जगातला कुठलाही गॉगल ब्रान्ड घ्या, तो याच कंपनीशी जोडलेला असेल .

1,332 Views

#monoply_case_study
#Luxottica :

मार्केटमध्ये आपल्याला व्यवसाय करायचा म्हटल्यावर,स्पर्धा आलीच,स्पर्धा आली की रेट तोडावे लागतात,आणि रेट तोडले कि नफा कमी होतो.

आज आपण ज्या कंपनीबद्दल बघणार आहोत,ती कंपनी कधीच डिस्काऊंट देत नाही, रेट कमी करत नाही, आणि तरिही मोठ्या प्रमाणावर विक्री करते.

नाव आहे : Lexottica
975 करोड (2020),
7200 स्टोअर्स,
120 देशात व्यवसाय,
जवळपास 50 ब्रॅण्डस,
तरीही प्रसिद्धीपासून दूर.

एखादी कंपनी मार्केटला किती कंट्रोल करू शकते? याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही कंपनी.

याचं कारण आहे की आज जगात जेवढे सनग्लासेस किंवा ब्रान्डेड गॉगल विकले जातात, (चायनीज नाही ) त्याच्या 80 % गॉगल या कंपनीत तयार होतात.

म्हणजे?जगातला प्रत्येक दुसरा ब्रांडेड गॉगल खरेदी करणारा व्यक्ती हा या कंपनीचा ग्राहक आहे.

या प्रकाराला मोनोपॉली तयार करणं, असं म्हणतात,

असं असलं तरिही,ही प्रतिष्ठा काही एका दिवसात तयार झालेली नाही किंवा सोप्यारीतीने तयार झाली नाही, तर समजून घेऊया या कंपनीच्या इतिहासाबद्दल.

या कंपनीची सुरुवात 1961 मध्ये इटलीच्या Agordo या भागांमध्ये झाली, संस्थापक???. 25 वर्षाचा एक तरुण… त्याचं नाव Leonardo del vecchio.

याला वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये अप्रेंटिस करायची संधी मिळाली, तिथे मोल्ड कसा बनवायचा असतात? ग्लास कटिंग कसं करायचं असतं? याचा बेसिक नॉलेज यांनी घेतलं.

त्यांनी वेगवेगळ्या कंपनीमध्ये अपरेंटिस करायचं काम केलं आणि 1961 च्या दरम्यान त्यांनी स्वतः एक वर्कशॉप उघडायचे ठरवलं.

इटलीच्या या भागांमध्ये त्याला कुशल कामगार उपलब्ध होते, स्वतःची वर्कशॉप उघडण्यासाठी जागा मिळाली, थोडंसं फंडिंग मिळालं, आणि त्यांनी वर्कशॉप सुरू केलं,इतर ऑप्टिकल मधल्या कंपन्यांचं छोटे-मोठे पार्ट बनवून देण्यासाठी.

यांच्यामध्ये कला होती ,यांच्यामध्ये काम करून आणि झोकून देऊन काम करण्याची तयारी होती,त्यामुळे यांच्या हाताखालच्या 1O कर्मचाऱ्यांनी बनवलेले पार्ट हे हळूहळू प्रसिद्ध व्हायला लागले आणि यांचं ऑप्टिकल इंडस्ट्री मध्ये नाव व्हायला सुरुवात झाली.

एखाद्या क्षेत्रामध्ये काम करताना जर आपण तहान-भूक विसरून काम करू शकत असू, तर ती गोष्ट आपले पॅशन बनते आणि Leonard del vacchio यांची ही पॅशट होती.

त्यांनी आता असं ठरवलं की इतरांसाठी फक्त पार्ट बनवण्याच्या ऐवजी आपण संपूर्ण फ्रेम्स तयार करूयात आणि यांनी इतरांना विकूया.

ऑप्टीटिकल शोरूम साठी फ्रेम्स बनवायला सुरुवात केली,अशी छोटीशी का होईना एक सुरुवात जी योग्य दिशेने असते ,ती कोणत्याही इंडस्ट्रीसाठी महत्त्वाचं ठरू शकते.

त्यातच 1971 इटलीच्या मिलान शहरामध्ये एक जागतिक स्तरावरचा प्रदर्शन भरलं आणि या प्रदर्शनामध्ये Leonard del vacchio यांनी भाग घेतला,बरेचदा असं होतं की आपण लोकल मार्केट मध्ये काम करत असताना लोकल ग्राहकांसमोर असतो, परंतु ज्या वेळेला आपण अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने ग्राहकांसमोर जातो,त्यावेळेला आपल्यासाठी नवीन क्षितिजे उघडत असतात.

आणि यांच्याबद्दल झालं असंच, जागतिक स्तरावरच्या ऑप्टिकल कंपन्यांना यांच्या बद्दल माहिती मिळाली, यांच्या ग्लासेसची क्वालिटी / जीव ओतून तयार केलेले डिझाइन्स,यांच्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर ऑर्डर्स मिळाल्या आणि इथे त्यांनी काही कॉन्टॅक्ट साईन केले.

मित्रांसाठी क्लासेस फ्रेम तयार करुन देत असताना यांना 1988 शादी इटलीतील प्रसिद्ध अशा Georgio Armani या कंपनीसाठी काम करण्याकरता कॉन्टॅक्ट मिळाला,

आपण मार्केटमध्ये Armani या ब्रँड बद्दल चौकशी केली तर तुमच्या लक्षात येऊन जाईल,हा ब्रांड फॅशन इंडस्ट्री मधला सगळ्यात मोठा ब्रँड आहे. अशाप्रकारे आपण सुद्धा जर योग्य व्यक्तीच्या आजूबाजूला राहिलो ,तर आपल्या मध्ये देखील खूप काही बदल होऊ शकतात.

📌 आता एक लक्षात घ्या ही कंपनी इटलीमध्ये होती ,इटली मधल्या वेगवेगळ्या ऑप्टिकल इंडस्ट्रीसाठी ग्लासेस आणि फ्रेम्स तयार करत असताना यांनी मोठे होण्याचा विचार केला,

मोठे होण्यासाठी नेहमी इतर भागामध्ये जावं लागतं,आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये प्रगती करू शकतच नाही,

मग या कंपनीने अमेरिकेत पाऊल ठेवला न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज मध्ये यांच्या कंपनीची लिस्ट इन झाली आणि इथून पुढे सुरुवात झाला एक असा प्रवास या प्रवासाने या कंपनीला जगाच्या लेवलला आणून ठेवलं

Acquisition :

ही एक संकल्पना आहे ज्यामध्ये आपण इतरांनी कोणीतरी मोठा केलेला ब्रांड हा संपूर्ण हक्कांसहित विकत घेतो आणि ही गोष्ट Luxottica साठी सगळ्यात मोठी बिझनेस स्ट्रॅटर्जी आहे 1990 या वर्षात यांनी Vogue हाआय केअर ब्रांड विकत घेतला.

आणि इथून पुढे सुरुवात झाली लोकांच्या ब्रांड ला विकत घेण्याची आणि इतर चांगल्या ब्रँडसाठी काम करण्याची.

Brooke brother (1992)
Bulgari (1997)
Chanel (1999)
अशाप्रकारे यांनी इतर ब्रांड बरोबर काम करायला सुरुवात केली 1999 या कंपनीने अमेरिका मध्ये प्रवेश केला आणि या प्रवासाबरोबर त्यांनी अमेरिकेतला एक अतिशय प्रसिद्ध असा ब्रँड त्याची व्हॅल्यू कमी कमी होत गेली होती ,असा ब्रँड ज्याला आपण Ray-ban या नावाने ओळखतो तो पूर्णपणे विकत घेतला.

ज्या वेळेला आपण आपल्या स्वतःच्या इंडस्ट्रीमध्ये जास्त लक्ष केंद्रित करतो त्या वेळेला आपल्याला आपल्या व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये उपलब्ध असणाऱ्या संधी मोठ्या स्पष्टपणे दिसायला लागतात, आणि जो व्यावसायिक आपल्या व्यवसाय आपल्या संधी व्यवस्थित बघू शकतो, तो त्यांचा लाभ घेऊ शकतो.

Luxottica च्या बाबतीमध्ये हेच सगळ्यात मोठा सूत्र आहे.

📌Vertical integration :

ज्यावेळेला आपण आपल्या व्यवसायाच्या क्षेत्रांमध्ये डिजाइनिंग > उत्पादन आणि शेवटच्या ग्राहकापर्यंत विक्री .

अशा सगळ्या गोष्टी एकाच छताखाली कंट्रोल करतो ,त्या प्रकाराला व्यवसायाच्या क्षेत्रात Vertical integration असं म्हणतात.

Luxotticaने हेच साध्य केलेला आहे.

त्यांनी 1995 साली अमेरिकेतली सर्वात मोठी ऑप्टिकल रिटेलरची चैन Lenscrafter विकत घेतली,Target आणि siers ही ऑप्टिकल दुकानांची चैन घेतली.

या कंपनीचं एक तत्व आहे कि, अप्रतिम प्रॉडक्ट तयार करा आणि भरपूर मार्जिनवर विका, यांचा टारगेट कस्टमर बेसच मुळात श्रीमंत असल्याने, पैशाची चिंताच राहीली नाही.

इसवी सन 2000 यापुढे तरी या कंपनीने इतर ब्रँडला विकत घेण्याचा जणू सपाटाच लावला.

यांनी 2005 यांनी या अजून एक मोठ्या स्पोर्ट आय वेअर बनवणाऱ्या कंपनीला विकतात त्यानंतर पर्ल विजन आणिsears optical ही चैन विकत घेतली .

📌 2007 मध्ये Sunglasses Hut ही चैन विकत घेतली.

इटली मधून सुरुवात झालेली कंपनी, उत्तर अमेरिका ,युरोप,ऑस्ट्रेलिया, आशिया या खंडांमध्ये विस्तारायला सुरुवात झाली आणि 2019 पर्यंत या कंपनीच्या 8 उत्पादन फॅसिलिटी या पूर्ण जगभर आहेत.

अगदी भारतामध्ये देखील यांची एक उत्पादन कंपनी आहे

सुरुवातीपासूनच अत्युच्च दर्जा, किंमतीवर कंट्रोल आणि व्यवसायाच्या अनेक बाबी स्वतःकडे कंट्रोल ठेवणे, या गोष्टी या कंपनीने केल्यामुळे यांना व्यवसायांमध्ये मोनोपॉली तयार करता आली.

आपण आपल्या व्यवसायांमध्ये अशा प्रकारे Monopoly करून त्याचा फायदा शकतो,त्या वेळेला आपण पाहिजे त्या किमतीला उत्पादन विकू शकतो.

या कंपनीकडे ग्लास आणि फ्रेम यांचे मोठे ब्रॅन्डस आहेत.
उत्पादन कारखाने आहेत
रिटेल विक्री करण्यासाठी दुकानांची चैन आहे
अगदी डोळ्याचा विमा काढण्यासाठी जगातील दोन नंबरची विमा कंपनी आहेत अशा सगळ्याच गोष्टी एकत्रीत उपलब्ध आहेत .

ही कंपनी अनेक चांगल्या ब्रांडसाठी (D&G, Tiffany,) गॉगलचे उत्पादन करून देते,( याला लायसन्स ऍग्रीमेंट म्हणतात )

त्यामुळे त्यांना तिकडून देखील चांगलं प्रॉफिट मिळतं,अशाप्रकारे इतरांचे उत्पादन करून देत देत ही कंपनी आजघडीला जगातल्या 80% Premium लेवल गॉगलचे उत्पादन करणारी कंपनी बनली आहे.

***************************

एखाद्या व्यवसायासाठी समर्पण देणे, आहे त्या साधनसंपत्तीचा अतिशय चांगल्याप्रकारे वापर करणे,चांगल्या लोकांबरोबर कॉलॅबरेशन करणे,आणि गरज पडेल तेव्हा धाडसी निर्णय घेऊन पैसा लावणे, ही या कंपनीच्या वैशिष्ट्य होतं.

आपण गुगलवर या कंपनीच्या इतिहासाबद्दल आणि यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल जास्त माहिती मिळवू शकता.

आपण या कंपनीकडून खूप काही शिकू शकतो,याचा वापर करून आपण आपल्या व्यवसायामध्ये देखील प्रगती करू शकतो.

आपण तीच करावी ही एक सदिच्छा.

© निलेश काळे.
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764
office : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *