जेंव्हा एक IAS, आपली सरकारी नौकरी सोडून, स्टार्टअप चालू करतो, तेंव्हा बनते 3.4 billion ची कंपनी

#Business_Story:

#Unacademy

© निलेश काळे .

📌 “आजच्या युगात करोडो रूपये कमावयचेत तर फार मोठ्या कंपन्या , आवाज करणाऱ्या मोठाल्या मशीन्स , हजारो कर्मचारी , किंवा ऑफीसेस पाहिजेत असं काही नाहीये ! फक्त आग पाहिजे ती पण बुडाला लागलेली !

📌ही स्टोरी सुरु होतेय 2010 च्या 31 डिसेंबरच्या मध्यरात्री गौरव मुंजाल हा , सेकंड इअर कॉम्प्यूटर इंजिनिअरिंग करणारा पोऱ्या पार्टी करायचं सोडून असा विचार करत असतोय कि , नवीन वर्षात काय करावं ? जसं आपण सगळेच करतो !

📌 त्याला सहज सुचतं कि चला आपल्या इंजिनिअरिंगच्या टॉपीकवर एक व्हिडिओ बनवू आणि आपलं एक चॅनेल बनवून युट्युबला टाकू ! आयडीया डोक्यात आली आणि लगेच त्याच्यावर काम केलं,

‘बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होतोय कि आयडीया डोक्यातच जिरून जातात !

📌 त्या व्हिडिओ लाईक्स आणि कमेंट यायला चालू होतात तसा दादाचा विश्वास वाढतो आणि चालु होतो प्रवास रोज एक विडीओ टाकायचा !

📌 जस जसे व्हिडिओ वाढत जातात तस तसं चॅनेल वाढायला चालु होतं !

📌शिक्षण पुर्ण झालं कि गौरवने थोडा वेळ जॉब केला आणि आपला एक मित्र हिमेश सिंग याच्याबरोबर एक अॅप तयार केलं FLATCHAT , या अॅपवर ते कॉलेजच्या मुलांना रहाण्यासाठी किरायाने flat मिळवून दयायचे .

📌 आता अशा आयडीया ला फंडींग मिळतेच तशी यांना पण मिळाली आणि Flat -Chat चांगले चालू लागलं , त्याचं valuation वाढलं किं , त्यांनी ते अॅप्लीकेशन विकून टाकलं ज्यातून त्यांना 50 लाखाची फंडींग मिळाली , तोपर्यंत गौरव मुंजाल हे स्वत : व्हिडीओ बनवुन टाकतच होते ! त्यामुळे त्यांचं चॅनेल वाढतच गेले .

📌 इकडे अजून एक जण त्यांच्या या स्टार्टअपमध्ये यायला तयार व्हायला होता ! त्यांचं नाव … डॉ.रोमन सैनी .

📌रोमन सैनीची पण आपली वेगळीच स्टोरी आहे , 1991 ला राजस्थानमध्ये जन्मलेला हा पोरगा तसा अभ्यासात फारच हुश्शार !!

📌 त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी AllMS ची मेडिकल एन्टरन्स दिली आणि पहिल्या प्रयत्नातच MBBS साठी सेलेक्ट ! ते पण AIIMS दिल्ली मध्ये ( जिथे आपले VIP नेते अॅडमीट होतात )

📌MBBS च्या तिसऱ्या वर्षाला असताना एका मेडिकल कॅम्पला खेडयात गेले असता त्यांना दिसला ,,,
सिस्टीमचा भकासपणा, भयंकर गरिबी आणि यंत्रणेतील कमालीची उदासिनता !

📌 ठरलं ! सिस्टीमचा पार्ट बनून सिस्टीम बदलायची ! चालू केला अभ्यास … आणि वयाच्या बावीसाव्या वर्षी UPSC क्लीअर , नुसती पास नाही तर आठरावी रँक मिळवून पास !

📌पहिली पोस्टींग असिस्टंट कलेक्टर जबलपूर , मध्यप्रदेश !

📌 पण इथे त्यांना जाणवलं कि, सिस्टीमचा भाग बनवून वरवर सिस्टीम बदलण्यापेक्षा ती मुळातुन बदलली पाहिजे, त्यांना गौरव मुंजालचा हा unacedemy चा कन्सेप्ट माहिती होताच ! ते चांगले मित्र ही होते , एक दिवस गौरव मुंजाल नी त्यांना UPSC Entrance देणाऱ्या मुलांसाठी व्हिडिओ बनवायला सiगितले होते , तर त्याला खुपच रिस्पॉन्स आला होता ,, ही बाब होतीच !

📌 आता यांचं असं ठरलं कि नौकरी बिकरी काही करायची नाही , समाजात एक मोठा प्रभाव पाडायचा असेल तर …. त्या विद्यार्थ्यांना घडवावं लागेल ज्यांच्या आईवडिलांकडे पोरांच्या शिक्षणासाठी फीस म्हणून दयायला लाखो रुपये नाहीयेत !

📌 इथं साधी क्लर्कची सरकारी नोकरी अनेकांना सोडवत नाही आणि या माणसाने IAS च्या नौकरीचा राजीनामा दिला ! समाजाला काही तरी जास्त चांगलं आणि मोठ्ठं देण्यासाठी .

📌2013 साली मग या त्रिकुटाने मिळून Unacademy मध्ये फक्त कॉम्पीटीटीव Exam साठी Video बनवायला चालु केले ते पण फक्त Upsc साठी कारण रोमन सैनी त्यात मास्टर होते .

📌 अशा प्रकारे यांचं चॅनेल सगळ्यात मोठया शैक्षणीक चॅनेलपैकी एक बनलं

📌 2016 साली यांची वेबसाईट तयार केली , तोपर्यंत युट्युब वर तर प्रवास चालुच होता .

📌 यांच्या युट्युबच्या व्हिडिओजला मस्त रिस्पॉन्स होता त्यामुळे आता यांनी स्वतःला एक एज्युकेशन प्लॅटफॉर्म म्हणुन बनवायला चालु केलं , फंडीग घेतली , नवीन नवीन चांगले शिक्षक आणले , यांच विशेष असं आहे कि शिक्षक त्यांच्या घरातून शिकवू शकतात आणि पूर्ण देशभरातील विद्यार्थी त्यांच्या घरात बसून शिकू लागले,फंडींग असल्याने ते शिक्षकांना पगार देऊ शकत होते पण विद्यार्थांना मात्र सबकुछ फ्री होतं.

📌 2016,2017, 2018 मध्ये यांनी अनेक राऊंड मधून अजून फंडींग मिळवली , तो पर्यंत यांचा युजर बेस वाढत गेलेला होताच !

📌 अनेक भाषांमधून , सगळ्याच डिवाईसवर ( जसं मोबाईल , लॅपटॉप , पीसी ) यांचे कोर्सेस उपलब्ध झाले ते पण कोटा, दिल्ली , चंडीगढ सारख्या शहरातील टॉप टिचर्स कडून !

📌 जे इन्वेस्टर्स फंडींग देतात त्यांना नफा तर पाहिजे ना ? नुसतंच स्टार्ट अप मोठ्ठ होऊन काय उपयोग ?

📌 तेंव्हा Unacademy ने त्यांचं paid असं प्रिमियम मॉडेल काढलं .

📌 ज्यावेळी तुम्ही खूप जास्त काळ बेस्ट कन्टेन्ट फ्री मध्ये देत असाल? त्यावेळी लोकांना त्याची Value कळलेली असते म्हणून त्यांच्या paid model ला मोठा प्रतिसाद मिळाला,यांचं पेड मॉडेल सुद्धा दर महिन्याला फिस भरा असं सोप्पं आहे , त्यामुळे विद्यार्थ्यांना लोड येत नाही .

📌 अशा प्रकारे थोडं कमवंत,थोडं समाजात एक सकारात्मक बदल घडवणारं स्टार्ट अप यशस्वी बनलं !

📌 आज त्यांच्याकडे 1500 टिचर्स , आठ ऑफिसेस आणि भारतातल्या सगळ्या भाषेत कोर्स उपलब्ध आहेत .

📌 तुम्ही म्हणाल कि,Biju’s किंवा Vedantu सारखे यांचं नाव का नाहीये ? तर Unacademy फक्त स्पर्धा परिक्षांपुरतं मर्यादीत आहे , तर बायजू पहिली ते बारावीच्या विदयार्थ्यांना कोचिंग देते !

📌 आता Unacedamy सुद्धा अकरावी बारावी च्या मुलांसाठी कोचींग आणत आहे, पण परवडणाऱ्या रेट मध्ये !

आज unacedamy ग्रुप चं व्हॅल्युएशन 3.4 billion डॉलर्स एवढं आहे, जे या तिघांना आयुष्यभर 9 ते 5 नौकरी करून साध्य करता आलं नसतं.

📌 “या लोकांनी स्वतःच्या करीयरचा विचार न करता,खूप मोठया लोकसंख्येचा एक प्रॉब्लेम सोडवण्यासाठी स्टार्टअप केलं,ज्यातून आपण खूप काही शिकून प्रेरणा घेऊ शकतो ” !

📌यांची स्टोरी आपण युटयुबला पण बघू शकता ! आपण अशा स्टोरीज मुद्दाम लिहून सांगण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे मनाला ऊभारी मिळते .

📌सेफ रहा ! तयारी करत चला ! उद्या आपली पण अशीच स्टोरी येऊ शकते !

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890

शुभेच्छा
© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट ,
आनंद पार्क ,औंध , पुणे .
9518950764

Office : 9146 101 663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *