” ड्रग डिलर मेथड” नावाची सेल्स टेक्नीक तुम्हाला माहितीये का?

Drug Dealer method of Sales

📌 विक्री मग ती कोणीही करून जर तो व्यवसायिक यशस्वी बनला असेल तर त्याच्याकडून आपण अनेक गोष्टी शिकल्या पाहिजेत.

आज आपण असाच एक दोन नंबरचा व्यवसाय बघणार आहोत, ज्यात हेरॉईन, कोकेन सारखे प्रॉडक्ट विकले जातात जो बदनाम आहे ,परंतु त्यांची पद्धत आहे, ती पद्धत अतिशय यशस्वी आणि इफेक्टिव आहे .

तर आज आपण बघूया अशा लोकांची विक्री करण्याची पद्धत.

याला ड्रग्ज डिलर मेथड म्हणतात.

📗first Dose always free:

ड्रग डीलर लोक नवीन ग्राहक आपल्या जाळ्यात ओढण्याअगोदर त्याला पहिला जो डोस देतात ,तो नेहमी फ्री देतात,कारण ?त्यांना असा माहित आहे, की एकदा एका व्यक्तीने ड्रग्ज घ्यायला सुरुवात केली की, तो व्यक्ती त्या धंद्याचा कायमस्वरूपी चा ग्राहक होणार आहे.

म्हणून करता विक्री करताना सॅम्पलींग ही पद्धत नेहमी वापरली पाहिजे.

आपण सुरुवातीला आपल्या ग्राहकांना विना खर्च करता आपला प्रॉडक्ट टेस्ट करायला दिला की, ग्राहकांची आपल्या प्रॉडक्ट विषयी असणारी काळजी मिटते त्यांना आपल्या वर थोडासा विश्वास बसतो. आणि एकदा का त्या ग्राहकाला आपला विश्वास पटला की तो आपला नियमित ग्राहक बनवू शकतो.

📒Form a CARTEL

ड्रग डीलर लोकांचं नेटवर्क हे खूप स्ट्रॉंग असतं,त्यांच्याकडे सप्लायर असतात,डिलिव्हरी करणारे बॉईज असतात, इन्फॉर्मर असतात,मेंटर देखील असतात.

एखादा व्यवसाय जर यशस्वी करायचा असेल तर, तो एकट्याने किंवा दोन व्यक्तीने करून चालत नाही, ग्राऊंडवर काम करणाऱ्या लोकांचा एक नेटवर्क आणि पाठीमागे सपोर्ट करणाऱ्या लोकांचं एक नेटवर्क एका यशस्वी व्यवसायासाठी अतिशय आवश्यक असतं.

व्यवसाय हा काही एका किंवा दोन व्यक्तीने करायचा कार्यक्रम नाही,तिथे आपण आपल्या नेटवर्क जेवढा मजबूत बनवून तेवढा आपला व्यवसायाकडे येणारा ग्राहकाचा फ्लो हा चांगला बनतो .

ग्राहकाचा फ्लो चांगला बनला आपल्याकडे येणारा नफा देखील आपसूकच वाढतो.

📕Choose Customer Wisely

ड्रग डिलींग हा अतिशय मोठा व्यवसाय आहे,हा व्यवसाय अरबो रुपयांमध्ये होतो,परंतु आपल्याला या व्यवसायातील लोक किंवा या व्यवसायाचे ग्राहक हे बाजारामध्ये फिरताना दिसणार नाहीत.

कुठल्याही प्रकारची मार्केटिंग न करता यांचा करोडो रुपयांचा व्यवसाय होतोच कसा? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल .

तर मुळात यांचा टार्गेट कस्टमर ठरलेला असतो, हे बाजारात उठसुट कोणत्याही व्यक्तीला आपला माल विकत नाहीत,तर हे आपला कस्टमर अतिशय व्यवस्थितपणे निवडतात.
आणि त्याच कस्टमर पर्यंत आपला माल पोहोचवतात .

तुम्हाला जर असं वाटत असेल की, जगातले सगळे लोक आपले ग्राहक बनावेत ,तर तसं कधीही होत नाही, आपण फक्त त्या लोकांसाठीच मार्केटिंग करायला हवी, जे लोक आपले टार्गेट कस्टमर आहेत.

याचा अर्थ असा की आपण विना कामी लोकांच्या समोर आपले प्रॉडक्ट ची मार्केटिंग करू नये.

📘Choose Employees Wisely

हा व्यवसाय अतिशय रिस्की आहे, यामध्ये लाखो रुपयांचे व्यवहार एका वेळेस होत असतात,अनेक वेळा पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागतो, मोठ्या चौकशा लागतात ,एकदा अगदी एकदा जरी ,एखादा व्यक्ती ड्रग सप्लाय करताना पकडला गेला तर त्याला आजन्म कारावास होऊ शकतो, इतक्या सगळ्या रिस्क असताना देखील या लोकांचे कर्मचारी यांच्या प्रती इमानदार असता प्रामाणिक असतात आणि व्यवस्थित काम करतात,

याचं कारण आहे की,या लोकांनी यांचे कर्मचारी निवडताना देखील तेवढीच बारकाव्याने चौकशी केलेली असते,हे आपल्या कर्मचाऱ्यांना त्या सगळ्या सुविधा देतात, ज्या त्यांना आवश्यक आहेत, म्हणून मग यांचे कर्मचारी यांच्या प्रती प्रामाणिक असतात आणि सचोटीने काम करतात.

गरज पडली असता यांचे कर्मचारी अंगावर गोळ्या झेलायला देखील मागेपुढे बघत नाहीत, मग आपण समजू शकता की यांचं आपल्या मालका प्रति समर्पण किती असेल?

📙Eliminate the competition :

ड्रग बिलिंग या व्यवसायामध्ये प्रचंड नफा असतो आता ज्या ठिकाणी प्रचंड नफा असतो त्या ठिकाणी स्पर्धादेखील होणे स्वाभाविक आहे परंतु या धंद्याचा एक नियम आहे की हे लोक विनाकारण स्पर्धा करत बसत नाहीत

या धंद्यामध्ये स्पर्धा संपवली जाते स्पर्धक अक्षरशः मिटवले जातात

आता आपण व्यवसाय करत असताना ही गोष्ट करू शकत नाही परंतु स्पर्धा संपवणे ही गोष्ट आपण करू शकतो त्याच्या साठी वेगवेगळ्या ट्रॅक्टर लावाव्या लागल्या तर आपण त्याला वाव या आपल्याला इथे स्पर्धक खून करून संपवायचा नाहीये पण आपण स्पर्धा नक्की संपवू शकतो

📔Know your product Well

आपण बघत असा हे ड्रग डीलर मंडळी त्यांच्या प्रोडक्टची डिलिव्हरी करण्यासाठी अतिशय रिस्की काम करतात

यांना माहीत आहे की या ड्रगचा पाच ग्रॅम चा डोस देखील माणसाला गुंग करू शकतो तरी देखील याची स्मगलिंग करणारे लोक आपल्या अगदी पोटामध्ये याचे अर्धा किलो चे पाकीट ठेवून मालाची वाहतूक करतात हे कसं घडू शकतं तर यांना आपल्या प्रॉडक्ट बद्दल अतिशय चांगली माहिती आहे हा प्रॉडक्ट कशाप्रकारे केला पाहिजे याची वाहतूक कशी केली पाहिजे त्याचे काय परिणाम होतात हे त्यांना अगदी परफेक्ट माहीत असतं

आपल्याला किंवा आपल्या जास्त आपला आपल्या प्रोडक्टची अतिशय चांगली माहिती असणं आपण तो व्यवस्थित प्रेझेंट करु शकतं ही विक्री करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब आहे आणि हे जर आपण करू शकलो तर आपण अतिशय चांगल्या रीतीने विक्री होऊ शकतो

📗Create a need

अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत तसेच त्याच्या अनेक छोट्या-छोट्या गरजा पण असतात परंतु ड्रग्ज ओढणे किंवा पिणे ही काही माणसाची गरज नाही.

तरी देखील मग याचा व्यवसाय अब्जो रुपयांमध्ये कसा होतो

हरी या पाठीमागे कारण आहे की या पदार्थाची गरज निर्माण केली जाते जाणीवपूर्वक निर्माण केले जाते गरज तयार करणे हा फार्मूला जॉब्स यांनी जगाला दिलेला आहे

आता भलेही आपल्या प्रोडक्ट ग्राहकाच्या रोजच्या गरजेच्या नसेल तरीदेखील आपण जर त्याची गरज निर्माण करू शकलो तर आपला व्यवसाय हा अगदी चांगल्या प्रकारे चालू शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे

📘Protect your process

हा व्यवसाय अब्जावधी रुपयांचा आहे , रोज यामध्ये काही ना काहीतरी घडत असतं, परंतु आपण मार्केटमध्ये रोज याचे संदर्भातील लोक पकडलेले बघतो का? कितीसे लोक पकडले जातात? किती लोकांवर कारवाई होते? हे अगदी अनाकलनीय आहे .

या धंदा मधले फार कमी लोक पकडले जातात ,याचं कारण आहे की, यांची प्रोसेस अगदी गुप्तपणे आणि अतिशय परफेक्टली चालते.

हा धंदा जरी दोन नंबरचा असला तरीही ,यामध्ये परफेक्शनला अतिशय महत्त्व आहे, लक्षात घ्या !कोणताही व्यवसाय कोणताही धंदा मग तो छोटा असो की ,मोठा त्याच्यामध्ये जर आपण प्रोसेस पर्फेक्ट केली तर विक्री होते आणि त्यामध्ये कुठलाही अडचण येत नाही.

आपण यांच्याकडून हे शिकू शकतो की आपली प्रोसेस ही अतिशय परफेक्ट करून घेतली पाहिजे

📕Be Bold

या धंद्यामध्ये ग्राहक आहे , पैसा आहे, पण रिस्क देखील आहे,पण तरीदेखील इथे लोक काम करतात, श्रीमंत होतात .

ज्या कोणत्या व्यवसायामध्ये जेव्हा खूप जास्त पैसा असतो ,अशा सगळ्या गोष्टी असतात तेव्हा अजून एक गोष्ट गरजेचे असते ती म्हणजे व्यवसायिक करणाऱ्या लोकांची अंगामध्ये असणारी धिटाई / बोल्डनेस.

अनेक लोक फक्त घाबरून जाऊन व्यवसायामध्ये मागे पडतात,ते रिस्क घेत नाहीत, ते बोल्ड स्टेप घेत नाहीत आणि ज्यांनी बोल्ड स्टेट घेतली नाही त्याला नफा देखील मर्यादित मिळतो.

म्हणून लक्षात घ्या,आपल्या व्यवसायामध्ये आपण कधी कधी बोल्ड व्हावं लागतं ,तसं या धंद्यामध्ये लोक सगळेच्या सगळे बोल्ड असतात, सगळेच्या सगळे लोक अतिशय निर्भिडपणे काम करतात आणि मिळवतात मोठा नफा मिळवतात.

अशाप्रकारे आपण ड्रग डिलिंग या धंद्यातले काही सिक्रेट बघितले,ते आपण आपल्या व्यवसायामध्ये काही प्रमाणात वापरू शकतो, ते वापरा आणि आपल्या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त विक्री मिळवा.

धन्यवाद.

निलेश काळे
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंट्स
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764
office : 9146101663

Previous Post Next Post

One thought on “” ड्रग डिलर मेथड” नावाची सेल्स टेक्नीक तुम्हाला माहितीये का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *