ज्याला कधीच लॉकडाऊन लागणार नाही,असं प्रौडक्ट कसं बनवायचं? वाचा !

ज्याला कधीच लॉकडाऊन लागणार नाही,असं प्रॉडक्ट कसं बनवायचं?

© निलेश काळे

” Perennial seller Product ”

बऱ्याचदा जेव्हा व्यवसायात नवीन येऊ पहाणाऱ्या मुलांशी चर्चा होते , जवळपास 90% सूर असा असतो कि , सर असा भन्नाट प्रॉडक्ट किंवा व्यवसाय पाहिजे ज्यात कमी स्पर्धा असावी , मार्जीन चांगलं हवं आणि विक्री भरपूर व्हावी .

सध्या जे गतिमान युग आहे , त्यात अशा व्यवसायांची निवड थोडी कठीण होते , पण अशक्य नाही .

Ryan Holiday चं पुस्तक Perennial seller या पुस्तकात त्याने याच घटकांवर आधारीत काही सोप्या युक्त्या सांगितल्या आहेत .

या लेखात आपण त्याच पुस्तकातील काही स्ट्रॅटर्जीज़ समजून घेऊया.

Ryan Holiday म्हणतात कि,जे प्रॉडक्ट/जे व्यक्साय वर्षानुवर्ष बिना कोणत्या ऍडवरटाईजचे चालतात( सध्याच्या काळात तशी प्रत्येक घटकाला ऍड करावीच लागते ) त्यांना Parennial seller असं म्हणतात.

भावार्थ समजायचा तर नॉन स्टॉप चालणारे प्रॉडक्ट असं समजा !

*****************************

व्यवसायाच्या अनेक कॅटेगरीत असे पुष्कळ प्रॉडक्ट आणि उद्योग आहेत कि,जे 50- 60 वर्ष मार्केटला असून सुद्धा त्यांच्या विक्रीत कसलीच घट झाली नाहीये.

ययाती ,,, छावा या सारखी पुस्तके आजही Best Seller आहेत.

Parle- G आजही तुफान विकल्या जाते

Bullet ने थोडेफार बदल जरी केले असले तरी ,40/ 50 वर्षांनी सुद्धा तिची क्रेझ अजूनही कायम आहे.

कोकाकोला चा formula 120 वर्ष जुना आहे.

जगात सर्वात जुना व्यवसाया जपानमधील एक हॉटेल आहे जे कि 700 वर्षापासुन चालू आहे.

**************************

तर प्रश्न असा कि,ज्या जमान्यात दर तीन महिन्याला मोबाईलचे नवीन version येते त्यात Perennial प्रॉडक्ट करता येईल का ?

तर Ryan Holiday म्हणतात,

नक्की करता येईल .

1) Make Timeless:

त्यासाठी आपण हे समजून उमजून करावं लागेल, त्यासाठी पहिला घटक म्हणजे? व्यवसाय निवडताना, ट्रेंड्स वर न जाता , Recurring Human Problem, ( मनुष्याला नेहमी नेहमी येत रहाणाऱ्या प्रॉब्लेमवर ! किंवा ज्याला Timeless Problem म्हणतो ,, त्याच्यावर सोल्युशन सुचवणारे प्रॉडक्ट डेवलप करा !

जसं Parle-G बिस्कीट चे पॅकेटभर बिस्कीटे पाण्यात बुडवून खाल्ली तरी पोट भरायचं तेंव्हा पण आणि आत्ता पण.

*******************************

2) Make it specific =

Ryan नी हे दुसरं प्रिंसीपल सांगितलंय की, कोणतेही प्रॉडक्ट डिजाईन करताना असा स्पेसिफीक करा कि , लोकांना तो फक्त डोळ्यातूनच नाही तर हृदयातून आवडला पाहिजे.

मग अशातून आपले लॉयल कस्टमर तयार होतात आणि तेच लॉयल कस्टमर ( मग ते दहा असोत कि शंभर ) आपली mouth publicity करतात.

Advertising च्या दुनियेत Mouth Publicity सारखं पॉवरफुल हत्यार कोणतच नाही,याला Testimonials किंवा Third Party story असं पण म्हणता येईल.
म्हणून तर आज पण अनेक कंपन्या अगदी Google Pay सारख्या बलदंड कंपन्या सुद्धा,आम्हाला रेफर करा म्हणून मागे असतात,रेफरल वर फार मोठा ग्राहक वर्ग मिळतो,जो कि करोडो रुपये खर्च करून पण मिळत नाही,
तरा यासाठी एकच स्पेसीफीक प्रॉडक्ट तयार करून ग्राहकाच्या हृदयात स्थान मिळवा.

**************”****************

3) Accessable बना :

याचा अर्थ काय तर आपला प्रॉडक्ट किंवा सर्विस समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचली पाहिजे आणि ग्राहकांना आपल्या पर्यंत पोचता आले पाहिजे.

मार्केट मध्ये बघा ना Unilever सारख्या जगात सर्वात मोठया कंपनीचे
Dove , Rin ,fair & Lovely सारखे प्रॉडक्ट अगदी तांडयावरील किराणा दुकानात पण मिळतात.

आज तुम्ही ज्या मोबाईल वर हा लेख वाचताय त्या करिता लागणारं 4G नेटवर्क , मोटाभाई ने पहिले फ्री आणि नंतर 149 रूपायात उपलब्ध करून दिले आणि Jio चे ग्राहक दणादण वाढले .

म्हणजे काय???तर Perrinial प्रॉडक्ट बनवण्यासाठी लोकांपर्यत आपण सहज पणे पोहचलं पाहिजे.

बघा .. आपल्याला Perrinial Product किंवा सर्वीस बनवण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते.

1) Making.
आणि
2) Marketing.

आजकाल आपण फार उतावीळ झालोय,आपल्याला instant ची सवय लागलीये.
व्यवसाय चालु केला कि nstant यश पाहिजे /लगेच पाहिजे )लगेच मिरवायचय आपल्याला .

नाही मित्रांनो नाही !

असं कधीच होत नसतं !

आईच्या पोटात सुद्धा आपल्याला 9 महिने 9 दिवस वाट पहावी लागते , मग इथे तर उद्योग उभा करायचाय !

त्यामुळे Product ची making पण नीट्ट करा आणि Marketing पण .

कारण बिना नीट making करता Marketing कराल तर डोक्यावर आपटाल आणि फक्त Making चांगली केली आणि Marketing मध्ये कमी पडाल तर लंगडा घोडा रहाल .

त्यामुळे .. घाई करू नका ,पृथ्वी उद्याच लयाला जाणार नाही .
नीट अभ्यास करा ! संयम बाळगा, स्वताः मेहनत घ्या आणि आपल्या उत्पादनाला वर्षानुवर्ष विकत रहा जसं Moti साबणाशिवाय आपली दिवाळीच होत नाही कित्येक वर्षापासून.

वरिल लेख Ryan Holiday च्या Perennial seller या पुस्तकावरून घेतला आहे.

हे पुस्तक Online/Offline विकत घ्या आणि एकदा तरी नक्की वाचा .

असेच लेख वाचायचे असतील तर आमचे फेसबुक पेज़ नक्की लाईक करा !

लिंक खाली आहे .

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890/

शुभेच्छा .
©निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
आनंद पार्क,औंध,पुणे.
whatsapp / 9518950764

आपल्याला जर व्यवसाय सुरू करणे , चालवणे आणि विस्तार करण्यासाठी
वैयक्तीक कन्सलटींग हवी असेल तर
खालील नंबर वर कॉल करा .

उद्योगनिती ऑफीस : ओमकेश मुंड़े सर : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *