जाहीरात करताना वस्तुची किंवा सेवेची विक्री किंमत अशी लिहावी

जाहिराती करताना,वस्तुची किंवा सेवेची किंमत या प्रकारे लिहावी.

📌 आपण व्यापारी व्यापार करतो तो पैसा कमवण्यासाठी आणि व्यापाऱ्यांची मानसिकता असते की ग्राहकाकडून जास्तीत जास्त पैसा काढावा आणि ग्राहकांची मानसिकता अशी असते, की व्यापाऱ्याकडून कमीत कमी किमती वर माल मिळावा,

आपली व्यापारी म्हणून भूमिका अशी असली पाहिजे की किंमत तीच घ्यायची ,परंतु किंमत दिसताना मात्र कमी दिसली पाहिजे.

य यासाठी पण खूप गोष्टी आहेत जिथे आपण किंमत कमी न करता किंमत कमी दाखवू शकतो, जेणेकरून ग्राहक चांगल्या प्रकारे खरेदी करेल !

#Try_this

📌 (1) #One_Figure_less:

हा प्रकार तर सगळ्या जगात प्रसिद्ध झाला आहे, एखाद्या वस्तूची किंमत 1000 रुपये लिहिण्यापेक्षा rs.999 लिहिली तर तो आकडा तीन अंकी होऊन जातो,

म्हणजे उच्चार करताना सुद्धा त्या वस्तूची किंमत हजारात न जाता शे मध्ये राहते

ज्या ग्राहकांना समजून घ्यायचेय त्याला ही चलाखी बरोबर ओळखून येते, परंतु पन्नास टक्के ग्राहक याची किंमत 900 रुपये समजतात !

त्यामुळे अगदी गल्लीतला दुकानदार ते ऑनलाइन शॉपिंग मधील विक्रेते हे सगळेच या प्रकाराचा वापर करतात.

यामध्ये आपण एक रुपया ते दहा रुपये पर्यंत किंमत कमी करू शकतो, यामुळे आपल्या प्रॉफिटवर फारसा परिणाम होत नाही ,परंतु ग्राहकाच्या समजून घेण्यावर परिणाम होतो त्यामुळे, आपण विक्री करत असताना या प्रकारची युक्ती वापरू शकता.

*******************************

📌(2) #किंमत_Ascending_Order_मध्ये_लिहा !

आपण ज्या वेळेला एखाद्या कार ची जाहिरात बघतो, त्या वेळेला त्या जाहिरातीमध्ये बेसिक मॉडेलची किंमत दिलेली असते, बेसिक मॉडेलची किंमत टॉप मॉडेल अतिशय कमी असते ,परंतु बघणाऱ्या ग्राहकांसाठी ती किंमत आपल्या आवाक्यात वाटायला लागते, भलेही यांचा फरक पडेल परंतु लिहिताना किंमत बेसिक मॉडेलची लिहिली आणि त्याच्यापुढे रेंज या पासून सुरू असलेली ही रेंज लिहा ! यामुळे ग्राहकांच्या मनामध्ये एक वेगळी भावना तयार होते.

त्यामुळे अनेक वेळा आपल्याकडील उत्पादनांच्या किमती या रेंज मध्ये लिहायला पाहिजेत , सुरुवातीला कमी किंमत लिहा आणि त्यानंतर वाढत्या क्रमाने किमती लिहा.

हा प्रकार फायदेशीर ठरतो.

**********************************

📌 (3) #Start_with_high_pricetag

ज्यावेळेला ग्राहक आपल्याकडे खरेदीसाठी येतो ,त्यावेळेला त्याच्यापुढे सगळ्यात महागड्या किमतीची वस्तू ठेवा ,यामुळे ग्राहकाला एक प्रकारचा शॉक बसेल ,आता त्यालाही समजलं की आपल्याला जी वस्तू पाहिजे त्याच्या किमती इतक्या सुद्धा असू शकतात? त्यानंतर त्या ग्राहकाला कमी किमतीच्या वस्तू दाखवणे चालू करा, अशा प्रकारामुळे ग्राहकाच्या मनाची तयारी होईल आणि त्यानंतर मग तो त्याला हव्या असलेल्या किमतीची वस्तू खरेदी करेल !

या प्रकारची शॉक ट्रीटमेंट बऱ्याच वेळेला काम करून जाते.

*********************************

📌 (4) #Consolidated_Pricing

बऱ्याच वेळेला एखाद्या उत्पादनाची किंमत ही त्याची MRP + त्याच्यावर लागणारे टॅक्स + शिपिंग करता लागणारे चार्जेस ,,,असे ठरवले जाते पण मुळात आपली MRP काय आहे? ती मोठ्या अक्षरात लिहा, त्यानंतर पुढे कंस करा आणि त्यामध्ये शिपिंग आणि टॅक्सेस Extre असे लिहून टाका , असं लिहलं नाही तर काय होतं? तर एकूण किमतीचा आकडा मोठा दिसू लागतो आणि ग्राहक मग येथे माघारी फिरू शकतो, त्याऐवजी आपली एमआरपी लिहा आणि टॅक्सेस एक्स्ट्रा असं लिहून टाका ते बरं पडतं.

समजा किंमत 140 त्याच्यावर दहा टक्के टॅक्स म्हणजे 14 रुपये अरे डिलिव्हरी चार्जेस म्हणजे 10 रुपये

असे एकूण 164 रुपये लिहिण्यापेक्षा 140 + taxes असं लिहिलेलं कधीही चांगलं.

याचं कारण 140 हा आकडा 164 पेक्षा छोटा दिसतो ना ??

ग्राहकाला जी extra price द्यावी लागेल ते सरकार दरबारी जाईल त्यामुळे आपण किती घेतोयं? तेवढाच आकडा लिहा.

********************************

📌 (5) #size_of_price:

समजा आपण या उत्पादनाची किंमत लिहतोय, त्या उत्पादनाची किंमत पूर्वी जास्त होती आणि आता आपण त्याची किंमत कमी केली आहे, आता यावेळी काय कराल??

आता जी किंमत येतायती किंमत मोठ्या अक्षरात लिहा आणि पूर्वीची किंमत देत होता त्या किमतीचा आकडा छोटा लिहा आणि त्यावर फुली मारा.

अशाप्रकारे आपण ग्राहकांसाठी खूप काही करतोय ,आपण ग्राहकांच्या भल्याची गोष्ट बघतो, हे दिसून येईल आणि ग्राहक मोठ्या उत्साहाने खरेदी करेल |

********************************

📌 (6) #idle_the_comma

जर आपल्या उत्पादनाची किंमत चार अंकी किंवा अधिकची आहे, त्या वेळेला जर आपण पहिल्या अंकानंतर कॉमा लिहून नंतर चे अंक लिहिले तर ती किंमत जरा जास्त वाटते, म्हणजे लांबून बघितल्यानंतर ती किंमत जास्त वाटते, म्हणून अशी किंमत लिहीत असताना कॉमाचा वापर करू नये !

जसं 12,000 पेक्षा 12000 हे जरा नॉर्मल वाटतं !

तेंव्हा अशी प्राईसिंग लिहा !

********************************

तसं बघायला गेलं तर आजच्या या ऑनलाइन खरेदीच्या युगामध्ये कोणत्याही विक्रेत्याने आपल्या उत्पादनाच्या किमती या मॉडरेट ठेवायला पाहिजेत,जेणेकरून ग्राहक जास्तीत जास्त प्रमाणात खरेदी करून आपल्याला नफा सुद्धा व्यवस्थित मिळेल, खूप लोक येथे चूक अशी करतात कि किमती अव्वाच्या सव्वा लिहून कमीत कमी ग्राहकांपर्यंत पोहोचतात, जे नॉर्मली चूक आहे !

*****************************

वरील पद्धती काही लोकांना हास्यास्पद वाटू शकतात ,परंतु जे ट्रेंड मार्केटमध्ये चालू आहेत ,ते आपण लिहिलेले आहेत ,तेव्हा ज्यांना या पद्धतीचा वापर करून आपली विक्री वाढवायचीये, त्यांनी या पद्धती वापरा आणि आपली विक्री घडवून आणा !

https://www.facebook.com/groups/675025626396370/?ref=share

शुभेच्छा
© निलेश काळे ,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंटस,
आनंद पार्क,औंध,पुणे,
9518950764.

Udyogniti पर्सनल कन्सलटिंग पण करते,मदत लागत असल्यास खालील नंबर वर संपर्क करा !

Office :9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *