जाणून घ्या !भारतात,अमेरिकन वाहने का चालत नाहीत?

Business coaching

अमेरिकन कार कंपन्या भारतात का चालत नाहीत ?

आता तुम्ही म्हणाल,आपल्याला काय करायचंय?पण तसं नाही,प्रत्येक घटनेतुन शिकण्यासारखं खूप काही असतंय.

2017 मध्ये जनरल मोटर्स ने भारतातली आपली विक्री बंद केली आणि आता फोर्ड !असं काय आहे? कि या तगडया अमेरिकन कंपन्या भारतासारख्या मोठ्या मार्केटमधे, व्यवसाय नाही करू शकल्या?

तसे बघायला गेलं तर भारत हा जगातलं पाचवं मोठं वाहन मार्केट आहे,याचा अर्थ?या मार्केटमधुन बाहेर पडणं म्हणजे मोठं नुकसान करून घेणं आहे,तरिपण अमेरिकन कार कंपन्या बाहेर पडताहेत, त्याची कारणं जाणुन घेऊया.

Marketची नाळ पकडता आली नाही :

भारतीय लोकांचं कल्चर आणि अमेरिकन कल्चर यामध्ये खूप मोठा फरक आहे, Ford आणि General Motors या तिकडे श्रेष्ठ आहेत,General motors तर अमेरिकन सैन्यासाठी वाहने आणि शस्त्र बनवते,पण भारतात चालली नाहीच.

या अमेरिकन कंपन्या अनुक्रमे 1995, आणि 1997 मध्ये भारतात आल्या असल्या, तरी त्यांना भारतीय मार्केटची नाळ लवकर पकडता आली नाही.

फोर्डने सुरुवातीच्या काळात महिंद्रा बरोबर पार्टनरशीप करून Escort आणि ikon हे मॉडेल बाजारात उतरवले,पण पुढे जेव्हा फोर्ड या पार्टनरशीप मधून बाहेर पडली तेव्हापासून त्यांचे अनेक निर्णय चुकतच गेले.

📌 Wrong product launch :

भारत हा जास्त करून,small cars, hatchback, आणि Cross over असे कार्सचे मॉडेल चालणारा देश आहे, आणि अमेरिकेत परफॉर्मन्स कार चालतात हा फरक आहे.
आपण जिथे जातो, त्या परिस्थितीला चालणारे उत्पादने आणायला पाहिजेत,पण फोर्डने त्या प्रकारचे भारताला सुट होणारे प्रॉडक्टस लवकर आणलेच नाहीत,जे काही प्रॉडक्ट आणले ते ना तर धड दिसायला चांगले होते,ना रंगा रूपाला.

आपण असं म्हणू शकतो कि फोर्डने सुरुवातीच्या काळापासूनच कुरूप (ugly) असे उत्पादनं भारतीयाच्या माथी मारली,आखाती देशांमध्ये किंवा अमेरिकेमध्ये यांचे जे टॉप मॉडेल आहेत,ते त्यांनी भारतात उतरवलेच नाहीत,सो भारतीयांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.

Strong Asian car market:

भारतात मेनली तीन प्रकारच्या कार्स विकल्या जातात,Asian, European, आणि American,

सुझुकी, टोयोटो, ह्युंदई, या आशियन,
तर फोक्सवॅगन,Audi, BMW, Mercedes या युरोपियन कंपन्या, तर Jeep,GM, Ford या अमेरिकन,

भारतातल्या TATA, Mahindraचा वाटा सुद्धा चांगला आहे,

एकूण वाहनापैकी Maruti Suzuki चा एकटीचा वाटा 50% इतका प्रचंड आहे.

त्या खालोखाल Hyundai चा वाटा 17.6% इतका आह, बाकी उरलेल्या प्रमाणात सगळे इतर कार्स उत्पादक आले ,याची कारणं अनेक असली तरी Asian कार्स या रिलाएबलआहेत . त्यांची मेंटेनन्स कॉस्ट कमी आहे, हे त्यांच्या चालण्याचं मुख्य कारण आहे.

📌 No pickup truck market ;

अमेरिका हा भौगोलिक दृष्ट्या मोठा देश आहे ,त्यामुळे त्या ठिकाणी पिकअपट्रक ची मागणी मोठी असते, त्या तुलनेमध्ये भारत हा दाटीवाटीचा देश आहे,येथे मोठ्या वाहनांपेक्षा लहान लहान वाहन जास्त चालतात, आणि फोर्ड या कंपनी ने भारतात हा सेगमेंट दुर्लक्षित केला,त्याचा त्यांना फटका बसला.

Performance कार पेक्षा परवडणारी वाहनं पाहिजे असणारा देश :

अमेरिकन समाजामध्ये दणकट आणि परफॉर्मन्स देणारी वाहने जास्त चालतात,परंतु भारत हा असा देश नाही इथे मायलेज चांगले देणारी / मेंटेनन्स कॉस्ट कमी असणारी अशी वाहने जास्त निवडली जातात, नेमकं नाळ ओळखण्यामध्ये हे कमी पडले.

📌 Diesel :
नोकिया ने लवकर दोन सिम कार्ड वाला मोबाईल आणलाय नाही त्यामुळे त्यांना नुकसान झाले,

तसं यांच्या बाबतीतही घडलं,आता इथून पुढे जरी डिझेल कार बाद होणार असल्या तरी, गेल्या 20 वर्षात पेट्रोल कार पेक्षा, डिझेल कारला मागणी जास्त होती,आणि हा मार्केट शिफ्ट फोर्डने दुर्लक्षित केली,लवकर पाऊलं उचलली नाहीत,

📌 After sales service :
आपण जेव्हा कधीही एखादी वस्तू विकत घेतो ,तेव्हा त्याच्या सर्विस बद्दल काय? हा प्रश्न आपसूकच निर्माण होतो.

आपण जर नीट बघितलं तर एखाद्या मोठ्या शहरांमध्ये मारुतीची किंवा हयुंदाईची चार ते पाच सर्विस स्टेशन्स आहेत,परंतु नेमकं फोर्डने या बाबीकडे दुर्लक्ष केलं,त्यांची सर्विस स्टेशन सापडायचि म्हणलं तर दिवा घेऊन फिरायची वेळ.

लहान शहरांमध्ये तर यांची सर्विस स्टेशन्स क्वचितच आढळतात, पण मारुती बाबतीत असं कधी घडत नाही, त्यामुळे सहाजिकच लोकांनी अमेरिकन कंपनीच्या ऐवजी मारुती ला जास्त महत्त्व दिलं.

Maintenance costs :

एखादं वाहन विकत घेतलं गेलं की त्यानंतर त्याचा मेंटेनन्स सुरू होतं, आणि या ठिकाणी देखील या कंपनीच्या वाहनांनी मार खाल्ला, जापानीज गाड्या या कमीत कमी मेंटेनेस मध्ये चालतात, परंतु अमेरिकन गाड्यांच्या बाबतीत तसं नव्हतं, कारण ?या गाड्या परफॉर्मन्स गाड्या आहेत,त्यामुळे यांचा मेंटेनन्स देखील वरचेवर निघत राहिला आणि भारतीय लोकांना हे पचनी पडला नाही ,त्यामुळे भारतीय जनतेने या गाड्यांकडे सहज दुर्लक्ष केलं.

Competitive SUV marker :

भारतामध्ये SUV चं मार्केट वाढत आहे परंतु ह्याच्या मध्ये देखील महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीचा हात कोणीही धरू शकत नाही, कारण त्यांच्याकडे यशस्वी वाहनांची मोठी लाईन आहे,त्याचबरोबर टोयाटोच्या फॉर्च्युनरला देखील तगडी टक्कर देणारे वाहन आणायला हवे होते,तसं Endeavour लॉंच करून अशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला,परंतु किंमत, सर्विस,स्पेअर्स आणि मेंटेनन्स कॉस्ट याचा मेळ काही लागला नाही, त्यामुळे या सेगमेंटमध्ये देखील फोर्ड ही कंपनी मागे पडली.

Not so strong OEM :

एखादं वाहन विकलं गेलं की,त्याच्या स्पेअर पार्ट ची मागणी होत असते, भारतामध्ये याच्या जपानीस किंवा जर्मन कंपन्या आहेत त्यांचे स्पेअर पार्ट मिळणं सोपं होतं,कारण यांचे उत्पादक OEM तिथेच जवळपास कुठेतरी आहेत,परंतु Ford च्या वाहनांसाठी स्पेअर पार्टची देखील बोंबाबोंब झाली,यांच्या उत्पादकाकडून स्पेअरपार्ट मिळाला उशीर लागला होता, त्यामुळे वाहनं नादुरुस्त होऊन पडत गेली, या बाबीकडे फोर्ड ने फारसे विशेष लक्ष दिले नाही त्यामुळे देखील जनतेच्या मनातून ही वाहने उतरत गेली.

भारतामध्ये जेव्हा मीड साईज एसयूव्हीचं मार्केट वाढायला लागलं, तेव्हा फोर्डने इकोस्पोर्ट ही वाहने मार्केटला आणली, परंतु स्पर्धकांची वाहने आणि फोर्डची वाहने, यांच्यामध्ये किमतीतील तफावत, मेंटेनन्सचा खर्च,स्पेअर पार्टची उपलब्धता,या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्या आणि त्यामुळे यांच्या वाहनाला पाहिजे तेवढा उठाव मिळाला नाही.

एकूणच काय ?तर एखाद्या कंपनीने आपण ज्या मार्केटमध्ये जात आहोत त्या ठिकाणी मार्केटमध्ये नेमकं काय हवंय? स्पर्धक कोण आहेत?लोकांची मागणी काय आहे ?आपली तयारी किती आहे ?या सगळ्या गोष्टी नीट की अभ्यास करूनच उतरायला हवा आहे.

पण या सगळ्या बाबींमध्ये ही अमेरिकन कंपनी कुठेतरी कमी पडली, त्यामुळे चांगले उत्पादन हातात असतानादेखील फक्त मार्केटची स्टडी नसल्यामुळे,आज फोर्डला आपला गाशा गुंडाळावा लागला

भलेही फोर्ड भारतामध्ये उत्पादन करून एक्सपोर्ट करेलच, परंतु ज्या लोकांनी त्यांच्या डीलरशिप घेतल्या होत्या त्यांचं काय ???यांच्याकडे वाहने आहेत त्यांना तर ही कंपनी सर्विस देईलच,परंतु ती सर्विस किती काळ टिकून राहील याबाबत मात्र शंका आहेच.

म्हणून करता ज्यावेळी आपण एखाद्या नवीन मार्केटमध्ये आपली उत्पादने घेऊन उचलू त्यावेळेला 1)मार्केटचा पूर्ण अभ्यास करायला हवा.

2) जनतेची भावना समजून घ्यायला हवी आहे,

3) त्या ठिकाणचं कल्चर कशाप्रकारे आहे? ते समजून घेऊन सगळ्या गोष्टी करायला हव्यात,

उगाचच आपण मार्केटचे लीडर आहोत आणि आपल्याकडे उत्पादनात चांगली आहेत आपली उत्पादने चांगले चालतात या भ्रमामध्ये राहून मार्केटमध्ये आपली उत्पादने घुसवण्याचा प्रयत्न करू नये,

नाहीतर?
“चांगल्या व्यवसाचा फोर्ड होतो” !

© निलेश काळे,
उद्योगनिता बिझनेस कन्सलटंटस,
आनंद पार्क,औध, पुणे.
9518950764
office : 9146101663

Previous Post Next Post

One thought on “जाणून घ्या !भारतात,अमेरिकन वाहने का चालत नाहीत?

  1. खूपच छान निरीक्षण आणि योग्य माहिती.
    खूप खूप धन्यवाद🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *