जगातले टॉप 50 ब्रॅन्डस,”हे” 14 बिजनेस प्रिंसिपल्स वापरतातच

जगातल्या टॉप 50 कंपन्या,हे 14 बिजनेस प्रिंसिपल्स वापरतातच.

हे प्रिंसिपल्स हेन्री फेयोल ने मांडलेले आहेत.

Henry Fayol (1841-1925) हा फ्रेंच खाण- इंजीनियर होता , त्याने हे 14 तत्व मांडले आहेत जे आजही तितकेच प्रभावी आहेत .

DAD U C USSR
O I SEE

या वरील दोन ओळींना न्यूमैनिक्स सारखं वापरून आपण हे 14 प्रिसिपल्स लक्षात ठेवतो .

(1)D: Division of Work:
हे तत्व सांगतं कि , तुमचा व्यवसाय छोटा असो कि मोठा आपण त्या कामाची विभागणी करुन दिलं पाहिजे .
सुरुवातीस शक्य होणार नाही , पण थोडया दिवसात . ते ,,ते काम Expert ला हँड ओव्हर केलं पाहिजे .

म्हणजे काय ? तर आपण एकटेच पळून उपयोग नाही .
कामाची वाटणी करा यामुळे काम फास्ट होते , चांगले होते ,नुकसान होत नाही .

****************************
(2) A= Authority & Responsibility

आपण एखादयाला काही काम दिले जवाबदारी दिली , क बाबा हे पूर्ण कर !तर त्याच्या बरोबर त्याला काही अधिकार पण दिले पाहिजेत .
अधिकाराविना जबाबदारी दिली तर लोक निष्प्रभ होतात , आणि बिना जबाबदारी चे अधिकार दिले तर उद्धटपणा वाढतो .
*****************d******
(3) Discipline :

शिस्त हा कोणत्याही संस्थेचा , कारखान्याचा कणा आहे, कोणी कधीही या , काही पण करा , असं चालत नाही , त्यामुळे शिस्त ही अगोदर पासूनच लावून टाका .
या दोन प्रकारच्या असतात ..
A) self imposed
B) Command discipline
म्हणजे काय तर ,, काही शिस्त या कर्मचाऱ्यामध्ये आपोआप येतात आणि काही आपण त्या दरवेळी लावाव्या लागतात .
**************************

(4) Unity of command=

कोणत्याही क्षेत्रात समजा एका ग्रुप कडून किंवा व्यक्ती कडून काम करवून घ्यायचे आहे , तर त्याला दोन किंवा अधिक जणांनी वेगवेगळे कामं सांगून चालेल का ?
उत्तर साहजिकच नाही .
तसंच आहे बिझनेस मध्ये पण कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेण्यासाठी एकाच ठिकाणाहून ऑर्डर गेली पाहिजे , नाहीतर कामाचा खोळंबा होतो .
यालाच Unified order system असं म्हणतात .
******f****t***************

(5) Unity of Direction :

कोणत्याही व्यवसायात स्पेशल कामे करण्यासाठी स्पेशल टीम असतात , . या प्रिसिपल नुसार .
teams should head in one Direction
म्हणजे सर्वांनी एकाच दिशेनेच काम करणे गरजेचे असते .
**********************

(6) Subordination of self. interest over general interest :

बऱ्याचदा कंपनीचं कामे करणारी लोकं , कंपनीचा किंवा उद्योगाचा फायदा बघण्याऐवजी स्वतःचा फायदा बघतात Henry त्या काळात सुद्धा म्हणतात हे टाळलं गेलं पाहिजे .
आळस करणे , कामं वेळेवर न करतात टाईमपास करणे म्हणजे पण याच प्रकारात येतं .
उद्योगाच्या मालकाने हे प्रकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वचक ठेवला पाहिजे .

**************************

(7) Remunaration :

आपण पगार किती दयावा , याबद्दल कोणालाही असं वाटू शकतं कि , कमीत कमी दयावा .
पण या प्रिसिपल नुसार , पगार Reasonable & Satifactory असावा .
अन्यथा कर्मचाऱ्याच्या भरती मध्येच आपला वेळ वाया जाऊ शकतो .

(8) Centralization & Decentralisation :

हा प्रकार असा आहे,
जेंव्हा आपण छोटे व्यावसायिक ऊसतो तेंव्हा सर्वच कामं आपण करतो , खरेदी , उत्पादन , मार्केटींग , विक्री . याला centralised system म्हणतात ,
पण ज्यावेळी आपण या प्रत्येक प्रकारासाठी एक वेगळा मॅनेजर अपॉईंट करू त्यावेळी त्या स्ट्रक्चर ला Decentralised स्ट्रक्चर म्हणू .

एक ठरावीक स्टेज ला आपण पोहचलो कि , . Decentralization अत्यावश्यक असतं , नाहीतर आपलं Jet Airways होऊ शकत्

**********************
(9) Scalar chain :

जेंव्हा उद्योग मोठा होत जातो , तेंव्हा एक ऑर्डर नुसार लोक रिपोर्ट करत जातात .
Owner
GM
Marketing Maranager
sub – Marketing Manager
marketing Executive
field Marketer
आता या चैन मध्ये सर्वात खiलाचा field Marketer ला रिपोर्ट करायचा आहे तो Marketing Executives ला , पण जर दुसऱ्या manufacturing च्या चेन मधील field वरिल व्यक्तीशी त्याला डायरेक्ट संपर्क करता आला पाहिजे याला Scalar chain म्हणतात .

*********************

(10) Order :

वर जो Discipline हा विषय आला आहे , तो कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीविषयी आला आहे , पण यशस्वी उद्योजकाने हा गुण सर्वात अगोदर शिकला पाहिजे तो म्हणजे
Everything should be in order and every person should be in place

एखादया साध्या तल्या साध्या गॅरेज मध्ये जाऊन बघा .

सर्व पाने ( wrenches) एका Order मध्ये सेट केलेले असतात .

*********************
(11)Equity :

दोन शब्द आहेत Equity आणि Equality .
यात थोडा फरक आहे .
शेजारचं चित्र बघा .
ज्या व्यक्तीला गरज नाही त्याला न देणे , ज्याला अॅव्हरेज गरज आहे त्यास ऍव्हरेज मदत करणे आणि ज्याला जास्त गरज आहे त्यास जास्त मदत करणे याला equity असे म्हणतात, इथे Equality असा शब्द आला असता तर सर्वाना समान भेटलं असतं .
जसं कि सध्या सरकार कोणाच्या खात्यात पैसे पाठवणार आहे ? तर गरिब , मजूर , दुबळ्या घटकांच्या ! मध्यमवर्ग , श्रीमंत वर्ग या कोरोनामुळे परेशान नाहीये का ? तर आहे ! पण मदत त्यांना कारण त्यांना जास्त गरज आहे , याला इक्वीटी म्हणतात .

****************

(12)Stability & Tenure

कोणताच कर्मचारी विनाकारण , शॉर्ट पिरियड मध्ये कामावरून कमी करू नये ,
त्याला at least थोडा tenure ( कार्यकाळ ) तरी पूर्ण करू दयावा .
विनाकारण कर्मचारी flip करणे हे परवडणारे नसते , पण याचा अर्थ विनाकारण आगावू , कामचुकार कर्मचारी मेंटेनच करावे असे नाहीये .
पण साधारणपणे वेळ दयावाच
********************

(13) initiatives:

आपल्या कडील एखादा कर्मचारी मग तो चतुर्थ श्रेणीत काम करणारा का असेना , त्याला सुद्धा काही सुचलं असेल , त्याने बदलासाठी काही initiative घेतला असेल , तरी तो आवाज ऐकला गेला पाहिजे ,

Google तर स्वतःच्या कर्मचाऱ्यातच स्पर्धा भरवते , त्यासाठी स्वतः पुढाकार घेते , अशा प्रकारे आपल्या आजूबाजूला कोणी पुढाकार घेऊन सुधारणा सुचवणारं असेल तर त्याला त्याची संकल्पना मांडण्याची संधी नक्की दया , आत्ता या कोरोनाच्या संकटात पंतप्रधान मोदींनी पब्लीक मधून आयडीयाज मागवल्याच कि ?

************ *****
(14) Espirit De Corps

हा एक फ्रेंच शब्द आहे , त्याचा अर्थ आहे Union is strength
शेवटी आपल्या उद्योगात ,व्यवसायात , काम करणाऱ्यiनी एका दिलाने काम करणं आवश्यक असतं त्यातच सर्वांच भलं आहे , कारण जोपर्यंत आपण एकत्रीत येणार नाही तोवर काहीच शक्य नाही .

हे चौदा पॉईंट्सची थेअरी Henry Fayol ने साधारण 1870 – 75 च्या काळात लिहीली असेल , पण ती आजही तेवढीच परिणामकारक आहे .

यातील बरेचसे पॉईंट्स आपण आपल्या व्यवसायात लावून प्रगती साध्य करू शकतो .

या फ्रेंच इंजीनियर ने मांडलेले त्या काळी मांडलेले मुद्दे 2021 मध्ये पण किती चपखल बसतात नाही का ?

https://www.facebook.com/groups/675025626396370/?ref=share

शुभेच्छा!

निलेश काळे .
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंटस
आनंद पार्क, औंध ,पुणे.
9518950764
office : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *