणं शोधली जातात , प्रत्येक ऍक्शनचा रिप्ले बघीतला जातो आणि प्लेअर त्यातून शिकतात ! आपली प्रत्येक फेल झालेली डील किंवा रिजेक्ट झालेला सेल्स कॉल आपल्याला खूप काही शिकवू शकतो , इथे फक्त आपल्याला ठरवायचं आहे कि , चुकातुन शिकायचय ? का चीडचीड करून आपली आग करून घ्यायचीये !कारण चुक होण्यात लाज वाटून घेण्यासारखं काहीच नसतंय उलट आपण जर त्या चुकीला Analyse केलं नाही तर उद्या मोठी न परवडणारी चुक होऊ शकते !

(4) #Play_to_your_strengths

📌 असे फार कमी प्लेअर आपण बघतो जे वर्ल्ड क्लास हे पण खेळतात आणि ते पण …. कारण ??????

कारण ते त्या खेळात स्वतःची जान लावून टाकतात ! किंवा टिम मध्ये खेळत असतील तर बॅट्समन असतील तर पूर्ण क्षमतेने बॅटींग करतील जी गोष्ट जसं समजा बॉलींग येत नाही तर त्याच्या नादी लागत नाहीत !

📌 व्यवसायात सुद्धा आपण कोणतीच गोष्ट अशी तशी करून दुसरं काहीतरी करायला घेतलं तर ना हे भेटतं ना ते ! त्यामुळे जे करायचं ते पूर्ण जिवाच्या आकांतानं केलं पाहिजे तेव्हा आपल्याला स्वतःला प्रश्न विचारायचा अधिकार राहतो , जी गोष्ट आपल्याला येते त्यात खेळा जे येत नाही ते काम इतरांवर सोडा जसं प्लेअर करतात .

(5) #Sacrifice_to_Earn_Rewards

दिवाळी असो , दसरा असो कि अजून काही , चांगले प्लेअर हे सगळं बाजूला ठेऊन आपली ट्रेनिंग करतात , दंगल मधे बघीतलं फोगाट सिस्टर्सची भेळ पाणीपुरी बंद होते , कारण प्लेअर अशा गोष्टींचा त्याग करतात ,

📌 सेम कंडीशन आपली असते . अजून चांगली कार घेण्याऐवजी एखादी मशीन एकस्ट्रा घेतली जाते , सण वार असले तरी दुकान उघडून बसावे लागतं ! कुटूंबा बरोबर वेळ घiलवता येत नाही ! अशा बलिदानातूनच एका प्रखर उद्योजकाची जडणघडण होत असते !

(6) #Listen_to_your_Coach

📌 कोणताही वैयक्तीक खेळाडू घ्या किंवा टीम … त्यांच्या यशापाठीमागे एक कोच नक्की असतो , तो खेळाडू किंवा टीम त्या कोचच्या सल्ल्यानुसार ऐकते आणि खेळते

📌 याचं कारणच हे आहे कि तो व्यक्ती या गेममध्ये खूप दिवसापासून असतो , आणि त्या खेळाडूचे स्ट्राँग आणि विक पॉईंट्स तो व्यवस्थीत सांगू शकतो ,

सेम वे ,, व्यवसायात सुद्धा जे व्यवसाय एखादया कोचच्या सल्ल्यानुसार मार्गक्रमण करतात ते नक्की भरभराटीला येतात !

(7) #Dont_playas_a_group make a team:

📌 क्रिकेट सारख्या खेळात अकरा खेळाडू कुठेही उभे राहून खेळतात का ? तर नाही या ग्रुपमधल्या प्रत्येक खेळाडूला एक दुसऱ्याची जिम्मेदारी माहित असते म्हणून ते एकमेकांना सपोर्ट करत खेळतात ,

📌 व्यवसायात पण नुसते कामगाराची भरती करून काही होणार नाही , परफेक्ट टीम बनवावी लागते तरच हा गेम जिंकता येतो !

(8) #Pay_attention_to_smaller_details

📌 टॉप प्लेअर आपल्या सर्व बाबींच्या डिटेल नोंदी ठेवतात , आठवडयात किती किलोमीटर रनींग केली ? आज किती किलो कॅलरीज चा डाएट घेतला? किती वर्कआऊट केलं ? प्रॅक्टीस सेशन किती मिनिटाचा केला ? ब्रिथींग वगैरे सगळ्याच गोष्टीच्या नोंदी ते ठेवतात त्या अनाला ईज करतात .

सेम वे

📌 आपण पण प्रत्येक छोटया छोटया गोष्टींकडे बारीक लक्ष ठेवले पाहिजे , स्पर्धकाच्या प्रत्येक चालीकडे लक्ष दिले पाहिजे ! आपले प्रोडक्ट डेवलपमेंट , स्टॉक्स वगैरे सगळीकडे लक्ष पाहिजे .

याचा अर्थ पूर्ण डिटेलिंग झालच पाहिजे तरच आपल्याला पाहिजे तो रिजल्ट मिळेल.

(9) #Listen_to_inner_Voice:

📌 आपण बघत आलोय कि , सचिन सारख्या प्लेअरच्या आयुष्यात सुद्धा अनेक वेळा अपयश आली , पण प्लेअरची जडणघडण च अशी असते कि , ते आपल्या आतल्या आवाजाचं जास्त ऐकतात आणि Nike च्या स्लोगन सारखं Just do it म्हणून पुढच्या स्पर्धेकरिता जोमाने तयारीला लागतात,ही गोष्ट स्पोर्टमन स्पिरीट म्हणलं जातं,
सेम वे

आपलं आयुष्य काय वेगळं आहे , इथे रोज रोज अपमान , पराजय झेलावे लागतात हा सेट बॅक मनाला लावून बसलात तर झालं !

चांगले व्यवसायी अशा सेटबॅकला चल फूट म्हणून पुढे चालतात .

म्हणून तर … व्यापारी आणि खेळाडू . सगळ्यात कमी आत्महत्या केलेल्या दिसतात .

(10) #study_the_competition_well

📌 कोणत्याही स्पर्धेपूर्वी खेळाडू आपल्या स्पर्धकाचे व्हिडिओ वारंवार बघतात , कोच लोकांची ही स्ट्रॅटर्जी फार कामाची आहे , म्हणुन तर चांगल्या खेळाडूला आपल्या प्रतिस्पर्धायाचे स्ट्राँग पॉईंट्स आणि विक पॉईंट स माहीत असतात , ते त्याची माहिती घेतात आणि त्यानुसारच ट्रेनिंग करतात .

सेम वे

📌 आपल्याला आपला स्पर्धक कोठून खरेदी करतोय ? काय रेट ने खरेदी करतोय ? कशी विक्री करतोय ? याची इत्यंभूत माहिती पाहिजे , आपल्याला स्वतः बद्दल कमी माहिती असली तर एक वेळ चालतय पण स्पर्धकाची पूर्ण कुंडली जवळ ठेवा !

(11) #Find_the_Gap_and_hit the ball

📌 क्रिकेटच्या गेममध्ये जसं प्रत्येक बोलवर six मारता येत नाही , वाट बघीतली जाते आण विक बॉल आला किंवा गैप मिळाला कि ती संधी न सोडता तीचं सोनं केलं जातं,

तसे

📌 कोण म्हणलं स्पर्धकाच्या चुकीमुळे आपल्याला संधी मिळत नाही ? आपण अलर्ट असलं पाहिजे , गॅप मिळाला कि सिक्स म्हणजे सिक्स मारलाच पाहिजे !

आणि खिलाडूवृत्ती ठेवली कि ते होतं पण .

(12) #Perform_under_Pressure :

📌 खेळाडूंची ही गोष्ट फार भारी असते ते प्रेशर खाली सुद्धा खूप चांगले परफॉर्म करू शकतात , किंवा असं म्हणा कि त्यांच्या ट्रेनिंगमुळे ते त्यांना सहज शक्य होतं .

📌आपल्याला व्यवसायात काय कमी प्रेशर असतंय का ?पण जो व्यापारी प्रेशरमध्ये चांगलं परफॉर्म करायला शिकला ,तो मार्केटला टिकला असंच म्हणावं लागतंय !

(13) #Celebrate_Wins

📌 ज्यावेळी कोणतीही टिम जिंकते , त्यावेळी Group Hug म्हणजे एकत्र येऊन मिठी मारणे हे सामान्य दृश्य असतं , ते सगळे मिळून ट्रॉफी उंचावतात आणि जल्लोष करतात

सेम वे

📌 ज्यावेळी तुमची टीम एखादी मोठी कामगिरी बजावेल त्या वेळी त्यांना नक्की पार्टी दया,एकत्र सेलिब्रेट करा ! यामुळे बॉन्डींग वाढते ! पुढचे विजय सोप्पे होतात .

📘 या काही सामान्य बाबी होत्या ज्या प्लेअर्स कडून आपण शिकू शकतो,तेंव्हा एक साधी सिंपल टीप :

रोज एखादा मैदानी खेऴ खेळायला चालू करा ,टेनिस,बॅटमिंटन,क्रिकेट, काहीही,हे न जमल्यास किमान रोज अर्धा तास जॉगिंग तरी उद्याच चालू करा ! बघा खूपच पॉजिटीव बदल चालू होतील.

शुभेच्छा
© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स,
5th Floor,विघ्नहर चेंबर्स,
अभिनव चौक,नळस्टॉप पुणे.
9518950764
Office : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *