तुमचा ग्राहक दरवेळी ऑनलाईनशी तुमची तुलना करून,स्वस्तात मागतोय?तर पुढच्या आयडीया वापरा

तुमचा ग्राहक दरवेळी “ऑनलाईनशी” तुमच्या रेटची तुलना करतोय? तर या आयडीया वापरा !

घे_धडक_बेधडक!

© निलेश काळे

📌 सध्या जास्तीत जास्त व्यापारी वर्गांचा एक प्रश्न आमच्या समोर येतो, त्यात ते म्हणतात “सर ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्या विरुद्ध कसे लढायचं?” “ग्राहक दुकानात येतो, एखादी वस्तू दाखवा म्हणतो” त्यानंतर त्या वस्तूचे भाव विचारतो परंतु त्यावेळेला खरीखुरी खरेदीची वेळ येते त्या वेळेला दुकानदारांना ऑनलाईन असणाऱ्या किमती आणि आणि त्यांच्या किमती त्यातला फरक दाखवून वापस निघून जातो

तो निघून गेला की परत येतच नाही कारण त्याने खरेदी ऑनलाईन केलेली असते.

मग मग अशा वेळी आपण कोणत्या युक्त्या वापरल्या पाहिजेत की, ग्राहकाने आपल्या दुकानातून खरेदी करावी किंवा यापेक्षा पुढे जाऊन ग्राहकाने ऑनलाईन खरेदी ऐवजी ऑफलाईन खरेदीला पसंती द्यावी.

_बघा हा प्रश्‍न फार मोठा आणि अतिशय ज्वलंत आहे आपल्याला अनेक गोष्टी समजावून घ्यावे लागतील,आपल्याला आपल्या स्वतःच्या वागणुकीमुळे बदल करावा लागेल,आपण आत्तापर्यंत ग्राहकाला कशा प्रकारे वागणूक देत होतो? कशाप्रकारे आपल्या किमती सेट करत होतो ?किंवा कशा प्रकारे आपण खरेदी सुद्धा करत होतो? या सगळ्याच गोष्टींची प्रक्रिया पूर्णपणे बदलावी लागणार आहे.

कोणतीही गोष्ट बदलायला गेली की ती जरा जास्तच दुखतं, पण हे समजून घ्या बदल हा, या संसाराचा नियम आहे आपण त्याला टाळू शकत नाही,

तो जबरदस्तीने थोपवून घेण्याऐवजी त्याला नीट समजावून घेतली घेतलं तर, आपण पण स्वतःला या कालावधीमध्ये चांगलं घडवू शकतो, किंवा या जमान्यात सुद्धा चांगल्या प्रकारचे विक्री मिळू शकतो.

आता एक शॉकिंग बातमी तुम्हाला सांगत,,,, ॲमेझॉन ही eकॉमर्स क्षेत्रातली सगळ्यात बलाढ्य कंपनी ऑफलाइन क्षेत्रांमध्ये आपली “Bricks& mortar नावाची Offline दुकाने किंवा मॉल्स उघडणार आहेत सन 2015 पासून याच्यावर काम चालू झालेले आहे.

चला आता आपण समजावून घेऊ की आपण या बदलत्या काळामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पैसा कसा कमवू शकतो?

📌(1) Go_Online_and_fight_there_also :

आपल्या पूर्वजांनी अनेक युद्ध जिंकली बलाढ्य लोकांबरोबर असणारी जिंकली,
आता ती कशाप्रकारे जिंकली हे लक्षात घ्या राज्याचा विस्तार कसा झाला तो लक्षात घ्या!
ज्या वेळेला आपल्यावर आक्रमण करतो, त्या वेळेला आपण आपली बाजू टिकवून ठेवण्यासाठी प्रतिकार करायला लागतो,पण त्याला खरा धडा शिकवायचा असेल तर आपण सुद्धा कधीतरी त्याच्या क्षेत्रामध्ये जाऊन त्याच्यावर कुरघोडी करावे लागते,_
ई-कॉमर्स कंपन्यांच्या साइटवर मीटिंग करणारे आणि तिथून विक्री करणारे हे लोक आहेत,हे लोक सुद्धा घरातून व त्यांच्या दुकानातून विक्री करणारे सर्वसाधारण व्यापारीच आहेत, हे फक्त त्यांच्या प्रॉडक्ट आणि उत्पादनांना ऑनलाइन कंपन्यांच्या वेबसाइटवर लिस्ट करतात, असे,असेल तर आपण सुद्धा त्यांच्या क्षेत्रात जाऊन त्यांचा ग्राहक पळवायला काय हरकत आहे? आपलं एखादं दुकान आपल्या शहरांमध्ये असेल ?तर आपलं अजून दुसरे एक दुकान ऑनलाइन कंपन्यांच्या साइटवर उघडा !_
म्हणजे हा हमला फक्त तो एकटा करतोय असे होणार नाही ,आपण सुद्धा त्याला प्रतिकार म्हणून त्याच्या क्षेत्रात जाऊन हमला करायची तयारी ठेवू

************************************

📌 (2) Do_into_digital_advertizing

बघा आत्तापर्यंत किती गरज पडली नाही की,आपल्या स्वतःच्या गावांमध्येच आपली जाहिरात करावी, पण वेळ बदललीये,आपल्याला गावातल्याच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचायला पाहिजे,जास्त प्रॉस्पेक्टपर्यंत पोहचण म्हणजे ? आपण जास्त कस्टमर मिळवू शकतो!

म्हणून जास्त डिजिटल जाहिरात करायला घ्या !

त्यामुळे जास्त लोक आपल्यापर्यंत येतील !

**********************************”

📌 ( 3 ) Give_personal_touch:

आजही काही प्रकारच्या खरेदी अशा आहेत कि ,जिथे ग्राहकांना जिथे वस्तुला टच करूनच खरेदी करायला आवडते,”स्क्रिनखरेदी” मध्ये ही कमतरता आहे !
मग ही बाब आपल्यात पक्की आहे तर याचा फायदा घेऊया कि ?

ग्राहकांना पर्सनलायजेशन आवडते,ते दया हो !

********************************
,

📌 ( 4) Guide_the_customer_throgh_Sales_process:

ग्राहक हा काहीतरी डोक्यात ठेऊन खरेदी करायला येतो , पण इथे येऊन कन्फ्युज होतो,मग त्याला निर्णय घ्यायला कोणाची तरी मदत लागते,
ऑनलाईन खरेदीत ती सोय नसते, पण इथे समोर आपण असतो ,तर उगाचच त्याचं तोंड बघत बसण्यापेक्षा थोडी मदत करू लागा !
असे गाईड करणारे दुकानदार ग्राहकांना आवडतात,तेव्हा आपण फक्त विक्रेता बनून राहण्यापेक्षा गाईड बना, लोकांना विक्रेत्यापेक्षा गाईड आवडतो , मग बघा ग्राहक इकडे तिकडे बघत बसणार नाही

******************************”****

📌 (5) *Offer_Standard_and_extra_service_also:

ग्राहकांना माल घरपोच पोहचवणे ही पहिले एक्सट्रा सर्विस होती , पण आता ही गोष्ट स्टॅन्डर्ड झालीये, म्हणून ही तर दयाच दया, पण अजून काही एकस्ट्रा देता येतंय का ते बघा ! कारण ऑनलाईन सर्विस देणारे ! होम डिलीवरी आणि रिप्लेसमेंट पेक्षा जास्त काही देऊ शकत नाही ! पण आपल्याकडे या पेक्षा जास्त काही असलं तर , ग्राहक इकडे तिकडे का पळेल ,
पण प्रॉब्लेम असाय कि आपल्या ऑफलाईन विक्रेत्यांना स्टँन्डर्ड सर्विसच दयायची नाहीये , तर कसं जमणार ?
कामापेक्षा जास्त दया !तरच ग्राहक येणारेय !

********************************”

📌 ( 6 ) Extrrrrrrreme_Service_is_the_Answer

ग्राहकाचा मेन प्रॉब्लेम ,ऑनलाईन rates कमी असतात आणि दुकानदार जास्त रेट लावतोय , अगदी लुटतोय असं वाटतंय ,पण याला टक्कर देण्यासाठी,काय देऊ शकतो?
तर एक्सट्रा सर्विस!
जी गोष्ट ऑनलाईन कोणतीच कंपनी देऊच शकत नाही !

मग ग्राहकांना सांगा, “कि जबरदस्त सर्विस देऊ, मग पैशाला काय करता !”

शेवटी ग्राहकाला खरेदी केल्यावर सर्विस पण लागतेच ना ?
म्हणून तर Mi या मोबाईल ब्रॅन्डने ऑफलाईन स्टोर्स ला पार्टनर बनवलय ही Hope to gain strategy……. कमी Ratesच्या भितीला मागे रेटू शकते !

पण ही एक्स्ट्रीम सर्विसची विचारधारा फक्त आपल्यात ठेवायची नाही, तर आपल्या कर्मचाऱ्यांना पण नीट शिकवायचीय ! म्हणजे ते जमेल !

**********************************

📌 (7 ) Do not insult Customer Anymore:

ग्राहकांचा आजवर प्रचंड अपमान झालाय,बऱ्याचदा दुकानदारांनी ब्लॅकमेल करूनच माल रेटलाय, ग्राहकांना ” एकदा विकलेली वस्तु परत आणु नका ” असं धमकावलंय , “रोग सरो वैद्य मरो ” अशी वागणुक दिलीय, कधी त्यांना त्यांच्या दारात माल दिला नाहीये , त्याचा परिणाम म्हणून आज हे ऑनलाईनवर प्रेम दाखवलं जातंय.

तेंव्हा आता किमान इथून त्यांचा अपमान करणे बंद करा ! जमेल सगळं_

कारण मॅनेजमेंटच्या स्टडीत हे सांगितलं जातं कि , साधारणपणे फक्त 30% ग्राहकच चिप क्वालिटीचे असतात, बाकीचे इतर गोष्टींना महत्व देतात .

सगळेच लोक रेटवर किरकिरी करणार नाहीत .

तेंव्हा ……जास्त ताण घेऊ नका,Online शी झगडा करत बसण्यापेक्षा, हुशारीने आपल्या ग्राहकांना जास्त जपा !_त्याच्यातच फायदा आहे !

बरं पडेल !

लेख आवडला असल्यास आपल्या दुकानदार मित्रापर्यंत फॉरवर्ड करा !

व्यावसायीक पोस्ट वाचण्यासाठी खालील फेसबूक ग्रुप जॉईन करा !

https://www.facebook.com/groups/675025626396370/?ref=share

© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंटस,
आनंद पार्क , औंध , पुणे,
9518950764
office : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *