डिस्काऊंट देऊन विक्री करण्यापेक्षा हा सिम्पल गोष्टी ट्राय तरी करा .

*”With no Reason : Lowering the price”…….. is a form of defeat*

ज्यावेळी आपल्या व्यवसायाची प्रतिमा बनलेली नसते, ब्रान्डची ओळख झालेली नसते, अशावेळी ग्राहक सरळ डिस्काऊंटवर येतो .

आपण आपल्या समोर बसलेल्या ग्राहकाला एखादी प्राइस ऑफर केलेली असते,आणि त्याला ती किंमत मान्य नसेल तर आपली धांदल उडते,.

इथे थोडक्या वेळात अनेक गोष्टी होत असतात,त्या बाबी कशा हॅन्डल करायच्या? हे अनेकांच्या लक्षात येत नाही .

सर्वात महत्वाचं : इमेज तयार करा !
Online/Offline जेवढी इकॉनॉमिकल प्रकारे मार्केटिंग करता येईल तेवढी करा, वाजवा अगदी मार्केटला म्हणजे ? लोकांना आपण परिचयाचे वाटायला लागू .

हा रोमान्स पिरियड असतो .
यानंतर प्रपोजल सोपं जातं .

तरी देखील डिस्काउंट देण्याऐवजी या बाबी ट्राय करा .

एकतर आपल्या सेवेची किंवा उत्पादनाची किंमत ठरवतानाच अनेक गोष्टीचा विचार करून किंमत ठरवावी, एकदा आपली किंमत जाहीर केली किंवा ग्राहकाला सांगितली ,की त्यानंतर त्या किमतीला योग्य ठरवण्यासाठी (Justify करण्यासाठी )आपल्याकडे योग्य कारणे देखील असायला पाहिजेत.

जर आपण किंमत सांगतोय ती कशी योग्य आहे हे समजावून सांगू शकलो, तर ग्राहक देखील त्या किमतीला काही ऑब्जेक्शन घेत नाही.

मग अशा वेळेला आपण पण खालील काही गोष्टींचा विचार केला पाहिजे

आपले स्पर्धक जर आपल्यासारख्याच सेम टू सेम प्रॉडक्ट विकत असतील तर, त्यांनी कशाप्रकारे किंमत ठरवलेली आहे याचा विचार करा.

आपण जो प्रॉडक्ट किंवा सर्विस विकत आहोत,त्याला मार्केटमध्ये खरंच डिमांड आहे का नाही? याचा विचार करा, जर चांगलीच डिमांड असेल तर किंमत थोडी चढी ठेवायला हरकत नाही,परंतु मुळातच डिमांड निर्माण करून मग विक्री करायची असेल, तर मात्र आपली किंमत ही थोडी विचार करून ठरवायला पाहिजे.

काही वेळेला मार्केटची एकंदरीत कंडीशन खराब असते, लोकांकडे पैसाच नसतो ,अशा वेळेला आपल्याकडे जर उत्पादने पडून राहणार असतील किंवा आपल्या सर्विसला ग्राहकच मिळत नसेल, तर मात्र किंमत थोडी कमी करून ती किंमत जाहीर करा ,परंतु अशा वेळेला अनेक जण एक चूक करतात, ती अशी की आमची पूर्वी किंमत एवढी होती ती परंतु आता आम्ही ती एवढी केली आहे,त्यामुळे त्याचा फायदा घ्या, अशी भाषा वापरतात.

अशी उपकार केल्याची भाषा वापरली जाते,,, मला सांगा,,,, ग्राहकाला याच्याशी काय देणे घेणे आहे?

अशी चूक अनेक जण आपल्या डिजिटल जाहिरातीमध्ये सुद्धा करतात, कशाला चुका करताय????????? गुपचूप एक किंमत लिहा आणि ग्राहकांची वाट बघा.

📌 आपण जर खरंच आपला किंमत कमी ठेवली,तर ग्राहकाच्या पण लक्षात येतंच कि , जेंव्हा आपली किंमत जाहीर करतो त्यावेळी ग्राहकाला साधारणपणे किमतीचा अंदाज असतोच.

जर त्याला आपली किंमत कमी वाटत असेल किंवा आपण अतिशय योग्य किंमत लावली आहे असं वाटत असेल तर तो गुपचुप खरेदी करतो,आपण तिथे ढोल वाजून सांगायची गरजच नाहीये आपण ढोलन वाजून सांगायला सुरुवात केली की, आपली इमेज जाते.

तेव्हा तशी गोष्ट करू नका

*******************

*INSTANT LOWERING THE PRICE*

अनेक वेळा असं घडतं की व्यवसायिक थोडासा जास्तीचा नफा मिळवण्यासाठी ग्राहकांना जास्त किंमत सांगतात, ग्राहकाने ऑब्जेक्शन घेतलं की ,त्यांची घाबरगुंडी उडते आणि ग्राहक वापर जायला निघाला की, मग हे पस्तावतात आणि तात्काळ ग्राहकाच्या समोर किंमत कमी करून सांगतात की “अच्छा एवढेच द्या”.

तरीदेखील तो ग्राहक मानला नाही तर यांची किंमत अजून कमी होते.

हा प्रकार तुम्ही भाजी मंडईमध्ये किंवा फळ विक्रेत्यांकडे जरा जास्त प्रमाणात बघू शकता.

************************

📌 *It’s an Image issue*

ग्राहक समोर बसलेला असताना विक्रेता आपल्या उत्पादनाची किंमत पटपट कमी करत असेल , तर ग्राहकाच्या मनामध्ये असा विचार येतो की “दादा तुला किंमत इतकी लवकर लवकर कमी करायची होती तर ,तू मग मला अगोदरच ची किंमत जास्त का सांगितलीस”?

म्हणजे ”तू लबाड आहेस ,म्हणजे तू खोटारडा आहेस किंवा तुझ्या मनामध्ये प्रामाणिकपणा नाही, तुझ्या डोक्यात प्रामाणिकपणा नाही तर तुझे उत्पादन चांगले आहे असेल कशावरून? ”

अशाप्रकारे त्या ग्राहकाच्या नजरेमध्ये तात्काळ किंमत कमी करून, प्रॉस्पेक्टला ग्राहक बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यवसायिकाची इमेज खराब होते.

************************

*It’s a form of Defeat*

ग्राहकाच्या नजरे मध्ये एकदा का व्यवसायकाची किंमत कमी झाली की मग आपण उत्पादनाची किंमत कमी करून काहीही उपयोग होत नाही,

बऱ्याचदा आपले रेग्युलर ग्राहक सुद्धा डिस्काऊंट मागतात,अशा वेळेला आपण एक गोष्ट करू शकतो ,ती अशी की फक्त दहा टक्के पर्यंत डिस्काउंट देऊन विक्री करू शकतो, परंतु दहा टक्क्यांच्या वर किंमत कमी केली की हातामध्ये आलेला ग्राहक गेला म्हणून समजा.

****************************

*Stick to Values*

ग्राहकांनी खरेदी केली नाही आणि तो दुकानातून बाहेर झाला निघाला आत्ताची तर विक्री झाली नाही पण हा ग्राहक पुढे देखील आपल्याकडे यावा यासाठी वापरायचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे, त्या ग्राहकाला प्रेमपूर्वक निरोप देणे.

त्या ग्राहकाला असं सांगणे की ”भाऊ माझ्या उत्पादनाची व्हॅल्यू यापेक्षा कमी होणार नाही ,आपण मार्केटमध्ये थोडी चौकशी करा आणि परत या आपल्याला जर या प्रकारच्या वस्तूची किंमत कुठे कमी मिळाली तर तिथे घेऊ शकता ”

असं करताना त्रास होईल,परंतु आपल्या मुद्द्यावर ठाम राहिला शिका.

अशा परिस्थितीमध्ये कदाचित तो ग्राहक बाहेर जाईल आणि तिकडून खरेदी करेल परंतु त्याच्या नजरे मध्ये आपली एक व्यवसायिक म्हणून परत चांगली राहील भलेही आपण पैसा कमावला नाही परंतु तरीही कमावली हे लक्षात ठेवा तो ग्राहक पुढच्या वेळी मात्र आपल्याकडे नक्की येईल कारण त्याच्या नजरेत आपली किंमत आहे.

डिस्काऊंट देऊन विक्री करणे हे एक प्रकारचे गिफ्टींग असते, याने आपला व्यवसाय पुढे जाणार नाही .

www.nileshkale.com या आपल्या साईटवर 170 लेख आहेत, त्यावर व्यवसाया संदर्भात कंटेट वाचत रहा .
याने तुमचा माईंडसेंट तयार होईल .
चांगली विक्री होईल .

शुभेच्छा .
©निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंटस,
5th floor,विघ्नहर चेंबर्स,नळस्टॉप
पुणे.
9518950764.

Office : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *