तुमचे पैसे चुकून इतरांच्या अकाऊंटवर ट्रान्सफर झाले,तर हा कायदा तुमची मदत करेल.

Quasi Contract

Business मध्ये पण कायदा हा विषय शिकवला जातो,या संदर्भात हा लेख देणार आहे, यातला प्रत्येक पॉईंट समजून घ्या फायदा होईल.

बघा ज्यावेळी दोन व्यक्तींमधे जाणीवपूर्वक अथवा अजाणतेपणाने काही व्यवहार होतो तेव्हा त्याची कुठेही कागदावर नोंद नसते किंवा तसा कुठे करार नसतो , पण जर यात कोणाचा पैसा खर्ची लागला असेल तर तिथे तो कॉन्ट्रेक्ट झालाच असे न्यायालय म्हणते आणि याचेच नाव *Quasi Contract* असे आहे . हे कॉन्ट्रेक्ट घडवले जात नाही तर कायदयाद्वारे प्रिंसीपलद्वारे लागू होते,

त्याला *”Priciple of Equity”* असं म्हणतात .

याचा अर्थ कोणाबरोबरच अन्याय नाही झाला पाहिजे .

याचे काही खालील प्रकार बघा .

supply to the Unsound person:

समजा एखादी Mental व्यक्तीला आपण एखादी वस्तू दिली आहे,तर त्या व्यक्तीला तर त्याचं काहीच माहिती नसतं,समजा त्याने ती वस्तू त्याच्या गरजेसाठी वापरली,आणि पैसा काय असतो? हे त्याला माहितच नाही.

अशावेळी तो दुकानदार अथवा सप्लाय करणारा लटकला ना?

त्या सप्लायर ने तर पैसा खर्च करून ती वस्तू आणलेली ना ? मग अशा वेळी कायदा म्हणतो कि त्या unsound व्यक्तीची Caretaker व्यक्तीने त्याची भरपाई सप्लायर ला दयायची आहे.

(2) Neighbour payment :

समजा आपल्या शेजाऱ्या व्यक्तीला एखादं बील भरायचं आहे,पण ती व्यक्ती तिथे उपलब्ध नाही ,म्हणून मदत म्हणून तुम्ही त्याच्या बदल्यात तिथे पेमेंट करुन टाकले,तर त्या माणसाची ड्युटी आहे कि त्याने ते Third person ला केले गेलेल्या पेमेंटचे पैसे तुम्हाला दयायचे आहेत.

ही त्याची Legal Binding आहे , आणि आपण कायद्याद्वारे ते पेमेंट रिकव्हर करू शकता !

(3) Mistaken Delivery:

समजा आपण पैसे भरून swiggy वरून काही मागावलं आहे,पण त्याला आपला पत्ता सापडलाच नाही,त्याने by mistake कुठेतरी दुसरीकडेच डिलीवरी करून टाकली तर,पण इथे तर पेमेंट तर तुम्ही केलंय,अशा वेळी आपला पैसा खर्च झालाय.

तर ते पैसे,तुम्ही ज्याने ते पार्सल वापरलंय त्यांच्याकडून घेऊ शकता .

(4) Found object:

समजा रस्त्यावरून आपण जात आहोत आणि रस्त्यावर आपल्याला एखादी वस्तु सापडली,तर त्याची मालकी आपली होते का ? तर नाही,

त्या वस्तुची मालकी, त्याच्या मालकाकडेच रहाते,म्हणून तर चोरीची वस्तु विकत घेणारा व्यापारी,,,,,,पण कायद्याच्या भाषेत चोरच ठरतो.

(5) Mistaken payment :

ही बाब या Quasi Contract मधील सर्वात महत्वाची आहे,आपण एखादयाला इलेक्ट्रॉनीक रितीने ( जसं phonepay,GPay, वॅलेट, RTGS ,NEFT किंवा online पद्धतीने ) पेमेंट करतो आणि पेमेंट कोणा तिसऱ्याच व्यक्तीच्या अकाऊंटवर जाते,अशावेळी आपण काय कराल ?

घाबरून जाऊ नका,
इथे आपल्या मदतीला हा कायदा येतो,भलेही इथे दोघांमध्ये कोणताही व्यव्हार करायचा नव्हता,पण झाला,आणि त्याने पैसे सगळे वापरले, पण तो असं म्हणू शकत नाही, कि मी पैसे परत देणार नाही.

इथे व्यवस्थीत कॉन्ट्रॅक्ट झाला नसला तरी Quasi Contract तर झाला ना ? म्हणून कोर्ट म्हणते … “तुमचे पैसे तुम्हाला वापस मिळतील”

Indian contract Act मधील हा विषय मॅनेजमेंट स्टडीज मध्ये Business Laws म्हणुन शिकवले जातात .

त्यामुळे उद्या कोणी पावती दाखवाच म्हणून अडून बसला,तर त्याला एखाद्या चांगल्या वकिलाचा सल्ला घेऊन, कायदेशीर पद्धतीने त्याला Quasi Contract शिकवा 😊😊😊

कायदा हा कोणावरही अन्याय होऊ नये, यासाठीच असतो.

निलेश काळे
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंट,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764.

Office : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *